लेखन

मी अजिबात घाबरत नाही....! - २

Submitted by मी मधुरा on 23 September, 2019 - 22:55

भाग २

तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू.

शब्दखुणा: 

खडतर आयुष्य ! तीच-५

Submitted by रिना वाढई on 23 September, 2019 - 08:37

हिवाळ्यातली ती गुलाबी थंडी आणि अशात कुणाला बरे अंथरुणातून ६ वाजता उठावेसे वाटणार !
तिला तर अजिबात नाही !
६ काय ती तर ८ वाजता सुद्धा पहाटे ५ वाजता उठल्यासारखी आळस देत उठायची .

विषय: 

रंग मातीचा

Submitted by _तृप्ती_ on 22 September, 2019 - 23:29

हा पॉटरी स्टुडिओ तिच्या ऑफिसच्या अगदी जवळच होता. ती तिथे ३-४ वेळा तरी जाऊन आली होती. पण वर्कशॉपला जायला जमत नव्हतं. ती पहिल्यांदा आली ते निव्वळ वेळ घालवण्यासाठी. घरी जाऊन करण्यासारखं काहीच नव्हतं आणि ऑफिसमध्ये नसलेली कामं करत वेळ काढणार तरी किती. आतमध्ये एका बाजूला वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे, मातीचे घडे, कप, भांडी, मूर्ती आणि अजून काही सुंदर वस्तू मांडून ठेवल्या होत्या. मागे मंद संगीत सुरु होतं. ती एक एक वस्तू न्याहाळत पुढे चालली होती. प्रत्येक वस्तूसमोर ती बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आणि मुख्य म्हणजे वयही लिहिलं होतं. तिला सुरुवातीला वाटलं, वय लिहिण्यात काय अर्थ आहे. मग तिच्या लक्षात आलं.

शब्दखुणा: 

ते नक्की काय होतं???

Submitted by निन्या सावंत on 21 September, 2019 - 13:59

आज खुपंच उशीर झाला निघायला, काय करणार कामच तसं होत, पूर्ण केल्या शिवाय निघणं शक्य नव्हतं. आधी दमन च्या साईट वर पकलो होतो तिथून संध्याकाळी साडेचार ला निघालो. वापी स्टेशन ला यायला पाच वाजले. पुढची ट्रेन साडेपाच ची होती, वेळ जावा म्हणून टपरिवरून सिगारेट घेतली आणि ओढत बसलो. तितक्यात मॅनेजर चा कॉल आला, एक इंजिनिअर तारापूर ला एका कॉल वर अडकला आहे, तू जाऊन बघशील का? म्हटलं जाईन पण पोचायला सात वाजतील.

विषय: 

खडतर आयुष्य ! तीच-४

Submitted by रिना वाढई on 21 September, 2019 - 08:18

तिला होस्टेल वर सोडायला तिचे बाबा सोबत गेले होते आणि संध्याकाळ व्हायच्या आत परतले सुद्धा . आता समोरचा प्रवास तिला एकटीलाच करायचा होता . १२ वि च्या निकालामुळे बाबा तिच्यावर थोडे नाराजच होते . "आता निदान समोर तरी अशी चूक नाही करशील म्हणजे झालं" . ते प्रवासात तिला सारखी एकच गोष्ट सांगत होते , आम्ही तुला कितीही शिकवायला तयार असलो तरी , अभ्यास तुलाच करायचा आहे . १० वि पर्यंत मराठी मिडीयम असल्यामुळे तुला हे पॉलीटेकनिक थोडं कठीणच जाणार , आणि १२ वि ला सायन्स जरी घेतली असशील तरी त्यामध्ये काही फारसे चांगले मार्क्स मिळाले नाहीत .

विषय: 

पुन्हा एकदा

Submitted by Ravi Shenolikar on 21 September, 2019 - 02:48

शेवटची चढण चढून ती कड्याच्या टोकाशी येऊन उभी राहिली. खालच्या खोल दरीत तिने डोकावून पाहिले. बस्स, आता एक उडी आणि संपेल एकदाचे सर्व काही. दारूण निराशा, दु:ख, वेदना....सगळ्याला पूर्णविराम. कायमचा.
तिने मान वर करून पाहिले. अनंत निळे आकाश सर्वदूर पसरले होते. केवढी अफाट आहे ही सृष्टी! थांगच लागत नाही. अंतराळात अशा किती सृष्टी आहेत त्याची गणतीच नाही. क्षितिजापर्यंत तिची नजर जाऊन भिडली. त्या भव्यतेपुढे तिला तिचे दु:ख फार क्षुद्र वाटू लागले. अशी होते का मी? पराभव स्वीकारणारी, पळपुटी? कधीच नाही. संघर्षाला मी कधीच घाबरले नाही. मग आज इथे का आले आहे?

विषय: 
शब्दखुणा: 

अनामिक

Submitted by सामो on 21 September, 2019 - 00:15

i do not know what it is about you that closes
and opens;only something in me understands
the voice of your eyes is deeper than all roses
nobody,not even the rain,has such small hands- E. E. Cummings

खरं आहे, त्याच्या व्यक्तीमत्वातील असे काय आहे , जे कधी उमलतं, तर कधी मिटून जातं? - तिला कधीच समजलं नाही. अन ते तसं पकडीत न येणं, न समजणं, त्याचं कविता असणं हे फक्त वेड लावणारं होतं. अनेक संदर्भ, उत्तरं टाळणं, अर्थ, गाळलेल्या जागा भरा समोरच्यावर सोडून देणं .... अगदी कवितेसारखं.

विषय: 

मुलीसाठी नावं सुचवा..!!

Submitted by PankajSaner on 20 September, 2019 - 07:14

मायबोलीकर नमस्कार..!

अनंत चतुर्दशी ला आमच्या घरी लक्ष्मी च्या रूपाने कन्या रत्नाचा जन्म झाला..!

कृपया सगळ्यांनी बाळासाठी दोन अथवा चार अक्षरी नावं सुचवा..!!
(गणपतीशी निगडीत असतील तर उत्तम)
उदा. रिद्धी, सिद्धी, पारिजात इ.

Pages

Subscribe to RSS - लेखन