लेखन

शिकण्यासारखं बरंच काही

Submitted by nimita on 10 July, 2020 - 07:03

खरं म्हणजे गुरु पौर्णिमा होऊन गेली आहे आणि मी आत्ता हे सगळं लिहायला घेतलंय. पण त्या दिवशी काही कारणांमुळे लिहायला जमलंच नव्हतं. एकदा विचार केला- 'जाऊ दे, आता टीचर्स डे' ला लिहीन.. शेवटी तो दिवस सुद्धा आपल्या सगळ्या गुरूंनाच समर्पित आहे ना !' पण मग एक जाणीव झाली.... जर प्रत्येक गुरू नी देखील असाच विचार केला असता तर ?... 'मी फक्त गुरू पौर्णिमेच्या दिवशीच किंवा टीचर्स डे च्या दिवशीच ज्ञानदान करीन' - असं जर त्यांनी म्हटलं असतं तर ?? पण कोणताही गुरू कधीच हा असा विचार करत नाही... तो आयुष्यभर आपल्या शिष्यांना सतत 'देत'च राहतो !! आपले गुरू, शिक्षक, मार्गदर्शक...

स्वप्नातल्या घराची अधुरी कहाणी

Submitted by Kashvi on 6 July, 2020 - 22:25

प्रिया आणि पियुष च्या लग्नाला नुकतीच 8 वर्ष पूर्ण झाली.तसे ते दोघेही साध्या मिडल क्लास फॅमिली मधले,लग्न झाल्यावर कस बस करून एक छोटासा फ्लॅट घेतला,नंतर दोन मुलंही झाली तस पाहिलं तर एकमेकांच्या सोबत छान हसत खेळत भांडत संसार चालू होता.हळूहळू मुलं मोठी होऊ लागली तस जागा कमी पडू लागली,पियुष चे उत्पन्न ही थोडे वाढले होते दोघांनी आता मोठ्या घराचा विचार केला.काही दिवसांनी एक घर पसंद ही पडलं.थोडं आवाक्याच्या बाहेर चे होते पण हवं तसं मोठं घर, पाहिजे त्या ठिकाणी मिळाल्या मुळे दोघे खूप खुश झाले.अतिशय उत्साहात पैशाची जमावाजमव केली रजिस्ट्री 4-5 दिवसात होणारच होती पण करोना भारतात आला.रोज नव्याने रुग्ण

विषय: 

कोरोना !

Submitted by prernapatkar48 on 6 July, 2020 - 12:18

कोरोना !
पृथ्वी ही वैतागलेली
समजावून लेकरांना,
युगाचा मालक आहे ‘कली’
शांतपणे जगा ना.. ll

पण नाही…
ऐकेल तर तो माणूस कसला?
माणुसकी हरवलेला…
मीच माझा स्वामी म्हणतं,
अहंकाराने धुंद झालेला… ll

कामासाठी भरा तुंबडी,
प्रामाणिकांची उचलबांगडी
राक्षसी वासनेसाठी
वय वर्षे चार वा उलटू दे साठी.. ll

पैशासाठी काहीही,
सतेसाठी हाणामारी..
पापांनी भरली गोदामे,
तरीही सुटेना लाचारी.. ll

अंगणात माझिया ... शिंपी पक्षी जन्मोत्सव

Submitted by मनीमोहोर on 6 July, 2020 - 08:22

लॉक डाऊनचे माझे काळजीचे , कंटाळवाणे , एकसुरी दिवस आनंदी उत्साही कसे झाले ते वाचा.

सकाळची कामे आटपून मी हॉलमध्ये बसले होते. लॉक डाउन मुळे सकाळी दहा साडे दहाची वेळ असून ही सर्वत्र शांतता होती. एरवीचे गजबजलेले रस्ते ही निर्मनुष्यच होते. सभोवती असणाऱ्या शांततेला कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने ती शांतता फार काही सुखावह वाटत नव्हती. माझ्या पायात घुटमळणारी मनी ही शांतच होती. मी मेन डोअर उघड ठेवून काही तरी निरर्थक विचार करत बाहेरची झाडं पानं बघत होते. मेन डोरच्या बाहेर असलेल्या ग्रील च्या व्हरांड्यात ठेवलेल्या कुंड्यातली झाडं आणि त्यावरची फ़ुलं मन थोडं प्रसन्न करत होत्या.

व्हायचे आता कधी नॉर्मल दिवस?

Submitted by Prashant Pore on 6 July, 2020 - 02:52

व्हायचे आता कधी नॉर्मल दिवस?
चालले आहेत सगळे डल दिवस!

एकटा येतो नि जातो एकटा,
जन्मभर राहील का 'सिंगल' दिवस?

आपल्या तंद्रीत असतो नेहमी,
बावळट हा, मूर्ख, बेअक्कल दिवस!

बंक, कॉफी, पाखरू, कट्टा, नशा
यार ते होते किती चंचल दिवस!

आपल्यामधली कटूता संपवू,
आणि घालूया तिचे ये चल दिवस

रोज प्रत्येकास दिसतो वेगळा
रोज फसवत राहतो रास्कल दिवस

त्याच त्या कामास सगळे त्रासले
वाटतो आहे अता निष्फल दिवस

भूक, तृष्णा, द्वेष, चिंता, वासना
दावतो नशिबातली दलदल दिवस

विषय: 

काळरात्र

Submitted by प्रतिक सोमवंशी on 6 July, 2020 - 01:49

दररोज अंगवळणी असले तरी
एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते

मग चुकत जातात हळूहळू
शंका कुशंकांची त्रिकोणे
आणि आपला शोध फिरत राहतो
गोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावर
माणसं येतात, स्पर्शून जातात
स्पर्शिकां सारखी, वर्तुळ भेदू शकत नाहीत
आपण आतच अडकून पडतो
चक्रव्यूहात...अभिमन्यू बनून

गावात प्रेमाचा पूर येतो, कविता वाहतात
गाव उध्वस्त होते, पूर ओसरून जातो
मागे उरतो, तो फक्त आठवांचा चिखल
गावात पसरलेला भावनांचा कुबट वास
विश्वासाच्या उडालेल्या चिंधड्या चिटकून
राहतात प्लास्टिक सारख्या...बाभळीला

डबडबल्या डोळ्यांमधल्या अवकाळी गारा

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 July, 2020 - 13:18

वादळात छप्पर कौलारू उडे भरारा
पावसास कोसळत्या मागू कसा निवारा?

सक्रियतेची लाट पूर्ण ओसरली आहे
निष्क्रियतेचा सुटला आहे भणाण वारा

तुडवत आले निरिच्छतेची वाट निसरडी
जागोजागी प्रलोभनांचा खडा पहारा

कोरडवाहू ओठांना हमखास झोडती
डबडबल्या डोळ्यांमधल्या अवकाळी गारा

निष्प्रभ ठरते परिस्थितीची जहरी नागिण
आठवणींच्या डंखांवर द्या कुणी उतारा !

ओळ उलाची अपसुक सुचली आयुष्याला
सानी गुंफाया बसले....केला पोबारा

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 

शुध्द आलेल्या क्षणी बेधुंद केले

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 July, 2020 - 03:19

मान्य की नुकसान अंदाधुंद केले
जाणिवांना जखडल्या बेबंद केले

सागराने, डोंगराने, पावसाने
सांग ना कोणी हवेला धुंद केले ?

राजरस्ता बनवला नाही परंतू
पायवाटेला जरासे रुंद केले

दाटले डोळ्यांत माझ्या मेघ त्याचे
निवळले वातावरणही कुंद केले

पाजली भलत्याचवेळेला धुक्याने
शुध्द आलेल्या क्षणी बेधुंद केले

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण...७

Submitted by मी_अस्मिता on 4 July, 2020 - 17:49

Pages

Subscribe to RSS - लेखन