कथा

लिपस्टिक

Submitted by मोहना on 30 January, 2020 - 08:16

"कसलं आकर्षण वाटतं गं तुला त्या कपड्यांचं?" आईकडे मी दुर्लक्ष केलं. बग्गीकडे कुतूहलाने बघणार्‍या डोळ्यांकडे एक नजर टाकली पण मला त्या नजरांची आता सवय झाली होती. कुतूहल, आश्चर्य आणि कधीकधी आकर्षणही त्या नजरांमध्ये मी पाहिलं होतं. फारसा बदल यात कधी झाला नव्हता पण आम्हाला बघायला येणार्‍या लोकांचा पोषाख बघायला मला फार आवडतं. रंगीबेरंगी बाह्यांचे, बिनबाह्यांचे शर्ट, फ्रॉक, जिन्स, स्कर्ट, किती प्रकार. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर बग्गीत बसलेली मी आणि केवळ आम्हाला बघायला आलेले पर्यटक म्हणजे रस्त्यावर फुललेली रंगाची बाग वाटत राहते ती, कपड्यांमुळे.

शब्दखुणा: 

दंश

Submitted by ऑर्फियस on 23 January, 2020 - 20:15

मयसभेच्या पायरीवर तो उंचापुरा, बलदंड राजपुरुष उभा होता. आजुबाजुला सेवक प्रणाम करून जात होते. पण त्याचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारांमध्ये व्यग्र होता. प्रतिपक्षाने काही वर्षातच प्रचंड प्रगती केली होती. राजसूय यज्ञ केला होता. ती आपलीच भावंड असली तरी पुढे केव्हातरी त्यांचा आपल्याशी संघर्ष होणार हे त्याला कळून चुकले होते. त्याने गदा हातात पेलली. ती हातात असली की कसलेच भय नव्हते. जगात कुणीही गदायुद्धात त्याला हरवू शकणार नव्हते. हे सारं वैभव मूळात आपलं आहे हा नेहेमीचा विचार त्याच्या मनात आला. आपला पिता अंध निपजला त्यात आपला काय दोष?

शब्दखुणा: 

चिठ्ठी भाग 2

Submitted by चिन्नु on 25 December, 2019 - 10:13

चिठ्ठी भाग 1- https://www.maayboli.com/node/72811

"एखादं छानसं भजन म्हण ना मुग्धा", वाती तुपात बुडवत शोभाताई म्हणाल्या.
"कुठलं म्हणु?"
"कुठलंही म्हण अगं ", अनुला जवळ घेऊन कुरवाळत शोभाताई म्हणाल्या.
"किती वेळ लावशील? मी असतो तर आतापर्यंत म्हणून देखील झालं असतं आणि प्रसाद देखील खाऊन झाला असता..देवाचा", अनुच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून मुग्धाने गायला सुरवात केली.

"तुझी पदकमले मज शतकोटी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी||

Pages

Subscribe to RSS - कथा