निळावंती- एक रहस्य

Submitted by संशोधक on 3 March, 2016 - 15:55

सुरूवातीला 'निळावंती' विषयी ऐकलं तेव्हा विश्वासच बसला नाही. (अजूनही नाही विश्वास यावर) जुण्या जाणत्या माणसांना विचारालं पण खात्रीशीर माहिती मिळाली नाही.
परंतु अंगची संशोधकवृत्ती गप्प बसू देईना. भेटेल त्याला मी त्या पुस्तकाविषयी विचारायचो. गुगल बाबालाही विचारलं. त्यानुसार 'निळावंती' हा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्याच्या वाचकाला पशु-पक्षांची भाषा समजते व ते त्याला गुप्तधनाची माहिती देतात.
प्रत्येक प्राचीन गोष्टीला असते तशी काळी किनार या ग्रंथालाही आहे. असं म्हणतात की, ही विद्या जो कोणी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला एकतर यशप्राप्ती होते नाहीतर वैकुंठप्राप्ती होते.
खरे-खोटे त्या केशवालाच माहित!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जळगांव जामोद जवळील भेंडवळ या गावातील श्री वाघगुरु़जी यांना अवगत आहे म्हणतात. ते इतरांना देत नाहीत.

फुनवाडी बाजार जवळ बुकडी बुद्रुक इथे रस्तंभा नदीच्या संगमाजवळ कनकरनाथ भेंडोळेगुरुजी यांच्याकडे हा ग्रंथही आहे आणि त्यांना ज्ञानही आहे अशी माहिती आहे.

कोणत्या तरी फेबु पेज वर ह्याची माहिती वाचलेली आठवतेय. <<< त्यानुसार 'निळावंती' हा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्याच्या वाचकाला पशु-पक्षांची भाषा समजते व ते त्याला गुप्तधनाची माहिती देतात. प्रत्येक प्राचीन गोष्टीला असते तशी काळी किनार या ग्रंथालाही आहे. असं म्हणतात की, ही विद्या जो कोणी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला एकतर यशप्राप्ती होते नाहीतर वैकुंठप्राप्ती होते. >>>> +१

मामीना बोलवा इथे. त्यांनी कायतरी निळावंतीचं लिहिलेलं. रहस्यमयच होतं. मला तरी ते रहस्य कळलं नाही Happy

काही वर्श्यापुर्वी नाशिकच्या 'गावकरी' पेपर मध्ये लेखक उत्तम काम्बळे याचा 'निळावन्त्ती' वर लेख होता.
''त्याच्या वाचकाला पशु-पक्षांची भाषा समजते व ते त्याला गुप्तधनाची माहिती देतात. प्रत्येक प्राचीन गोष्टीला असते तशी काळी किनार या ग्रंथालाही आहे. असं म्हणतात की, ही विद्या जो कोणी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला एकतर यशप्राप्ती होते नाहीतर वैकुंठप्राप्ती होते"

त्यात वर दिलेले म्हटले होते. स्वमी विवेकानन्दानी हा ग्रन्थ वाचाला म्हणुन त्याना अकाली मरण आले म्हणतात.
निळावन्ती ही एक रुप सुन्दर स्त्री होती, तीला पशु-पक्षांची भाषा समजत असे. मात्र तिच्या नवर्याला यातले काहीही माहिती नसते, तिला एकदा काही पक्श्याकडुन असे समजते की, गावातल्या नदीतुन रात्री एक प्रेत वाहत येणार आहे , आणी त्या प्रेताजवळ एक वस्तु बान्ध्लेली आहे . ति वस्तु जर मिळाली तर .काही होइल (आता नक्की आठ्वत नाही)
मग रात्री निळावन्ती नदी वर जाते, पण तिचा नवरा तिला त्या प्रेताजवळ पाहतो, आणी गैर्समज होउन तिला घराबाहेर हाकलतो.

साभार उत्तम काम्बळे
(नाशिक)

टीपः हा लेख मी नाशिक च्या 'गावकरी' पेपर मध्ये काही वर्श्या पुर्वी वाचला होता.

मामीना बोलवा इथे. त्यांनी कायतरी निळावंतीचं लिहिलेलं. रहस्यमयच होतं. मला तरी ते रहस्य कळलं नाही > Rofl

पशूपक्ष्यांची भाषा जाणण्याची कला म्हणजे ‘निळावंती’ असा आपल्याकडे उल्लेख केला जातो. ही निळावंतीची कथा एका बैठकीत पूर्णपणे ऐकू नये आणि सांगणा-यानेही संपूर्ण सांगू नये असंही सांगितलं जातं. निळावंती नावाची एक धनिकाची कन्या होती. तिला अशी भाषा कळायची. तिच्याच कथानकाचं आख्यान म्हणजे निळावंतीची कथा. ती पिंगळ्यांनी लोककथेच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे. ही कथापोथी ज्यांनी वाचली त्यांना विद्या अवगत होते, पण त्यासाठी बरंच काही गमवावं लागतं. प्रसंगी स्वत:चं शहाणपणही. प्रसंगी कुटुंब-आप्तही असं म्हणतात.
-
साभार
http://prahaar.in/collag/281742
Author शैलेंद्र शिर्के

पशु पक्ष्यांची भाषा समजली तर उत्तमच आहे. पण त्यांना जमिनिखालचे गुप्तधन दिसते वगैरे गप्पा असव्यात. इतक्या उंचावरुन त्यांना जमिनीवरचे खाद्य दिसते त्यावरुन हा तर्क केला असावा. पक्ष्यांना जमिनीखाली दगड असतील किंवा सोने नाणे असेल - दोन्हीही सारखेच.

पण अशा गोष्टी मौखिक साहित्यात खुप आलेल्या आहेत. काही गोष्टी अगदी सुरस आणि चमत्कारिक असतात. मनोरंजन चांगले होते त्याने.

रच्याकने, माबोवरचे हे जाणकार कोण याची नेहमी उत्सुकता वाटते. जाणकार कोणी प्रश्न विचारल्याशिवाय गोशातुन बाहेर का पडत नाहीत देव जाणे....

आळीमिळी चूप Wink
[आमच्या "निळावंती" कथेच्या विषयाचा आधीच गौप्यस्फोट केल्याने निषेध! Wink Wink Lol ]

आपण नाय ब्वा नीळावंतीबद्दल काही लिहिलेलं.

पण मृण्मयी नावाच्या एक जुजा असंबा या विषयातल्या तज्ञ आहेत हे माहीत आहे. या विषयावर त्यांचं साहित्यदेखिल प्रकाशित झालं आहे.

निळावंती..
मारुती चितमपल्लीच्या पुस्तकात वाचलेला संदर्भ आठवतोय..

पशुपक्ष्यांची भाषा निव्वळ रानात राहणार्‍या आदिवासींना माहिती असते.. अशांना त्यांच्याशी बोलताना पाहण्याचं भाग्य निराळचं Happy

एक बेसिक अवांतर प्रश्न -
एकाच प्रजातीच्या पशूपक्षांची भाषा सेम असते का?
जसे मानवाच्या घशातून कैक स्वर आणि व्यंजने निघतात. पण त्यातून बनलेल्या भाषा कैक आहेत.

उदाहरणार्थ मी एक कुत्रा पाळला. रोज त्याच्याबरोबरच खेळलो, फिरलो, बागडलो, अगदी त्याला कुशीत घेऊन झोपलो, तर तो साधारण महिन्याभरात माझी भाषा शिकेल. पण नंतर जर मी तो कुत्रा एका सौथेंडीयन मित्राला दिला तर त्याची मल्याळम वा केरळम भाषा त्या कुत्र्याला समजणारच नाही. तेच त्याला चीन, जपान वा आफ्रिकेच्या रेड ईंडियन सोसायटीत नेऊन विकला तर बिचारा आणखीनच कावराबावरा होईल..

थोडक्यात जोपर्यंत तो कुत्रा पृथ्वीतलावरच्या आपल्या माणसांच्या सर्व भाषा बोलायला शिकत नाही तोपर्यंत तो मला माणसांची भाषा येते असा दावा करू शकत नाही.

तर हेच जेव्हा माणूस एखाद्या पशूची भाषा शिकतो तेव्हा त्यालाही लागू होत असेल ना.. नक्कीच जगभरातल्या सर्व कुत्र्यांची भाषा एकच नसणार भले त्यांच्या तोंडातून निघणारे भू भू स्वर एकच असले तरी त्या भ च्या बाराखडीचे वेगवेगळे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन जगभरात प्रचलित असतील..

"निळावंती" संदर्भात ज्या काही आख्यायिका आहेत त्या अनुषंगाने (पूर्वी) सायंकाळी बैठकीच्या वेळी गप्पांच्या ज्या चंच्या सुटत, पानसुपारीची देवघेव होई, त्या दरम्यान पुरून ठेवलेले सोन्याचे मडके, चांदीच्या रुपयांनी भरलेला तांब्याचा हंडा, जडजवाहीर....असल्या गोष्टी सांगणारे वेल्हाळ बैठक रंगवत आणि खिशात पाच रुपयेही नसलेल्या आजुबाजूच्या श्रवणधारकांच्या त्या झळाळत्या सोन्याच्या कल्पनेने अंगावर सुखद असे रोमांच उमटत...त्याच नशेत मग ते "निळावंती" कुणाला वश असेल यावर खल करत बसत....ती समाजमनाची एक जडणघडण असतेच. कायम दरिद्री वा उपाशीपोटी वा अर्धपोटी राहाणा-यांना अशा जादूने माखलेल्या गोष्टींची सवय होऊन गेली होती. सवय इतपत ठीक, पण "निळावंती" शी लगट होण्याच्या नादात जर अघोरी (आणि क्वचित प्रसंगी हिडिससुद्धा) प्रकार करण्या इतपत यांची मजल गेल्याचे दाखले आहेत.

कबुतरांना पकडून आणून त्याना पायाखाली चिरडण्याचे प्रकार या निळावंतीच्या नादाने केलेले लोक पाहिले आहेत. का चिरडायचे ? तर त्यांच्या वेदनेच्या आवाजाला प्रत्युतर कुठून तरी ती निळावंती येते, ही खुळचट समजूत. पुस्तके होती या विषयावर पण भारत सरकारने या विरोधात ती सारी जप्त करण्याचे आदेश दिल्याचे आठवते.

कबुतरांना पकडून आणून त्याना पायाखाली चिरडण्याचे प्रकार या निळावंतीच्या नादाने केलेले लोक पाहिले आहेत. का चिरडायचे ? तर त्यांच्या वेदनेच्या आवाजाला प्रत्युतर कुठून तरी ती निळावंती येते, ही खुळचट समजूत.

<<<<<<< किती हा मूर्खपणा (इतकं निर्दयी कसं काय वागू शकतात लोकं?)

स्वरा...निर्दयीपणा नि:संशय. पण त्यामागे असलेली वेडेपणाची जी भावना होती त्या मागे गांजलेल्या लोकांची धडपड होती असे म्हणता येईल. काही परिस्थितीने दडपून गेलेल्या काही फ़ाटक्या लोकांच्या अशा स्थितीचा फ़ायदा घेत असत ते भोंदूबाबा, जे स्वत:ला निळावंती महतीचे ज्ञान असल्याचा आव आणीत. आमच्या कोल्हापूरात गावाबाहेर असलेल्या एक दोन टेकड्यामागे (जिथे छुप्या दारुगुत्त्यांचे अड्डे असल्याने सर्वसामान्य लोक सहसा जातही नसत) असले प्रकार सर्रास चालायचे. मात्र टीव्हीच्या जमान्यामध्ये कसे काय कोण जाणे, हा अघोरीपणा नष्ट झाला आहे. गप्पाही आता टीव्हीच्या मालिकांवरच चालतात.

thanks टू टि. व्ही. ( त्यानिमित्ताने का होईना लोकांना सुबुद्धी झाली म्हणायची )

नीळावंती हा मुळात एक मासा आहे. तो विश्वातली कोणतीही भाषा समजायला मदत करतो. विष्णु चा पहीला अवतार म्हणजे हा मासाच होय. आपल्या वेदांमध्ये या माशाचे कार्य कसे चालते याचे शास्त्रिय विवेचन केलेले आहे.
दुर्दैवाने जुने ते सर्व टाकाउ असे समजणार्‍या नक्शली, ब्रिगेडी आणि कम्युनिस्ट लोकांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली शेकडो वर्षांपुर्वीच हे ज्ञान नामषेश केले.

डग्लस अ‍ॅडम्स नावाच्या पाश्चिमात्य शास्त्रज्ञाने मुळ संस्क्रुत भाषेतुन अभ्यास करुन हे ज्ञान पुनुरुज्जिवित केले. त्यांना याबद्दल बायोफिजिक्स विषयाचे नोबेल परितोषिक मिळाले. साई बाबांच्या सन्मानार्थ या माशाला त्यांनी बाबेल फिश असे संबोधीले आहे. खालिल उतार्‍यात आपल्या निर्विवादपणे सिद्ध झालेल्या वेदोक्त ज्ञानाचा पडताळा येतो.

"The Babel fish is small, yellow, leech-like, and probably the oddest thing in the universe. It feeds on brain wave energy, absorbing all unconscious frequencies and then excreting telepathically a matrix formed from the conscious frequencies and nerve signals picked up from the speech centres of the brain, the practical upshot of which is that if you stick one in your ear, you can instantly understand anything said to you in any form of language: the speech you hear decodes the brain wave matrix."

वरील टग्या यांच्या प्रतिसादात बाबेल माशाचा उल्लेख आला तो वाचून समाधान झाले. बाबेलचा अर्थच असा आहे की अनेक आवाजांचा कल्लोळ...कॉन्शन अनकॉन्शन्स स्थितीमध्ये मनातून विचारातून मंथनातून प्रकटणारे संबंद्ध वा असंबद्ध आवाज....दबलेले असतील वा धुमारे फुटलेले...अशा आवाजातून कसले तरी ज्ञान मिळविण्याचा यत्न करणारे जसे ऋषि मुनी साधूसंत होते तसेच अघोरी विद्याला जवळ करणारे मांत्रिक जारणमारण करणारे तांत्रिक देखील. निळावंती याच जातकुळीतील.

दूरदर्शनच्या जमान्यात (चॅनेल्सचे युग सुरू झाले नव्हते) त्यावेळी रात्री अकराच्या सुमारास अशी अर्ध्या तासाची माहितीची मालिका दाखविली जात असे. गंगेच्या काठी रात्री काही ठराविक प्राणी पक्षी जाळात बळी देऊन त्यांच्या चित्कारातून करणी करणारे साधू....त्यांचा उपयोग आपल्या इस्टेटीच्या वादाकरीता करून घेणारे अगदी श्रीमंत वाटणारे लोकही...गुपचूप नदीच्या काठी येऊन महंत म्हणेल ती अघोरी पूजा करताना दाखविले जात होते.

बाबेलच्या उल्लेखाने ते आठवले.

Pages