रंजिशही सही

आर्त साद ... मला कळलेली रंजिशही सही

Submitted by abhishruti on 18 June, 2025 - 12:47

एखादी गझल ऐकल्यावर ती मनाला इतकं वेड लावते हे मी माझ्या खरंतर नकळत्या किंवा अडनाडी वयात अनुभवलं. आठवीत असेन जेव्हा मी ही गझल पहिल्यांदाच मुंबईत ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर एका नवोदित गायिकेच्या (जसपिंदर नरूला) तोंडून ऐकली. तेंव्हा किती शब्द कळले, किती अर्थ समजला अलाहिदा, पण मनात घर केलं या गझलने इतकं नक्की! कोकणात तेंव्हा टीव्ही वगैरे अजून आले नव्हते त्यामुळे त्यानंतर बरेच महिने मला ती गझल परत ऐकता नाही आली! आत्ता सारखं गुगलवर जाऊन शोधून काढून ऐकणं ही तेंव्हा कविकल्पना म्हणून सुद्धा मान्य झाली नसती.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रंजिशही सही