लेखन

भुतंखेतं

Submitted by जिन्क्स on 26 July, 2020 - 12:38

महिन्यातून एकदा ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्याच टेरेस वर रात्री जमून भोजनाचा आनंद घेत उशिरा पर्यंत गप्पा मारणे हा आमचा त्या वेळचा प्रघात होता. आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा आणि त्याचा आस्वाद घेत आमच्या गप्पा रंगायच्या. एका रात्री असाच तो मित्र याखनी पुलाव घेऊन आला होता. टेरेस कडे जातच होतो तेवढ्यात मी पाहिले की आमच्याच ऑफिसचा एक सीनियर डेव्हलपर एकटाच काम करत बसला होता. मी त्याला आमच्या सोबत यायचा आग्रह केला. तो आधी तयार नव्हता पण नंतर तयार झाला. त्या रात्री गप्पा अचानक भुतांच्या विषयावर आल्या.

मौन जास्ती बोलके ठरते म्हणा !

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 July, 2020 - 03:12

मोडला आहे जरी माझा कणा
काढतो आहे फणा हा 'मी' पणा

दोन आणिक दोन म्हणजे पाच का ?
प्रश्न हा नाही पडत तो शाहणा

नेमके राहून जाते बोलणे
मौन जास्ती बोलके ठरते म्हणा !

संकटांची वादळे घोंघावती
संभ्रमांचा त्यात वाजे तुणतुणा

शून्य उरले हातचा मिसळूनही
भरवसा नात्यात झाल्यावर उणा

प्रेम होते, प्रेम आहे अजुनही !
स्वच्छ कर, दिसतील हृदयावर खुणा

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 

निरोप

Submitted by पाचपाटील on 25 July, 2020 - 14:50

'हॅलोss'
'''हॅलोs.. कसं काय आज..!!!'''
'लग्न करतेय'
'''हो.. ते समजलं मला"'
'मग काय करणार मी अरेss..? तुझं पण काही खर्‍याचं नाही.. किती दिवस चालणार हे असं..??'
"'खरंय'''
'बोल ना काहीतरी'
'''तू सांग.. काय करतो तो? कसा आहे?'''
'आहे... चांगला आहे... व्यवस्थित आहे सगळं'
'''अच्छा'''
'तू पण करून घे आता'
'''नाही.. मला नाही वाटत तसं.... पण बघेन म्हणजे.. करेन सुरुवात.. तुला तर माहितीच आहे सगळं..'''
'हम्म'
'''बरं.. ऐक ना... एक बोलू काय?"'
'हम्म'

विषय: 
शब्दखुणा: 

पावसाचा मूड

Submitted by मिरिंडा on 25 July, 2020 - 05:48

आता श्रावणात
आषाढ असतो
आषाढात श्रावण
श्रावणातला मानसीचा हर्ष
आता आषाढातच फुलतो

सगळंच कसं उलटं
त्यामुळे कविता पण
अवेळी होतात
अपेक्षा नसताना
होणाऱ्या गर्भधारणेसारख्या

आमच्या वेळी पावसाची
बर्थडेट चार जून होती
दणकून पाऊस पडायचा
लोकल बंद, बस बंद
जणू जॉर्ज फर्नांडिसचाच
" बं द "

आता पावसाची
बर्थडेट होते मागेपुढे
पण पाऊस मात्र
मारतो दडी
महिना पंधरा दिवस साठी

कशी होणार कविता
बालकवीं सारखी
हल्ली बारकवी जास्ती
बालकवी एखादाच

पावसाचा मूड

Submitted by मिरिंडा on 25 July, 2020 - 04:33

पावसाचा मूड

आता श्रावणात
आषाढ असतो
आषाढात श्रावण
श्रावणातला मानसीचा हर्ष
आता आषाढातच फुलतो

सगळंच कसं उलटं
त्यामुळे कविता पण
अवेळी होतात
अपेक्षा नसताना
होणाऱ्या गर्भधारणेसारख्या

आमच्या वेळी पावसाची
बर्थडेट चार जून होती
दणकून पाऊस पडायचा
लोकल बंद, बस बंद
जणू जॉर्ज फर्नांडिसचाच
" बं द "

आता पावसाची
बर्थडेट होते मागेपुढे
पण पाऊस मात्र
मारतो दडी
महिना पंधरा दिवस साठी

कशी होणार कविता
बालकवीं सारखी
हल्ली बारकवी जास्ती
बालकवी एखादाच

सोबत

Submitted by ज्येष्ठागौरी on 25 July, 2020 - 00:55

सोबत
बारा वर्षांपूर्वी नवीन घर बघायला आलो, सगळ्यात कुठली गोष्ट आवडली तर स्वयंपाकघराला लागून असलेल्या ड्राय बाल्कनीमधून दिसणारं नारळाचं झाड.अगदी तीन हातावर असणारं हे झाड एकदम आवडून गेलं.त्याला अर्थात कारण म्हणजे माझ्या माहेरी असणारी नारळाची झाडं, पण ती फार उंच होती , काही दिसायचं नाही जवळून.हे झाड मात्र खूप जवळून पाहता आलं.बराच वेळ त्यावर बसणारे छोटे पक्षी,येणारे छोटे नारळ, त्याच्या झावळ्या बघण्यात जातो माझा.म्हणजे सत्कारणी लागतो.

विषय: 

अति शहाण्यांची जत्रा

Submitted by लेखक अनि on 24 July, 2020 - 05:28

गावाचं नाव मोरेवाडी, गुहेत खजिना सापडतो पण या वाडीत मोरे जरा जास्तच सापडले. आणि यांनी पण लगेच नामकरण करून घेतले अस म्हणायला हरकत नाही. तस गाव साऱ्या धर्म , जातीच्या व्यक्तींनी भरलेलं असुन काही कुणाची ओळख त्यावरून नव्हती.

सलीम भाई गावचे सरपंच, उपसरपंच आप्पा मोरे, खुनशी राजकारण नव्हते गावात. पण जत्रेवरून लई तुफान भांडणे व्हायचे बघा!!!

३-४००० लोक वस्ती असलेल्या मोऱ्यांच्या मोरेवाडी मध्ये सर्वात तरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे आबा उर्फ नीलकंठ मोरे, वय फक्त ७५ वर्ष, त्यांच्या बरोबरचे आबाची वाट पाहतच होते स्वर्गात.

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

Submitted by अनिथ on 23 July, 2020 - 01:22

शेतकरी आमचा बाप
कधी राहिल टिपटाप ?

आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||

असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?

मायाजाळ : ३

Submitted by अलंकार on 22 July, 2020 - 06:45

मायाजाळ : ३

चार पाच दिवसांनी सगळेजण घडलेला प्रसंग विसरून गेले आणि मी हि तो विचार मनातून काढला आहे असं वागत राहिले.
कुर्ती बनवायला मैत्रिणीकडे चाललेय सांगून मी घरातून निघाले, मी नक्की कुठे चाललीये ह्यावर आई लक्ष देऊन होत्या म्हणून मी नीट रस्त्याने जाऊन उलट्या बाजूने इमारतीच्या मागच्या बाजूला स्कुटी घेऊन गेले. भीती खूप वाटत होती पण मनाची तयारी केली होती कि सोक्षमोक्ष लावायचाच.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन