इतिहास

दक्षिण व मध्य आशिया - पुस्तकं, नकाशे, संदर्भ ग्रंथांचा खजिना

Submitted by जर्बेरा on 17 June, 2015 - 05:42

Collection of historical e-Books (Digitized by Google) of South & Central Asian History, Geography.

Includes various reference books, journals, photographs.

Also has maps (.jpg & KML).

Available here - http://pahar.in/books/

Shared from Reddit India.

तडका - महापुरूषांचे स्मारक

Submitted by vishal maske on 6 June, 2015 - 10:45

महापुरूषांचे स्मारक

महापुरूषांच्या स्मारकाचे वाद
हि गोष्ट नविन राहिलेली नाही
असे क्वचितच सापडतील की
ज्यांनी हि गोष्ट पाहिलेली नाही

कित्येक महापुरूषांचं स्मारक
जरीही वादात घेरलेलं असतं
पण महापुरूषांचं स्मारक मात्र
जनतेच्या ह्रदयात कोरलेलं असतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

महादजी शिंदे यांचा वीर पराक्रम

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 4 June, 2015 - 12:11

औरंगजेबाच्या मृत्युपासून उत्तर भारतातले मुस्लीम राजेरजवाडे,मुल्ला-मौलवी आणि सर्वसामान्य मुस्लीमाला हे जाणवत होते की मुस्लीम राजवट संपली,मुस्लिमांना फ़ौजेत,नोकर्‍यात जे प्राधान्य होते ते गेले. याचे कारण शोधताना मुस्लिम धर्मापासून ढळल्याने हे झाले आणि मोगलांचा हिंदु सरदार फ़ौज पदरी ठेवण्याने झाले हा शोध मुल्ला-मौलवींनी लावला.

विषय: 

पानिपत

Submitted by बिपिन कार्यकर्ते on 20 May, 2015 - 14:16

प्रिय अमोल,

काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे.

शब्दखुणा: 

तडका - वाद

Submitted by vishal maske on 14 May, 2015 - 21:59

वाद,...

जुन्यासह नवे माणसंही
जोशामध्ये भिडले जातात
जुन्यासह नवे वादही
नव्या-नव्यानं लढले जातात

कुणी नैतिकतेनं लढतात तर
कुणाचे विचार हिनले जातात
मात्र वादांची इथे कमी नाही
ते घडवुन सुध्दा आणले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

साद घालती कोकण -" काशीद बीच "

Submitted by विश्या on 13 May, 2015 - 02:56

दिनांक १० जून २०१२ , पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती , आणि मार्च ending ची सर्व कामे आटपायला आणि ताळे - बंद पत्रक (balance Sheet final ) पूर्ण व्हायला जून उजाडला होते , त्यामुळे कामाचा त्राण घालवण्यासाठी ऑफिस मधले बरेच मेंबर मिळून एक ट्रीप प्लान केली ती हि अगदी पुण्यापासून जवळ ,,,,,,,

चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास!

Submitted by वरदा on 11 May, 2015 - 12:00

वरदा यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधन कार्याची माहिती

Submitted by किंकर on 10 May, 2015 - 17:50

वाळवा तालुक्‍याला चार हजार वर्षांचा वारसा!
अशी बातमी दिनांक १०मे २०१५ रोजी सकाळ मध्ये प्रकाशित झाली आहे. माझा जन्म वाळवा तालुक्यातील 'बहे' या गावी झाला असल्याने व माझे बालपण उरुण - इस्लामपूर येथे गेले असल्याने सदर बातमी मी थोडी उत्सुकतेने वाचली . माझ्या जन्म गावाबाबत एकूण दोन दंत कथा प्रसिद्ध आहेत .
बहे या गावी इस्लामपूर येथून जाण्याचा जो मार्ग आहे त्यावर बहे हे गाव येण्यापूर्वी अगोदर एक टेकडी लागते. त्या टेकडीस 'तुकाई' ची टेकडी असे म्हणतात .
प्रभू रामचंद्र जेंव्हा वनवासात दंडकारण्यात प्रवास करीत होते तेंव्हा राम आता आपल्याला विसरला तर नाही ना ! अशी शंका रामाच्या मातेच्या मनात आली.

विषय: 

देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास

Submitted by निकीत on 7 May, 2015 - 06:12
indians on komagata maru

अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे.

Pages

Subscribe to RSS - इतिहास