क्षण

चल

Submitted by Meghvalli on 23 March, 2024 - 08:08

पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ

नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु

हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ

येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ

अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM

meghvalli.blogspot.com

इंद्रधनू

Submitted by _तृप्ती_ on 12 November, 2019 - 07:54

कधी भरलं आभाळ, कधी भरलं आभाळ
तूच तुझे तुला आता, क्षण एवढे सांभाळ

कधी झालं रे मोकळं, आभाळ हे मोकळं
सुख आलं दारी आता, क्षण एवढे सांभाळ

भरलं हे आभाळ, मोकळं हे आभाळ
तूच घाल आता मेळ, पाठशिवणीचा खेळ

ज्याला कळलं कळलं, त्याचं पारडं भरलं
श्रावण हा ज्याचा त्याचा, त्यात इंद्रधनू सजलं

राहुन गेले..

Submitted by मन्या ऽ on 29 July, 2019 - 13:54

राहुन गेले..

तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहुन गेले

तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहुन गेले

तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहुन गेले

तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहुन गेले

शब्दखुणा: 

कातर क्षण

Submitted by भागवत on 26 October, 2018 - 02:58

ओथंबलेले क्षण का स्मरतात
स्मृती उगाचच गर्दी करतात
जुन्या आठवणी कुरतडतात
हळुवार क्षणी मात्र डोकावतात

आठवणी आल्या चोर पावलांनी
हृदयाचा ठोका चुकला क्षणांनी
दगा दिला डोळ्यातील आसवांनी
दूर तरी बांधलो प्रेमाच्या नात्यांनी

हाक दिली हृदयस्थ भावनांना
प्रतिसाद नाही आला शब्दांना
विझावतो आतल्या तीव्र उद्रेकांना
साद घालतो आपल्याच लोकांना

शब्दखुणा: 

क्षण

Submitted by _तृप्ती_ on 1 August, 2017 - 23:55

अंतर असे कितीसे दोन श्वासांमधले
अंतर तितकेच आहे असण्या नसण्यामधले
बांधले जे मनोरे तू, आयुष्य खर्ची पडले
सांग गळून जाताना काय कामी आले

मार्ग पुढचा सांधताना, रस्ते ओस पडले
मागचे कढ आता, बांधू न शकले धागे
आजचा क्षण मात्र हसून उभा होता
पण तुला कळण्याआधीच कालचा झाला होता

क्षण हाच आहे, श्वासांना जोडण्याचा
निसटण्याआधीच प्रेमाने आलिंगनाचा
सामोरे जा आजच्या सौख्याला
मार्ग तोच आखील आणि नेईल मुक्कामाला

शब्दखुणा: 

रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!

Submitted by MallinathK on 8 August, 2016 - 01:50

रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!

रायगड ! पहिल्या पायरीलाच तुला नमन… नव्हे, वाकून नमस्कार !!! इथे आल्यावर मला नेहमी वाटतं ती रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे, गर्विष्ठपणे. पण त्याचंही बरोबर आहे. का करू नये गर्व ? माझ्या राजांचा एकटाच तर साक्षीदार आहे. कित्त्येक क्षण अनुभवले याने राजांसोबत, काय काय नाही पाहिलं याने, काय काय नाही सोसलं याने. याला बोलता आलं असतं तर विचारलं असतं सांग माझा राजा कसा होता…  

विषय: 

सेट फायर टू द रेन - क्षणाक्षणाची गंमत!

Submitted by भास्कराचार्य on 5 April, 2016 - 21:25

आज संध्याकाळी काम संपल्यावर चालता चालता लहर आली, म्हणून सहज काहीतरी चघळायला घ्यायला दुकानात घुसलो. शेंगदाणे, चॉकलेट असे काहीतरी घेणे माझ्याकडून बरेचदा होते. माझ्या नेहमीच्या स्टोरमध्ये गर्दीही फार नसते. आजही नव्हती. उगाच २-३ जण माझ्यासारखीच काहीतरी सटरफटर खरेदी करायला आले असावेत. काही विद्यार्थी, काही कामावरचे लोक ... पूर्वी एकांकिकेत काम करताना पार्श्वभूमीवर काही 'नेहमीची मंडळी' वातावरण निर्मिती करायला इकडून तिकडे जात असायची तसाच सगळा माहौल होता एकंदरीत.

विषय: 

दगडावर कोरलेले क्षण..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

माझ्या ब्लॉगवर चार एक वर्षांपूर्वी लिहीलेली पोस्ट... फार रँडम आठवणी आहेत. Happy

गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! Happy

    विषय: 
    प्रकार: 
    शब्दखुणा: 

    आठवणीतले क्षण !!!

    Submitted by MallinathK on 9 November, 2011 - 01:06

    "अरेऽ मधुऽऽ, उऽठ. ८ वाजलेत. आजपासुन ऑफिस आहे नाऽऽ?"

    "काय हे ! लग्नाच्या ८ व्या दिवशी सक्काळ सकाळी ८ वाजता कोणी उठतं का? ते ही ऑफिसला जाण्यासाठी ?" इति अस्मादीक.

    "ए कोट्या काय करतोयस? आ‌ई येतील इतक्यात ओरडत. उऽऽठ ना रे. बघ, नाष्टा सुद्धा तयार आहे आणि आजपासुन तुझा डब्बा मी करणारे..."

    "ओऽह शिट्ट !"

    "ओऽऽ.... ठिक आहे मग. उद्यापासुन तुझ्या आ‌ईच्याच हातचा डबा घे‌उन जा. मी नाही बनवणार.." असं फणकारुन ती रागाने पाय आपटत वळून बाहेर जाणार इतक्यात मी तिचा हात धरुन मागे ओढले.

    "एऽ लाडाबा‌ई, रागावलीस..?"

    गुलमोहर: 

    क्षण क्षण!

    Submitted by नीधप on 17 April, 2011 - 07:54

    जुनीच कविता. २००६ मधे 'आतल्यासहित माणूस' हा कवितांचा नाट्याविष्कार असा प्रयोग मी दिग्दर्शित केला होता. मायबोलीवर मला भेटलेल्या काही कवींच्या(बेटी, हेम्स, परागकण, पेशवा, शुमा, क्षिप्रा, गिरीराज, दिपक) आणि माझ्याही काही कवितांचा समावेश या प्रयोगात होता. २००५ मधे लिहिलेली ही खालची माझी कविता या प्रयोगात वापरली होती.
    ---------------------------------------------------------------------------------
    क्षण क्षण ठिबकतो घड्याळातून
    मातीत मिळतो.
    शोधू पहाता सापडत नाही.

    खरंतर प्रत्येक क्षणाचीच मागणी असते
    सोन्याच्या अक्षरांची.
    एखादाच ते भाग्य घेऊन येतो.
    बाकीचे लिहितात

    गुलमोहर: 
    शब्दखुणा: 

    Pages

    Subscribe to RSS - क्षण