लेखन

मन वढाय वढाय (भाग १८)

Submitted by nimita on 22 February, 2020 - 22:45

स्नेहाकडून होकार मिळाल्यावर आता दोन्ही घरांत लगीनघाई सुरू झाली.किती मंतरलेले होते ते दिवस ! सगळीकडे नुसता उत्साह आणि आनंद भरून वहात होता. दोन्ही कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनी आपली सगळी हौस भागवून घ्यायचं ठरवलं होतं. त्या सगळ्या घाईगर्दीत मधूनच कधीतरी एका निवांत दुपारी स्नेहा तिच्या कपाटातलं सगळं सामान आवरत होती. काय ठेवायचं, काय बरोबर घेऊन जायचं - काहीच सुधरत नव्हतं. तिनी नेहेमीप्रमाणे मदतीसाठी आईकडे धाव घ्यायचं ठरवलं.

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

Submitted by पाषाणभेद on 22 February, 2020 - 19:48

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

एक उदासी

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 February, 2020 - 01:21

एक उदासी
व्यापून उरते

अस्तित्वाच्या
चिंध्या उडवत
स्वप्नांचा पाचोळा तुडवत
भल्या पहाटे
चक्क कुडकुडत
मिठीत येते

एक उदासी
भक्क दुपारी
झुळकीसोबत
गालांवरच्या बटा सरकवत
सुकल्या ओठा
स्पर्शून जाते

एक उदासी
संध्याकाळी
गहिरी होते
डोळ्याच्या पापण्या पाणवत
गालांवरती जरा विसावत
देवघराच्या समयीमध्ये
वातीसोबत जरा थरथरत
घरभर उरते

एक उदासी
उघड्या डोळ्यांसमोर
नाचत
रात्र-रात्रभर उश्या-पायथ्याशी
रेंगाळत
जागत बसते

विषय: 

अनाकलनीय

Submitted by Happyanand on 21 February, 2020 - 12:31

अथांग रेतीच्या सागरात
रस्ता चुकला एक प्रवासी
वाट दाखवत असे वाटाड्या
तरी गाठ त्याची प्राणाशी
मृगजळा पलिकडे पाहिलं डोकावून
विहग उडे तो आकाशी
स्थुलरुपी सोडुन काया
अणु फिरे तो अवकाशी....

विषय: 

छापील नियतकालिके : अनुभव आणि आठवणी

Submitted by कुमार१ on 19 February, 2020 - 23:53

पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला.

विषय: 

मन वढाय वढाय (भाग १७)

Submitted by nimita on 19 February, 2020 - 20:23

टेलिफोनच्या रिंग मुळे रजत आणि स्नेहाची भावसमाधी भंग पावली. रजतच्या हातातून आपले हात सोडवून घेत स्नेहा फोनच्या दिशेनी पळाली.वंदनामावशी चा फोन होता. तिला रजतशी बोलायचं होतं. स्नेहानी रजतला हाक मारली -"रजत, मावशीला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही बोलून घ्या तोपर्यंत मी मागचं दार बंद करून येते, मग आपण निघू या."

थोडंसं हलकं होऊया...

Submitted by Nandkishor Lele on 18 February, 2020 - 06:48

नववर्षात ' हलकंफूलकं' या सदरातून आपल्याशी संवाद साधणार आहे.

लेख - थोडंसं हलकं होऊया...

विषय: 

पटरी-२

Submitted by x man on 17 February, 2020 - 02:41

गाडी भरधाव वेगाने हास्पिटल कडे निघाली. ती काळ्या काचांची scorpio होती.

कधी कधी आपला मेंदू इतक्या जलद गतीने काम करतो की काही कालावधी नंतर घडलेली घटना समजून येते. अगदी सेंकदाच्या हजारव्या भागात निर्णय घेतले जातात. असे निर्णय की ज्यांचा परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगायला लागनार असतात. त्यावेळीही असाच एक निर्णय घेतला गेला...

शिवाजी चौकाच्या डावीकडे हास्पिटलला जाणारा रस्ता तर उजवीकडे वखार महामंड्ळाची उंच भिंत असलेला रस्ता होता.

" लेफ़्ट में "ड्रायव्हरचा खांदा धरून मी ओरडलो

विषय: 
शब्दखुणा: 

मन वढाय वढाय (भाग १६)

Submitted by nimita on 16 February, 2020 - 21:54

स्नेहाचं बोलणं ऐकून रजतला सुरुवातीला थोडा धक्का बसला. तो इतक्या वर्षांपासून ओळखत होता स्नेहाला...अगदी रोज जरी भेटत नसले तरी महिन्यातून एक दोन वेळा तरी येता जाता भेट व्हायचीच... मोस्टली दोघांच्या आयांच्या मुळे...पण आजपर्यंत कधीच रजतला स्नेहाच्या वागण्या-बोलण्यातून असं काही जाणवलं नव्हतं. तिचं त्या दुसऱ्या मुलाबरोबरचं नातं इतकं पुढे गेलं असल्याची कोणतीच निशाणी त्याला दिसली नव्हती. आणि म्हणूनच आत्ता स्नेहानी दिलेल्या या कबुली मुळे तो जरा गोंधळून गेला होता.

निळा!

Submitted by kulu on 16 February, 2020 - 00:46

खरंतर निळा हा काही माझ्या अत्यंत आवडत्या रंगांपैकी नव्हेच, पण तरीही ह्या निळ्यानेच मला सगळ्यात जास्त दर्शन दिले आहे. माझे अत्यंत प्रसन्न निसर्गदर्शन सगळे या निळ्याशी संबंधित आहे. क्रूझवर डेकवर बसलं कि समोर दर्याचा स्वच्छ ओला निळा क्षितिजापर्यंत ताणलेल्या धुतल्या निळ्या वस्त्रासारखा पसरलेला असतो आणि त्याच्या वर आकाशाचा निळा त्याला भेटायची घाई करत असतो. हे निळे बदलत जातात, हवेत बाष्प असलं कि पांढुरका निळा, पाऊस पडणार असला कि करडा निळा पण मला आवडतो तो पाऊस पडल्यानंतर अभ्रकाचे ऊन पडल्यावर दिसणारा निळा. तो स्फटिकासारखा पवित्र निळा, बाळाच्या निरागस हसण्यासारखा.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन