इतिहास

तडका - परिवर्तनाची बोंबा-बोंब

Submitted by vishal maske on 4 May, 2015 - 10:51

परिवर्तनाची बोंबा-बोंब

ठराविक-ठराविक वेळेला
ठराविक-ठराविक धडे असतात
सांगणारे सगळेच असले तरीही
आत्मसात करणारे थोडे असतात

सामाजिक परिवर्तनाच्या नावाखाली
कुठे बाजारीकरणाचाच जश्न आहे
परिवर्तन तर सर्वांनाच हवं आहे
मात्र करायचं कुणी हा प्रश्न आहे,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

"शिवाजी" या नावात एकेरी उल्लेख असूच शकत नाही

Submitted by गणेश पावले on 4 May, 2015 - 03:00

"शिवाजी" या नावात एकेरी उल्लेख असूच शकत नाही
'शिव' ला "जी" हा आदरार्थी शब्द जोडलाय….
आणि त्यानंतर "शिवाजी" हे नाव पूर्ण झालेय….

हल्ली बरेच जण "शिवराय" असा उल्लेख करतात. - (मी ही करतो कारण हे नाव मलाही खूप चांगल वाटत. पण शिवाजी या नावातही एकेरी उल्लेख नाहीय)

शिव हे नाव आणि राय हि पदवी… आदर दाखवणारा शब्द.

शिवराई - स्वराज्याचे चलन "शिवराई" शिवाजी महाराजांचे स्वतःचे चलन
download_0.jpgत्यावर " एका बाजूला "श्री राजा शिव"

विषय: 

तडका - हे महामानवा,...

Submitted by vishal maske on 3 May, 2015 - 21:04

हे महामानवा,...

मानव जातीच्या कल्याणाला
शांततेचा तुच मार्ग दिला
अहिंसेचा स्वीकार करूनही
नष्ट विषमतेचा वर्ग केला

आज मानवतेच्या मना-मनात
तुझ्या शांततेची भ्रांती आहे
हे महामानवा तथागता
हि तुझीच विश्वक्रांती आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

इतिहासाच्या पाऊलखुणा : राजा दिनकर केळकर संग्रहालय

Submitted by ferfatka on 1 May, 2015 - 13:15

ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’

प्रांत/गाव: 

कोल्हापूर - एक खंड.

Submitted by विश्या on 29 April, 2015 - 02:57

सौजन्य कोल्हापुरी मॉडेल्स (थो पु .)
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील
मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई महपंदिर हे
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे.
पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा,
नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी , दाजीपुर अभयारण्य
आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४
ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला.
...
पौराणिक
हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर

विषय: 
शब्दखुणा: 

तडका - राष्ट्राची संपत्ती,...

Submitted by vishal maske on 18 April, 2015 - 10:34

राष्ट्राची संपत्ती,...

आपला राष्ट्राभिमान आपण
अभिमानानं जपला पाहिजे
आपल्या राष्ट्राभिमानाच्या पुढे
देशद्रोही पण झूकला पाहिजे

देशातीलच देशद्रोही ही
देशाचीही आपत्ती असते
अन् खरा देशप्रेमी हिच तर
राष्ट्राची खरी संपत्ती असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निवडणूकीय मुद्दे

Submitted by vishal maske on 16 April, 2015 - 20:29

निवडणूकीय मुद्दे

कधी आर्थिक,कधी भावनीक
कधी जातीचा आधार असतो
निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने
कधी अश्वासनीय बाजार असतो

प्रत्येका कडून प्रत्येकावर
आरोप-टिकांचे गुद्दे असतात
प्रत्येक-प्रत्येक निवडणूकीत
तेच-तेच ठरेल मुद्दे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पराभवाचे खापर

Submitted by vishal maske on 16 April, 2015 - 05:25

पराभवाचे खापर,...

कुणाची हार-जीत कधीच
निकालापुर्वी ठरलेली नसते
मात्र कुणाला जिंकण्यासाठी
कुणाची बाजी हरलेली असते

मात्र चर्चांच्या गोंगाटामध्ये
पराभवालाही ओढले जाते
अन् पराभवाचे खापर मात्र
इतरांच्यावर फोडले जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रेल्वे

Submitted by पराग१२२६३ on 16 April, 2015 - 02:07

आज १६ एप्रिल २०१५. आजच्याच दिवशी १६२ वर्षांपूर्वी दुपारी ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याद्वारे अवघ्या ३४ किलोमीटर अंतराच्या त्या लोहमार्गाने भारतीय उपखंडाबरोबरच संपूर्ण आशिया खंडातही रेल्वेसेवाचा शुभारंभ केला होता. म्हणूनच भारतीय रेल्वे दरवर्षी १० ते १६ एप्रिल हा सप्ताह रेल्वे सप्ताह म्हणून साजरा करते.

विषय: 
शब्दखुणा: 

तडका - भीमराया,...

Submitted by vishal maske on 14 April, 2015 - 11:08

भीमराया,...

तुझ्या शांतीच्या क्रांतीचा
शांतीनंच प्रसार होयोय
अन् तुझ्या तत्वज्ञानाचाही
मना-मनात संचार होतोय

हे महापुरूषा भीमराया
तुझ्या क्रांतीचाच हा ठसा आहे
अन् दिशाहिन या समाजाला
तुझ्या विचारांचाच वसा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - इतिहास