लेखन

मनस्वी

Submitted by Asu on 29 October, 2018 - 07:15

'मनस्वी'

'मनस्वी' की तपस्वी
अंक असेल वेगळा
रंगबिरंगी अन् सुगंधी
सर्वां लाविल लळा

मनमोहक मोरपिसावर
पडे प्राजक्ताचा सडा
मुखपृष्ठ पाहुनि याचे
कुणीही होईल वेडा

अंक नव्हे गमतो मजला
हा काव्य फुलांचा मळा
सुगंध घेण्या मन आतुरले
मी झालो खरोखर खुळा

मनस्वीच्या अंकाला
करू मानाचा मुजरा
काव्यरसे रंगून गुंगून
होई दिवाळसण साजरा

शब्दखुणा: 

अव्यक्त अद्वैत

Submitted by Asu on 25 October, 2018 - 23:08

अव्यक्त अद्वैत

तुझ्या हसण्याने नभात चंद्र धुंद होतो
तुझ्या नसण्याने वनात वारा कुंद होतो

मनाच्या अंधारात दुःखांध भास होतो
दुखऱ्या क्षणाला चांदण्यांचा छंद होतो

सहवास चांदण्यांचा वा नको मोगऱ्याचा
मिटून मीच माझिया हृदयात बंद होतो

हसणे रुसणे तुझे, आकाश आठवणींचे
डोळे मिटून नभाच्या मिठीत बंद होतो

ओळख नकोच देउ, घे पांघरून अंधार
माझ्याही डोळ्यात बघ प्रकाश मंद होतो

माझ्या हृदयी तुला आणि तुझ्या हृदयी मला
अद्वैत स्पंदनांचा व्यर्थ आनंद होतो.

शब्दखुणा: 

एक रहस्यमयी डोंगर 1

Submitted by Vaibhav Bhonde on 23 October, 2018 - 03:15

रविवारचा दिवस होता.राम आणि सचिन यांना अभ्यासाचा खूप कंटाळा आला.होता.दोघांनीही कोठेतरी फिरायला जावेसे वाटत होते.मग त्यांनी गावाच्या शेजारी १५ कि.मी अंतरावर असलेल्या डोंगरावर जायचे ठरविले. त्या डोंगराकडे शक्यतो कोणीही जात नसे.त्या डोंगराबद्दल बर्याच अफवा होत्या .

विषय: 
शब्दखुणा: 

शरद पौर्णिमा

Submitted by Asu on 23 October, 2018 - 01:14

*प्रा.अरुण सु.पाटील आणि सौ.वसुंधरा पाटील यांचेकडून सर्व आप्तेष्ट आणि रसिकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !*

*शरद पौर्णिमा*

क्षीरसागरी स्वच्छंद पोहुनि
चंद्र झालाय वेडा
धुंदफुंद नभी घालतो
धवल दुधाचा सडा

बासुंदीचे पाट धरतो
रात्र जागुनि खुळा
नभाच्या अंगणी फुलवि
चांदण्यांचा मळा

दुग्धशर्करा योग होता
उधाण ये प्रीतीला
प्रियासंगे संग रंगता
सुगंध ये रातीला

शब्द शब्द मिटता
भाव झाला मोकळा
शृंगार असा रातीला
‌‌कणाकणात झोकला

शब्दखुणा: 

रफाल - शेवटचा भाग

Submitted by रणजित चितळे on 22 October, 2018 - 23:52

ह्रया आधीचे

https://www.maayboli.com/node/67787 - भाग १
https://www.maayboli.com/node/67797 - भाग २

भाग ३ - संरक्षण खरेदी प्रक्रियेबद्दल थोडेसे

आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी

शब्दखुणा: 

शरदाचं चांदणं (तनिष्काच्या ऑक्टोबर अंकात आलेला माझा लेख )

Submitted by स्मिता द on 22 October, 2018 - 06:20

तनिष्काच्या ऑक्टोबर अंकात आलेला माझा लेख
......................................................................................................................
शरदाच चांदणं
आवडता ऋतू म्हणजे शरद. हा हिवाळा सुरू होण्या आधीचा काळ. या दिवसांमध्ये, पावसाळा नुकताच संपलेला असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक असते . नवरात्र, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा,.. हे उत्सव सोहळे या शरदातले.

स्मिता दोडमिसे

विषय: 

प्रेम तरंग

Submitted by Asu on 21 October, 2018 - 21:44

प्रेम तरंग

हृदयीचे तरंग माझ्या
तुझ्या हृदयी उठतील का ?
मुक्या भावना अंतरीच्या
बोल तयांना देशील का ?

उजाड रानी निष्पर्ण वृक्षी
पक्षी होऊन बसशील का ?
भर दुपारी ग्रीष्मकाळी
गीत माझे गाशील का ?

तृषार्त चातका वर्षासमयी
घन बरसून जाशील का ?
उघड्या चोची अलगद पडण्या
थेंब होऊन येशील का ?

स्वप्न वेडी स्वप्न माझी
उघड्या नयनी दिसतील का ?
गूढ मनाच्या स्तब्ध डोही
प्रेम तरंग उठतील का ?

शब्दखुणा: 

प्रेम

Submitted by VB on 21 October, 2018 - 03:05

पाहता क्षणी वाटे कुणी आपलं
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
दिसताना लपत
हसताना रुसत
सरल्यावर उरत… प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध… प्रेम हे

विषय: 
शब्दखुणा: 

निसर्गाचं सोनं...

Submitted by स्मिता द on 19 October, 2018 - 03:37

सतरा ऑक्टोबरच्या दै. सकाळच्या दसरा पुरवणीत प्रसिध्द झालेला माझा लेख
..........................................................................................
निसर्गाचं सोनं...
आपल्या कित्येक धार्मिक सणांचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे. दसऱ्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे म्हणजे सोने म्हणजे "आपट्याची पाने"! त्याचे उपयोग पाहिले असता आपसूक शब्द बाहेर पडतात, हे खर सोनं...
स्मिता दोडमिसे
smita.dodmise@esakal.com

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन