[या कथेला ग्रंथाली वाचक दिन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला होता.]
"अरे आईंचा फोन आला होता." आकाश घरी येताच आकृतीने निरोप दिला. तसे आकाश आणि आकृती एकाच कंपनीत कामाला होते पण मुलगा घरी एकटा असतो म्हणून आकृती नेहमी लवकर घरी येते. आकाशला उशीर होतो.
"उशीर झाला आज"
"ट्रॅफिक. एकदा चंद्रावर मनुष्यवस्ती होईल पण बंगलोरचे ट्रॅफिक सुधारणार नाही. आई काही बोलली का?"
"नाही, सहजच. आल्यावर फोन कर. येवढच."
"बाळूमामासाठी असेल."
"कोण बाळूमामा?"
थिजल्या नजरेने समोर पडलेल्या अचेतन देहांकडे ती सगळी पाहत होती.
"काय करायचं?" बाक्रे गुरुजी स्वत:शीच पुटपुटले.
"’ऑफ’ झाले पाहता पाहता." बाक्रे वहिनी मृतदेहांकडे निरखून पाहत होत्या.
" ’ऑफ’ काय? बटण आहे का माणूस म्हणजे? काहीही तारे तोडता." बाक्रे गुरुजींचा अगदी संताप संताप झाला.
"सगळे तेच म्हणतात म्हणून म्हटलं." वहिनींची नजर अजूनही आजूबाजूला पडलेल्या देहांकडेच होती. कसेबसे त्या दोघांनी सगळे मृतदेह एकाठीकाणी आणले होते.
"काय करायचं ते सांगितलं नाहीत." गुरुजी खेकसले.
माझं नाव नार्या - म्हणजे नारायण कांबळे पण नार्याच म्हणतात मला. शिक्षण - B.Com. तीन वेळा बसून नापास. सध्या क्लार्क आहे एका खाजगी कंपनीत. तर असा मी साधा-सुधा माणूस. पण गम्मत अशी आहे की सर्वांनाच मी साधा-सुधा नाही वाटत. पण लोकांचं काय, त्यांची आणि एखाद्याची मतं नाही जुळली की लगेच त्या माणसाला विचित्र ठरवून मोकळे! माझ्या शेजार्या-पाजार्यांनी , ऑफिसमधल्या सहकार्यांनी मला असच विचित्र माणूस ठरवलय. एवढच काय माझी आई सुध्दा कधी कधी माझ्या बोलण्यावर एकदम टीपं गाळते. म्हणते "देवा, कसं व्हायचं माझ्या या वेड्या लेकराचं?" आता मी काही वेडा आहे का? पण "जाऊ देत", मी म्हणतो.
काटकसर
महाबळेश्वरच्या त्या जराश्या आडवाटेवरच्या खोल दरीच्या वरच्या उंच कड्यावरील जराशा सपाट जागेवर आम्ही दोघं बसलो होतो. सगळीकडे तशी भयाण शांतताच होती. त्या शांततेचा भंग करत सुधा मला म्हणाली,
`हा जो सगळा खर्च तुम्ही चालवला आहे...`
`सुधा... मी तुला काय म्हटलंय, अजिबात पैशाचा विषय काढायचा नाही.` मी तिला मध्येच थांबवत म्हणालो.