दडलेले मनोभाव मुखवट्यापाठी
नाटकी वागणे शोभे चेहऱ्यावरती
किती सोजवळ, किती निरागस
पाही त्याची होते हमखास फसगत
मनात कटुता बोलणे तरी मधुर किती
जवळचे होऊनी वार करी पाठीवरती
ओळखण्यास चुकतो, जीवास मुकतो
जेव्हा मैत्रीच्या पोशाखात वैरी निघतो
तोंडावर वर्षाव स्तुतीसुमनांचा होतो
पाठ वळताच निंदेचा बाझार भरतो
पत ढासळते, प्रतिष्ठा धुळीस मिळते
सामील असतात त्यात आदर करणारे
वाटते कधी टर टर फाडावे हे मुखवटे
झप झप वेशीवर टांगावे त्यांची लकत्तरे
पण आपण सुध्दा कुठे आहोत वेगळे
आरसा दाखवून मन शांतपणे विचारते
तसे पाहायला गेलं तर प्रत्येक जनात एक ना दोन ढीगभर गुण असतात . बऱ्याच वेळा आपण एखाद्याच वर्णन एका शब्दात करतो , जसे तो खूप हुशार,मनमिळाऊ , धाडशी , स्वावलंबी , तापट आहे वगैरे वगैरे . बऱ्याच वेळी interview मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो ,
तसं प्रत्येकात अनेक गुण कमी जास्त प्रमाणात असतातच पण तुमचा कोणता गुण जगाला जास्त दिसतो . नाहीतर तुमच्या जवळचे जाणणारे तुमचे वर्णन कसे करतात ?
आज आपण एका वेगळ्याच मुद्यावर बोलू. मला बरेच दिवस या विषयावर लिहू असं वाटत होत आणि आज मला या विषयाची चिट्ठी मिळालीच. ‘व्यक्तिमत्व’… व्यक्तिमत्त्वार आपले काही ‘माईंड सेट’ असतात. उदाहरणचय द्यायचं झालं तर, एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्यासमोर एक संत येतो. राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी व्यक्ती आपल्या डोळ्यांदेखत येते. मोठा बिझनेसमन किंवा उंच पदावरची एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर, ती व्यक्ती आपल्याला सूटात दिसते. तसंच एखादी महिला जर जीन्स- शर्ट असे कपडे घालणारी असेल ‘ मॉड’ असं समजलं जातं .
एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही