katha

शोक

Submitted by पराग र. लोणकर on 6 January, 2024 - 23:27

शोक

साहित्य क्षेत्रात जगन्मित्र असलेल्या प्रसिद्ध आणि प्रतिभासंपन्न साहित्यिकाच्या अचानक आणि अवेळी झालेल्या निधनाने मी सुन्न होऊन गेलो होतो. माझा आणि त्यांचा खूपच जवळचा, घनिष्ठ संबंध होता.

प्रोफेशनल फोटोग्राफर आणि तोही साहित्य क्षेत्राशी सदासर्वदा निगडित असल्यामुळे तसं विनयाने सांगायला गेलं तर मीही जगन्मित्रच होतो. साहित्य क्षेत्रात... त्यामुळे आता या साहित्यिकाच्या निधनाची बातमी कन्फर्म करण्यासाठी, त्याबद्दल दुःख आणि शोक व्यक्त करण्यासाठी मला फोन येण्याचा ओघ चालू होणार असं मला अपेक्षित होतंच, आणि घडलंही तसंच.

शब्दखुणा: 

तर्क द लॉजिक (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 26 August, 2018 - 15:37

(सूचना जोर गरम:
ही नवीन, स्वतंत्र कथा आहे, या कथेचा काथ्याकूट सिरीजशी काहीही संबंध नाही, काथ्याकूटच्या पुढच्या भागाचं लेखन सुरु आहे, लवकरच पोस्ट करेन)
................................................................................................................................

शब्दखुणा: 

काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप

Submitted by चैतन्य रासकर on 27 September, 2017 - 13:47

काथ्याकूट (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 8 September, 2017 - 16:17

"डिव्होर्सच कारण काय होतं?"
"इराचं अफेअर होतं ना"
"अफेअर? सवालच नाही!" नीरव म्हणाला.
मी नीरवकडे बघितले, एवढा आत्मविश्वास? कसा काय? एखादा माणूस जर ठामपणे एखादी गोष्ट सांगत असेल, तर विश्वास ठेवायचा?
"अनिकेतचं अफेअर आहे" नीरव पुढे म्हणाला.
"कशावरून?" नित्याने विचारले.
"मला इरा म्हणाली" नीरव म्हणाला.
"कधी?" मी विचारले.
"सात-आठ महिने झाले असतील" नीरव म्हणाला.

अफेअर म्हणजे भ्रष्ट्राचार! कोणाचं कुठे चालू आहे, माहित नसतं, पण चालू लोकांचा चालू असतो.

सरतेशेवटी (भाग दोन)

Submitted by चैतन्य रासकर on 24 December, 2016 - 00:48

सरतेशेवटी (भाग एक): http://www.maayboli.com/node/61163

सरतेशेवटी (भाग दोन):

"दरवाजा उघडा होता म्हणून आत आलो, डोअरबेल वाजवली होती....." तो बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात, डॉक्टर त्याच्यावर खेकसले "कोण तुम्ही?"

"सर, मी गिरीश"

तो तरुण म्हणाला, यावर कोणी काहीच बोलले नाही, सगळेजण स्तब्ध झाले, शांतता पसरली, सगळेजण त्या तरुणाकडे रोखून बघू लागले, बाहेर पाऊस वाढतच होता.

त्याने पुढे बोलायला सुरुवात केली "मागच्या आठवड्यात आपण बीचवर भेटलो होतो"

डॉक्टर त्याच्याकडे रोखून बघू लागले, संपादक खडबडुन जागे झाले, संजय त्याच्याकडे बघत "गिरीश म्हणजे..." एवढेच काय तो पुटपुटला.

संभ्रम-ध्वनी (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 27 October, 2016 - 03:47

मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती.

कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली.

विषय: 

शृंगार ५

Submitted by अनाहुत on 31 August, 2015 - 07:12

एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .

शृंगार ४

Submitted by अनाहुत on 26 August, 2015 - 12:48

मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .

" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "

" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "

" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "

sutaka

Submitted by Babaji on 24 May, 2014 - 15:10

माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या मुन्जीचं आमन्त्रण होत. पण मला जायच नव्हत. बाहेर कुनाच्यात मिसळावस वाटत नाहि. कुणी घरी आल तरी गप्पा मारव्याश्या वाटत नाही. कधि एकदाचि जाते ब्याद अस होत. पुर्वी आवर्जुन बोलावनारे मित्र पण टाळतात आता. हीच एक मैत्रिण टिकुन आहे. तिला बहुतेक माझ्याबद्दल सहानुभुति वाटते अस कधी कधी वाटत. बाय़कोचि आणि तिची पण चांगली मैत्री असल्याने तिच्याशी पण जास्त बोललं नाहि तरी चालतं. पुर्वी ती आली कि चवकश्या करायचि. मग कदाचित मला डिसटर्ब होत हे तिच्या लक्शात आलं असेल. बायको आधी माझि बाजू सावरुन घ्यायचि. पण आता बिनधास्त तक्रारी करते हे या कानाने ऐकल आहे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - katha