लेखन

माझीच फक्त होशील का ?

Submitted by Vishal Madhav Vaidya on 15 March, 2025 - 21:42

या जन्मी नाही झालीस माझी,
पुढल्या जन्मी होशील का ?
नाही मिळालं प्रेम तुझं,
पुढल्या जन्मी देशील का ?
ऋण आहे खूप तुझें माझ्यावर,
फेडायला मला मिळतील का ?
या जन्मी नाही मिळाला हक्क तुझ्यावर,
पुढल्या जन्मी तो देशील का ?
चूक माझी सुधारायला,
मौका मला देशील का ?
मिठीत तुझ्या मिठीत मला,
कधी तरी गं घेशील का ?
श्वास माझा श्वासात तुझ्या,
सहवासात मला घेशील का?
कधी तरी गं दूर तू ,
भेटायला मला येशील का ?
पुढल्या जन्मी नक्की तू,
माझीच फक्त होशील का ?
पुढल्या जन्मी नक्की तू,

विषय: 

काय भुललासी वरलीया रंगा

Submitted by शिल्पा गडमडे on 14 March, 2025 - 21:37

॥१॥
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तिच्या सवयीचे रेल्वेस्थानक.. सवयीची गर्दी.. आणि रेल्वेची वाट पाहाणारे लोकं देखील रोजचीच..
रेल्वेला यायला वेळ असल्यामुळे तिने वेळ मारण्यासाठी गर्दीकडे सभोवार नजर फिरवली, तेव्हा तिला दिसला तो चेहरा.. आणि तिला दचकायला झालं. वेगवेगळे ठिगळं जोडून जसं एखादं कापड शिवलेलं असतं तसा शिवल्यासारखा होता त्याचा चेहरा.. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला क्षणभर भीतीच वाटली.. तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली..

त्यालाही हे जाणवले बहुतेक..

विषय: 
शब्दखुणा: 

मनाचे कवाड

Submitted by गंधकुटी on 14 March, 2025 - 10:19

मनात कधी कधी भिरभिरतात
नकोशा आठवणींच्या पाकोळ्या
दाटतो निराशेचा अंधार, त्याला
औदासीन्याच्या झिरमिळ्या

पसरते असुयेची धूळ अन
साठतात दुःखाची जळमटे
अपमानाची भावना, तिला
रागाची आणि द्वेषाची पुटे

अशा वेळी प्रयत्नपूर्वक
मनाची कवाडे तू उघड
घेरून येणाऱ्या अंधाराला
सर्व शक्तिनिशी भीड.

त्या कवाडातून येऊ देत
झळाळणारा सूर्यप्रकाश
फाकेलं बघ लक्ख प्रभा
घेऊन आशा आणि उल्हास

त्या कवाडातून येईल मग
सळसळणारा रानवारा
राग, असूया, अन द्वेषाला
नसेल मग कधीच थारा

सागरी किनारा

Submitted by अनंत s on 14 March, 2025 - 05:23

नयन रूपी सागरात तुझ्या मी अथांग बुडालो.
काल होतो माझा आज तुझाच जाहलो...

पडता सोन्याची किरणे उजळला आसमंत सारा.
ओल्या मिठीत तुझ्या आला अंगावरी शहारा..

रेतीत तुझ्या पावलांचे उमटले आज ठसे.
प्रेमात पडली लाट म्हणाली मिटवू मी कसे..

जमले ढग आकाशी आणि सुटला सुसाट वारा.
आपल्या प्रेमाची साक्ष देतो हा रेशमी किनारा...

चल भिजू दे आज आणि होऊ दे ओले चिंब.
नितळ पाण्यात बघूया दोघांचे प्रतिबिंब...

अनंत

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

ऋणानुबंध

Submitted by अनंत s on 14 March, 2025 - 05:13

सुंदर ते ध्यान उभे सामोरी
गालातच हसते नजर माझ्यावरी

नाकात नथ कानात बाळी
हसता गालात पडली गालावर खळी

हातात कंगन पायात पैंजण
मोहक रूप बघता वाढले हृदयाचे स्पंदन

मोकळ्या केसांतून आली गालावर एक छटा
तिला कानामागे घेण्याचा कितीही आटापिटा

वाऱ्याची झुळूक येता दरवळला सुगंध
विसरलो मी स्वतःला आणि झालो तुझ्यात दंग

शब्दखुणा: 

१९४२ ची चळवळ आणि साळवे गावचा स्वातंत्र्य संग्राम

Submitted by अविनाश कोल्हे on 12 March, 2025 - 22:44

१९४२ ची चळवळ आणि साळवे गावचा स्वातंत्र्य संग्राम
लेखक : अविनाश अरुण कोल्हे.

मिशन फ्लोरा - भाग १

Submitted by अविनाश जोशी on 12 March, 2025 - 07:37

मिशन फ्लोरा - भाग १
१७-३-२४५१ कमांडर समीर सेमवाल आपल्या शेरलॉक २३५ या यानावर अभ्यासिकेत बसला होता. हे यान हायपरजंपच्या HJB२७ या स्टेशनवर डॉक झाले होते. त्याचे यान HJB२७ येऊन दोन आठवडे झाले होते पण कोठेही त्याला मिशन मिळत नव्हते.

विषय: 

भावना

Submitted by प्रतिक रमेश चां... on 11 March, 2025 - 03:27

आज च मेव्हण्याच लग्न झालं. म्हणजे झालं एकदाचं!!! भावाच्या लग्नाची तयारी करायची म्हणून बायको लेकरा सहित महिनाभर आधीच बोरिया बिस्तर घेऊन माहेरी आलेली. या महिन्या भराच्या कालावधीत पोरगं 'बाबा' म्हणायचं विसरलं, व्हिडीओ कॉल वर पण बोलेनास झालं. वाटलं, आता पोरगं बापाला विसरण्या आधी आपण तिथं पोचलेलं बरं. . .आलो. बायकोनं दरवाजा उघडला, तोच पोरानं माझ्या पायाशी लोळण घेतली होती, खाताना-खेळतांना खरकटं झालेलं तोंड, सर्दी म्हणून शेवाळ झालेलं नाक, कंटाळा म्हणून न घातलेली चड्डी . . .मी तसाच त्याला उचलला. तब्बल २२ दिवसांनी 'बाबा' म्हणाला. रात्री माझ्या च मांडी वर झोपला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन