लेखन

खडतर आयुष्य ! तीच-१०

Submitted by रिना वाढई on 9 October, 2019 - 08:23

पाच - सहा महिन्यांनी तिला एक स्थळ आलं लग्नासाठी . तिची मानसिक तयारी नसली तरी घरच्यांच्या विरोधात जाणे जमणार नव्हतेच तिला . छानशी साडी नेसून आली ती त्या मुलासमोर . अगदी समोरासमोर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती . गुलाबी रंगाची साडी , हातात दोन कंगन ,कपाळावर छोटुसी टिकली .
अगदी सिम्पल आणि सोबर तयारी केलेली होती तिने . राजीव, तिला पाहताक्षणीच हिच्याशीच लग्न करायचं असं ठरवलं त्याने . राजीवने तिला काही प्रश्न विचारले त्यानंतर तिलाही प्रश्न विचारायची संधी देण्यात आली .
तिचा एकच प्रश्न होता . घरच्यांनी तिला आधी बजावून ठेवल असल तरी तिला ते राजीव ला विचारायचं होतच .

विषय: 

'वसंत' प्रेमाचा

Submitted by sooryakantt on 8 October, 2019 - 07:50

'वसंत' प्रेमाचा ऋतू आणि आपल्या कथा नायकाचं नाव सुद्धा. वसंत तसा त्याच्या समवयस्क मित्रांसारखाच वाढला, बालपण, शाळा,कॉलेज, मित्रमैत्रिणी वयानुरूप आणि परिस्थितीनुरूप झालं.

विषय: 

कोकणी वडे

Submitted by मनीमोहोर on 5 October, 2019 - 15:33

वडे म्हटलं की मराठी मनाला आठवतात ते वरती बेसनाचे पातळ कुरकुरीत आवरण, आत लसूण आलं घातलेली बटाट्याची भाजी, आकाराने लहान आणि चपटे, खरपूस तळलेले, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जाणारे, कायमच कमी पडण्याचा शाप असलेले, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बटाटेवडे. पण कोकणी माणसाला वडे म्हटलं की हे वडे न आठवता पुरी सारखे दिसणारे तांदुळ, उडीद डाळीचे वडे जे " मालवणी वडे " म्हणून ही प्रसिद्ध आहेत तेच वडे आठवतात.

विषय: 

स्टोरीटेल ऍप

Submitted by radhanisha on 5 October, 2019 - 10:34

इथला " हा खेळ बाहुल्यांचा हा" धागा वाचण्यासाठी उघडला , थोडासा वाचल्यावर आवडला नाही म्हणून बंद केला पण त्यानिमित्ताने झपाटलेल्या बाहुलीची लेखक हृषीकेश गुप्ते यांची "मोठी तिची सावली" ही सुरेख कथा आठवली ... वाचनालयातुन आणलेल्या धनंजयच्या जुन्या अंकात होती .. त्यावेळी चांगल्या कॅमेऱ्याचा फोन घेतलेला नव्हता नाहीतर फोटो काढून संग्रहात ठेवली असती .. कुठल्या कथासंग्रहातही नाही बहुधा .. पण इंटरनेटवर जरा शोधाशोध केल्यावर स्टोरीटेल ऍपवर प्रतीक्षा लोणकर यांच्या आवाजात ऑडिओबुक स्वरूपात असल्याचं दिसून आलं ..

शब्दखुणा: 

खडतर आयुष्य ! तीच-९

Submitted by रिना वाढई on 5 October, 2019 - 01:58

हॅलो अभय ! तुला एक गोष्ट सांगायची आहे . खूप विचित्र आहे पण तरी तू ऐकशील का ?
हो ग , तुला मी कधी नाही म्हटलं आहे का .
दुसऱ्या दिवशी डोळे चोळतच तिने अभय ला फोन केला .
रविवार दोघांनाही सुट्टी असल्यामुळे आज ते निवांत बोलू शकणार होते .

विषय: 

एक दुपार तळ्याकाठची...

Submitted by शाली on 4 October, 2019 - 07:59

आज दुपारी जेवायला जरा उशीरच झाला होता. घरी जाताना बायकोने विचारले “तुझी चुलबुली कशी आहे? झाली का तिला पिल्ले? किती झाली?” आणि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. अरेच्चा खरच की टिबुकलीला पिल्ले झाली असतील नक्की. किती झालीत, कशी आहेत काहीच मला माहित नव्हते. मी दहा बारा दिवस तळ्यावर फिरकलोच नव्हतो कामांमुळे. मी चौकातून घराकडे गाडी वळवायच्या ऐवजी सरळ तळ्याकडे घेतली. ढग दाटून आले होते. त्यामुळे फोटो मिळणार नव्हतेच. पण माझी टिबूकली कशी आहे ते पहाण्याची उत्सुकता काही मला गप्प बसु देईना. मागच्या वेळी तळ्यावर गेलो होतो तेंव्हा कुकारीला (पानकोंबडी) नुकतीच पिल्ले झाली होती.

विषय: 
शब्दखुणा: 

परीची दुनिया (भाग ७)

Submitted by nimita on 2 October, 2019 - 15:41

थोड्या वेळानंतर परीचे बाबा आले - परीला आणि तिच्या आईला घरी घेऊन जायला ! आई तर खूपच खुशीत होती. आणि आई खुश त्यामुळे परी पण खुश!! शेवटी एकदाची परीराणीची स्वारी आई बाबांबरोबर घरी जाऊन पोचली. दारातच तिला आजी उभी असलेली दिसली...अजून पण खूप लोक होते तिथे - सगळे परीच्या घरात येण्याचीच वाट बघत होते. आजी आईला म्हणाली," थांब जरा बाहेरच , आधी दृष्ट काढते, मग औक्षण करते .. आणि मग आण तिला घरात ; लक्ष्मी आलीये आपल्या घरी!" आजीचं बोलणं ऐकून आईच्या चेहेऱ्यावर समाधान दिसलं परीला.

कसब

Submitted by मोहना on 2 October, 2019 - 06:22

पन्नाशीच्या पुढची लोकं सतत, ’मागे वळून बघताना...’ असं म्हणत असतात. नुकतीच पन्नाशी पार केली असल्याने मीही मागे वळून बघितलं. चष्मा न घालताही बरंच काही दिसायला लागलं... नुसतं दिसून काय उपयोग, मागे वळून जे दिसलं त्याचं पुढे काय झालं हे सांगायला हवंच ना.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन