कथा

देणं - भाग १

Submitted by jpradnya on 26 March, 2020 - 19:27

फर्रर्रर्र करून दीप्ती च्या स्कूटी ने स्पीड घेतला आणि आशुतोष मागे पडता पडता वाचला.
“ ए थांब थांब “ म्हणून आशु ने दीप्ती ला घट्ट पकडले.
“ हा हा हा हो हो हो ..” दीप्ती चे खिदळणे ऐकून आशु अजूनच चिडला.
“ बर आहे US ला टू व्हीलर्स नसतात फार .. नाहीतर माझ अवघड होतं “
“ डू नॉट वरी डार्लिंग मी फोर व्हीलर मधून सुद्धा तुला पाडू शकते ..”
“ फार उड्या मारू नकोस .. अजून तुला घरून क्लिअरन्स मिळाला नाहीये ..”

प्रांत/गाव: 

उलट तपासणी (भाग १)

Submitted by हर्षल वैद्य on 24 March, 2020 - 05:03

प्रा. पार्थसारथी त्यांच्या खोलीमध्ये चिंताक्रांत मुद्रेने बसले होते. रात्रीचे दहा वाजत आले तरी आज त्यांना घरी जावेसे वाटत नव्हते. त्यांचा प्रयोगशाळा मदतनीस सुहास गेले दोन दिवस आजारी होता आणि रुग्णालयात भरती होता. रोगाचे निदान काही होत नव्हते. तशी लक्षणे साधीच होती. सुरुवातीस खोकला व छातीत भरलेला कफ म्हणून त्याला रुग्णालयात आणला. दोन दिवसांपासून तापही होताच. घरच्या डॉक्टरांचे औषध झाले दोन-तीन दिवस आणि मग आराम पडेना म्हणून भरती केला. लगेच त्याला एक प्रतिजैविकांचा डोसही सुरू केला. पण प्रकृतीस उतार पडायची काही चिन्हे नव्हती. डॉक्टरांनाही कोड्यात पडल्यासारखे झाले होते.

शब्दखुणा: 

प्रमोशन

Submitted by कौस्तुभ_सृजन on 10 March, 2020 - 05:42

“अभिनंदन अविनाश! तुझ्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कंपनी तुला प्रमोशन देते आहे. तुझी निवड हि खास आपल्या चीफ एक्सेक्युटीव्ह ऑफिसर तर्फ़े करण्या आलेली आहे. या प्रमोशन नंतर तुला आपल्या कंपनीतर्फे संपूर्ण युरोप विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पुढच्या एका वर्षात कंपनीचा या विभागातील नफा तीस टक्क्याने वाढविण्याचे आव्हान तुझ्यासमोर असेल. तुझ्या सारखा अत्यंत हुशार, तरुण, तडफदार, कर्तबगार अधिकारीच हे आव्हान यशस्वीपणे पेलू शकतो ह्याची कंपनीला जाणीव आहे आणि म्हणूनच तुझ्या नावावर या प्रमोशन साठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.” अविनाशच्या बॉसने त्याला हि बातमी त्याला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून दिली.

विषय: 
शब्दखुणा: 

अनुभवालय

Submitted by कौस्तुभ_सृजन on 28 February, 2020 - 10:16

अरुणराव मागच्या वर्षीच सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते. जवळपास ३० वर्षांची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर अचानक मिळालेला प्रचंड मोकळा वेळ कसा घालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. परंतु लौकरच त्यांनी आपला मार्ग शोधला. रोज दुपारी चार वाजल्याच्या सुमारास टिळक रस्त्यापासून त्यांची सायंफेरी सुरु व्हायची आणि ती पार फर्ग्युसन विद्यालय रस्ता संपेपर्यंत चालू राहायची. तिथून मग नेहेमीची बस पकडून घरी परत यायचे. अश्याप्रकारे रोजचे सुमारे तीन ते चार तास किंवा काही जास्तीच सहज चालले जायचे.

विषय: 

चिठ्ठी भाग 10

Submitted by चिन्नु on 21 February, 2020 - 09:34

शोभाताईंनी अनुला बळेच उठवून बसवलं तशी मघापासून खुसुखुसु हसणार्या मुग्धाला त्याने तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगितले. पण नीलू आणि मुग्धा अधिकच हसायला लागल्या. आता मात्र अनु चिडला. पण सर्वांसमोर त्याला काही बोलता येईना. तसा त्याने मोर्चा त्याच्या सुमाक्का कडे वळवला-
"जेवायला मिळणार आहे का आज?"
त्याच्या प्रश्नाने गडबडून उठली सुमा.
"अगं बाई, हो हो" म्हणाणार्या सुमाला नीलुने पुढे होऊन खाली बसवलं.
"रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाहीये तुमच्या. मी आणि मुग्धा बघतो काय ते. तुम्ही बसा", अशी ताकीद देत ती आणि मुग्धा कामाला लागल्या.

चटका..

Submitted by ketu83 on 16 February, 2020 - 00:23

एक १० -१२ वर्षांची चिमुरडी. प्राण्यापक्षांची तिला खूप आवड. घरात एक गोजिरवाणे कुत्रे, एक छोटसं मांजराचं पिल्लू आणि सतत वटवट करणारा एक बोलका राघू. या सगळ्यांनी तिचं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं. हे मुके जीव तिच्या लहानश्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. अशातच तिचा तो प्राणप्रिय मोत्या कुत्रा आजारी पडला. काही खाईना-पिईना, सतत मलूल असा पडून राहायचा. ती शाळेला जाताना तिच्या अंगावर उड्या मारून, "मला पण घेऊन चल" असे मुक्याने विनवणारा मोत्या तिला जाताना पाहून फक्त मान वर करून परत मरगळून झोपू लागला.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

चिठ्ठी भाग 9

Submitted by चिन्नु on 30 January, 2020 - 12:48

'कागद? कुठले कागद रे? मला नाही माहित'
सुमाच्या चेहर्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहिल्याबरोबर तीरासारखा उठला अनु. जवळ जवळ उडी मारून तो काॅटखाली आणि आजुबाजूला शोधू लागला. कोनाड्यात, दप्तरात, काॅटच्या वर, चादरीखाली शोध शोध शोधलं. सर्वांनी त्याला थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
अनु इरेला पेटून काॅटखाली शिरला शोधायला. परत काही सापडलं नाही म्हणून तो दातओठ खात बाहेर यायच्या प्रयत्नात कुठल्याश्या टोकाला अडकून त्याचा खिसा फाटला. त्यातून भाजलेले शेंगदाणे बाहेर पडायला आणि जयंत आत यायला एकच गाठ पडली! सगळे जण ते पाहून हसायला लागले.

Pages

Subscribe to RSS - कथा