कथा, एकांकिका प्रकाशित करणारी मासिके अथवा इतर नियतकालिके
नमस्कार मंडळी,
दिवाळी अंकांव्यरिक्त तर कुठली मासिकं वगैरे आहेत जिथे कथा, एकांकिका छापल्या जाऊ शकतात? मला साधारण वैचारिक नियतकालिकं जास्त सापडत आहेत.
धन्यवाद!
नमस्कार मंडळी,
दिवाळी अंकांव्यरिक्त तर कुठली मासिकं वगैरे आहेत जिथे कथा, एकांकिका छापल्या जाऊ शकतात? मला साधारण वैचारिक नियतकालिकं जास्त सापडत आहेत.
धन्यवाद!
पद्मावतीपर्यंत आलो तेव्हाच आईचा फोन आला, आणि तो उचलल्यावर लगेच चिटणीसांचा कॉल वेटिंगवर. आता आई लवकर फोन ठेवणार नाही, आणि तोवर हे साहेब पुन्हा पुन्हा कॉल करत राहणार, हे ठरलं. याच्या अगदी विरूद्ध झालं असतं, म्हणजे समजा यांचा फोन आधी आल्यामुळे तो घेतल्यावर कॉल वेटिंगवर आईचा फोन आला असता तरी हेच झालं असतं. म्हणजे चिटणीस आपले बोलताहेत, बोलताहेत, आणि आई लेकराच्या अपार काळजीपोटी पुन्हापुन्हा माझ्या कॉल वेटिंगवर येतेय. माझी अवस्था दोन्ही केसेसमध्ये सारखीच.
शुन्याक्षर कथा हे वाचून अनेकांना अचंबा वाटला असेल. अनेकांना हे वाटले असेल की शब्द सोडा एकही अक्षर न वापरता लिहली गेलेली कथा ही चित्र कथा तर नाही ? अनेकांना असे ही वाटले असेल की ही कथा अनुस्वार, वेलांटी, उकार, पुर्णविराम. प्रश्नचिन्ह किंवा उद्गार चिन्हाने साकारली आहे किंवा कसे ?
नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो,
'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…
आपण विनोदी साहित्य लिहीत असाल...जसे की विनोदी कथा, चुटकुले, नाटुकले इत्यादी तर आपण आपले स्वलिखित 'अप्रकाशित साहित्य' आम्हांला देऊ शकता. (फार ओढून ताणून केलेले विनोद नकोत, तसेच व्हॉट्सअप विनोद नकोत. कुठलेही कमरेखालचे विनोद नकोत.) निखळ फॅमिली ड्रामा हवा. उदा. वागळे की दुनिया, तारक मेहता का उल्टा चष्मा...आपल्या पुलंचं साहित्य.
निरोप
घराची बेल वाजली तसं रविनं टी.व्ही.चा आवाज बंद करून उठून दार उघडलं. आज सुट्टी असल्यानं तो घरीच होता.
दारात तीन-चार अनोळखी माणसं.
``आहेत का जोशी साहेब?`` त्यातल्या एकानं विचारलं.
``मीच जोशी. बोला...`` रवी म्हणाला.
``तुम्ही नाही, सिनिअर जोशी साहेब...``
``बसा... बोलावतो.`` त्यांना बसायला सांगून रवीनं आपल्या वडिलांना- सुधाकर रावांना `कुणीतरी` आल्याची वर्दी दिली.
परीक्षा
गाडी चालवत असलो तरी डोक्यात विचारचक्र चालूच होतं.
माझी पत्नी- प्रिया सीए चा अभ्यास करतेय.
माझे आई-वडील गावी असतात. पुण्यात आम्ही दोघंच. त्यामुळे मी तिला अभ्यासाला पूर्ण वेळ देतो. पण सीएच्या परिक्षांसाठीचा अभ्यास म्हणजे दिवस-रात्र अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. पुन्हा पुढचे पुढचे अटेंम्प्ट्स देताना आधीच केलेल्या अभ्यासाची तिच तिच उजळणी. एखाद्याला वेडच लागायचं या अतीअभ्यासानं.
“माझी गर्लफ्रेंड व्हॅम्पायर ए.”
“काय?”
“व्हॅम्पायर गर्लफ्रेंड?”
गर्लफ्रेंड आगाऊ, मनमिळाऊ किंवा कामचलाऊ असू शकते, पण डायरेक्ट व्हॅम्पायर?
इरा चहाचा कप खाली ठेवत म्हणाली, “निऱ्या, काही काय बोलतोयस?”
तेव्हा नीरव खाली बघत म्हणाला, “तुमचा विश्वास बसणार नाही..”
“माझा विश्वास, बसला नाही, उडालाय”
माझा विश्वास तर भूमिगत झाला होता. व्हॅम्पायरच्या बाबतीत माझ्या डोक्यात फारच अंधार होता, म्हणून मी विचारले “व्हॅम्पायर म्हणजे तेच ना ते आपले.. ज्यांचा चंद्रप्रकाशात कोल्हा होतो..”