नाते

गुंता..

Submitted by @गौरी on 8 June, 2021 - 06:40

गुंता हा भावनांचा, गुंता हा शब्दांचा,
न मिटलेल्या वादांचा, न सांधलेल्या भेगांचा,
चिमूटभर प्रेमाने, मणभर राग जिंकल्याचा,
पसाभर माया, कणभर अहंकारात विरल्याचा,

कुणामधे हरवण्याचा, कुणाला जोखण्याचा,
गुंता साऱ्या आयुष्याचा, सतत शोध घेण्याचा,
इवल्या थेंबात आकाश कवेत घेण्याचा,
आकाशी पसरून थेंबाला जपण्याचा॥

शब्दखुणा: 

नाते

Submitted by Asu on 20 January, 2020 - 10:41

नाते

नाते असावे मनाचे
नसावे केवळ तनाचे
नात्याचे बंधन नसावे
हृदयाचे स्पंदन असावे

नाते असावे प्रेमाचे
नसावे नुसते कामाचे
नात्याला अर्थ असावा
केवळ स्वार्थ नसावा

नाते असावे वास्तव
नसावे लोक लाजेस्तव
जगण्याची जान असावे
आयुष्याची शान असावे

नात्याचे ओझे होता
मनाने खुजे होतो
शरीराने जवळ असून
एकमेकां दुजे होतो

दुधावरची मलई तशी
आयुष्याची कमाई असते
नात्याविना जगणे रुसते
नात्यातच जगणे हसते

शब्दखुणा: 

नाते

Submitted by राजेंद्र देवी on 22 May, 2013 - 07:03

नाते...

हे सारे तेव्हाचं ठरले होते
जेव्हा नाते नुरले होते

मी रिता झालो सारे सांगून
तू ठेवले सारे हातचे राखून
हे सारे तेव्हाच ठरले होते
जेव्हा ग्रह आकाशीचे फिरले होते

त्या विश्वात एकटा मी होतो
दिवस जेथे सारे सरले होते
हे सारे आठवणीतच राहिले
ते विश्व तरी आता कोठे उरले होते

मी खूप प्रयत्न केले ते चित्र पुन्हा साकारण्याचे
ते रंग पण आता कोठे उरले होते
हे गीत जरी स्फुरले मज
शब्द त्याचे विरले होते

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

ऊन-सावली नाते अपुले

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 8 November, 2012 - 01:54

पानावरच्या दवबिंदूपरी
सजते, निसटुनिया विरते
ऊन - सावली नाते अपुले
कधी हसते अन्‌ कधी रुसते

कधी हिरवाईच्या मखमाली
भिरभिरते अन्‌ बागडते
कधी काहिली, कधी होरपळ
कधी पेटुनी धगधगते

कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी
चमचमते अन्‌ लखलखते
कधी गर्द अवसेच्या राती
काळोखातुन पाझरते

लडीवाळ कधी मोरपिसापरी
हळुच कानी कुजबुजते
कधी अनावर प्रपातापरी
दुमदुमते अन्‌ कोसळते

कधी मौनाच्या बंद क्षणांनी
हिरमुसते अन्‌ मुसमुसते
कधी शब्दांच्या पागोळ्यातुन
गहिवरते अन्‌ रिमझिमते

विरहाच्या एकांती नाते
उष्ण आसवांनी भिजते
गंध मोगर्‍या मीलन राती
फुलून गात्री दरवळते

शब्दखुणा: 

प्राजक्ताच्या पावसात निर्वस्त्र

Submitted by pradyumnasantu on 4 December, 2011 - 22:05

प्राजक्ताच्या पावसात निर्वस्त्र

विचित्र रात्र
मी ग्लानीत
ती येते

ती मला स्पर्षते
मला न्याहाळते
मी उत्तेजित
ती घालते माझ्या वस्त्रांना हात
आणि मी निर्वस्त्र
बावरलेला, तरीही
नैसर्गिक भावनांच्या अंकीत
त्या विचित्र रात्री
***
एकाएकी आकाश निरभ्र व्हावे अन श्वास ताजा व्हावा
तसा होतो तिच्या आवाजाचा शिडकावा :
***
"पेशंट अन नर्स हे वेगळे नाते
तुमचे स्पंजिंग करणे हे माझे कर्तव्य येथे
मातेच्या हाताने तुम्हाला स्पर्शिन
मातेच्या नजरेने तुम्हाला पाहीन"
***
ग्लानीत मला दिसतो प्राजक्ताच्या फुलांचा पाऊस
आगळी प्रतिमा उमटते नेत्री
त्या विचित्र रात्री

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काय गुण सांगू माझ्या सालीचे

Submitted by पाषाणभेद on 31 August, 2011 - 19:16

काय गुण सांगू माझ्या सालीचे

माझ्या सालीचे काय गुण सांगू माझ्या सालीचे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||धृ||

ती घरात येते तर एकदम जसे चक्रीवादळ येते
भाऊजी भाऊजी म्हणत ती माझ्या मागे फिरत असते
नटते थटते लाजत मुरडते
मी जरा बोललो तर लाजून आखडते

भरल्या घरात शोभतात का तिला हे असले धंदे?
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||१||

एकदा मी ऑफीसातून घरी लवकर गेलो
ती एकटीच घरी असल्याने चिंतेत पडलो
तेव्हढ्यात तिने विचारले भाऊजी इकडे जरा येणार का?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

राखी : रक्षाबंधन

Submitted by अबोली on 26 July, 2011 - 07:09

नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,

स्वहस्ते बनवलेल्या राख्या सादर करताना खूप आनंद होतोय!

DSCN2145.JPGDSCN2130.JPG240720114475.jpgतुमच्या भावाचे नाव राखीवर हवे आहे का?

DSCN2390.JPG

धन्यवाद.

गुलमोहर: 

शब्दा॑च्या पलीकडचे

Submitted by अशोक तेलोरे on 12 June, 2011 - 00:41

नाते तुझे नि माझे शब्दा॑च्या पलीकडचे !!ध्रु!!
शब्दात सा॑गता येत नाही
बोलुनी कळनार नाही
ते फक्त डोळ्या॑नी अनुभवायाचे
नाते तुझे नि माझे शब्दा॑च्या पलीकडचे !!१!!
कशी शब्दात उपमा देऊ
कसे ह्र्दयात साठ्वुन ठेऊ
ते फक्त स्पर्शानी जानून घेण्याचे
नाते तुझे नि माझे शब्दा॑च्या पलीकडचे !!२!!
द्रुढ कल्पना माझ्या मनात
कशी उतरवु हया कवितेत
ते फक्त नसे वदनी बोलण्याचे
नाते तुझे नि माझे शब्दा॑च्या पलीकडचे !!३!!
किती प्रेम दिले तुजला
किती तु दिले मजला
हा हिशोब नसे देण्या घेण्याचे
नाते तुझे नि माझे शब्दा॑च्या पलीकडचे !!४!!
.....अशोक गो. तेलोरे (९७६७८९२७१८)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नाते