भीती

साद

Submitted by आर्त on 12 June, 2021 - 07:35

घातलेली साद तू, मी ऐकली नाही
साद प्रेमाने तशी तू घातली नाही

भोगल्या मी तू दिलेल्या त्या व्यथा साऱ्या
प्रेम मिळण्याची व्यथा मी भोगली नाही

भूतकाळाने शिकवले वेगळे काही
माणसाशी प्रीत वेडी चांगली नाही

जे प्रवासी भेटले, ते पांगले सारे
भाग्य माझे! वाट माझी पांगली नाही

घाबरट हे सत्य इथले, न्याय ही भित्रे
आज खोट्यालाच भीती वाटली नाही

शस्त्र झाले सर्व बोथट, वार ही थकले
राजनीतीची लढाई संपली नाही

रोज पडले कैक, त्यांना मी उचलले मग
का कुणी माझीच तिरडी उचलली नाही?

विषय: 

संवाद (भाग २)

Submitted by आनन्दिनी on 12 August, 2020 - 19:50

आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .

संवाद

Submitted by आनन्दिनी on 6 August, 2020 - 13:41

संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!

ती रात्र

Submitted by सागर J. on 15 April, 2020 - 07:07

'आई काय ग हे !.काय सारखा सारखा लहान मुली सारखा मला घरी लवकर यायला सांगता .मी मोठी आहे आता '
' सोन्या तुझी काळजी वाटते आम्हाला म्हणून सांगते.आणि हो ...बाबा येणारेत बरका तुला दररोज तुला क्लास मधून आणायला .....
निशाची आई तिला समजावत समजावत होती .तिच्या बोलण्यातून खूप काळजी व्यक्त होत होती . निशाचे आई समोर काही चालले नाही .निशाला माहीत होते की काही दिवसा पासून आई आणि बाबा थोडे काळजीत दिसत आहेत .कारण हि तसेच होते .काही दिवसांपुर्वीच ती बातमी आली होती ...

विषय: 

अणुबाँबचा स्फोट झाल्यानंतर

Submitted by आ.रा.रा. on 27 February, 2019 - 13:32

कमीत कमी किती किलोमीटर अंतर "अनसेफ" असते?

कराची - मुंबई अ‍ॅज क्रो फ्लाईज अंतर किती?

आय मीन कराचीहून विमान निघाले अन मधेच आपण ते इंटर्सेप्ट करून उडवले, तर साधारण कच्छच्या आखातात कुठेतरी उडेल. पण स्फोट होईलच. फॉलाऊटची रेंज, दिशा वगैरे कशा असतात?

कन्या सध्या मुंबईत आहे, काळजी वाटते.

लहाण भाऊ रक्षण कसा करणार !

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 17 October, 2018 - 12:22

प्लॅटफॉर्मवर ट्रेन अाल्याचा अावाज एेकल्यावर, ट्रेनचा द्वितीय श्रेणीचा दरवाजा जिथं ज्या जागेवर येउन थांबतो, तिथं मी माझ्या मोठ्या बहिणीसोबत जात होतो. मी १७ वर्षाचा होतो. अामच्या पाठीमागून गरदुल्ल्यांचा गट केविलवाणा अावाज करत येत होता. माझ्या सोबत बहिण अाणि मी बळकट नसल्यामुळे मी थोडा घाबरलो. अाम्ही प्लॅटफॉर्मवर उभे असल्यापासूनच त्यांचं माझ्या बहिणीवर वाईट नजरा होत्या. त्या गटांचं एक जण बहिणीच्या बाजूला अाला व तिच्या हाताला एकदा स्पर्श केला. बहिण सुद्धा घाबरली. मान खालती घालून चालत होती. मला राग अाला. तरीही भीती अजून होतीच. त्याने पुन्हा स्पर्श केला व थोडा अामच्यापासून पुढं चाळू लागला.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - भीती