शिक्षण

स्पोकन इंग्लिश वर्ग : एका अभिनव उपक्रमाचा प्रवास व हृद्य समारोप

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 March, 2014 - 05:53

गेल्या वर्षी ध्यासपंथी पाऊले ग्रुपच्या अंतर्गत मी 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!' असा धागा काढला आणि अन्य उपक्रमांपेक्षा जराशा वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होऊ इच्छिणार्‍यांना आपली नावे द्यायला सांगितली. अट होती ती दर शनिवारी किमान एक तासाभराचा वेळ देऊन पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात राहाणार्‍या व तेथील नूतन समर्थ विद्यालयात शिकणार्‍या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायची, तिचा सराव करून द्यायचा! अशा प्रकारे मुलांना शिकवण्याची एका संपूर्ण शालेय वर्षाची कमिटमेन्ट घेणे ही खरोखर सोपी गोष्ट नाही.

अंधत्वावर मात करणारी दृष्टी

Submitted by शोभनाताई on 21 March, 2014 - 04:53

मीरा बडवे यांचे "टीम निवांत" वाचायला घेतले फक्त प्रस्तावनाच वाचली आणि मी भाराऊन गेले.निवांत अंध मुक्त विकासालय या शाळेच्या पलीकडच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी रचल्या गेलेल्या विलक्षण प्रयोगाची सकारात्मक गाथा.बडवे कुटुंबाच्या घराचा निवांत टीमपर्यंत झालेला जीवन प्रवास.पुस्तक पूर्ण वाचल्यावर परिचय लिहायलाच हवा.अपंग दिनी बडवे कुटुंबियांच्या कार्याला डोळस माणसानाही शिकवणा-या त्यांच्या चमूला सलाम.मला राहून राहून आज विजय कुदळेची आठवण येते.त्याच्यापर्यंत हे पोचवायला हव.
अपंग दिनानिमित्त त्याची ही कहाणी. १० वर्षापूर्वी केसरी या वृत्तपत्रात लिहिलेली.

नवीन अभ्यासक्र्म

Submitted by निर्मल on 11 March, 2014 - 07:18

नमस्कार मंडळी.
सध्या १२ वी च्या परीक्शा चालू असतील. नंतर कोणाला संशोधनात रस असेल तर, शास्त्र शाखेकडे जायचे असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एड्युकेशन अँड रिसर्च हा चांगला पर्याय आहे. मुंबई, ठाण्यातील मुले फार कमी दिसतात म्हणून लिहिले आहे. थोड्याच दिवसांपूर्वी जाहिरात आली होती. कोणाला माहिती हवी असल्यास देउ शकेन.

विषय: 

'बघू पुढे' वाली पिढी

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2014 - 05:53

ह्या धाग्यान्वये एक गंमतीशीर अनुभवकथन व त्याबाबत थोडे मतप्रदर्शन करण्याची संधी घेत आहे. काही प्रमाणात ह्या धाग्यातील विषयाचा संबंध माझ्या 'मराठीचा अभिमान' आणि 'यू आर रिजेक्टेड' ह्या दोन धाग्यांमधील विषयाशी आहे, पण ह्या धाग्यात वेगळ्याच कोनातून अनुभवकथन करत आहे.

==============

कारण अभ्यास...

Submitted by pankajkoparde on 21 February, 2014 - 09:44

आभाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं.

left handed children - येणारे अव्हान आणि उपाय

Submitted by गोपिका on 20 February, 2014 - 13:27

आपल्या घरात,आप्तेष्टां मध्ये, आपण बर्याचदा लाहन मुले पाहतो जे डावरे असतात.अर्थातच त्याना खुप गोष्टिंना सामोरे जावे लागते.
१. आपला समाज.लगेच न विचारलेला फुकट्चा सल्ला,उजव्या हाताचि सवय करवा हान.त्यात मुलगि असेल तर विचारयलाच नको (माझा स्वानुभव).मि मात्र जिथल्या तिथे ठाम पणे सांगते, ति जशि आहे तशि आहे.अर्थात माझा नवरा नेहमिच माझि बाजु घेतो.
२.त्याना लिहिताना येणार्या समस्या.माझि मुलगि आता साडेतीन वर्षांचि आहे.जेव्हा आम्हि तिला लेखन शिकवु लागलो तेव्हा आम्हाला हि समस्या प्रकर्शाने जाणवलि.ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.

अमराठी तरीही मराठी

Submitted by शोभनाताई on 20 February, 2014 - 01:25

मराठी दिनानिमित्त अमराठी लोकानी मराठी बोलण हा विषय आला आणि माझ्या आजुबाजूचे अनेक अमराठी डोळ्या समोर आले. तुळू मातृभाषा असून मराठीत व्याख्यान देणार्‍या मराठीतून पुस्तके लिहिणार्‍या आमच्या माजी कुलगुरु हिरा अध्यन्ताया, कर्नाटकातून आले तेंव्हा एक शब्दही मराठीत बोलू न शकणारे पण आता अस्खलित मराठीत व्याख्यान देणारे, वृत्तपत्रात मराठी लेखन करणारे संस्कृत विभाग प्रमुख श्रीपाद भट, पार्किन्सन्स मित्र मंडळात शुभंकर असलेल्या कानडी मातृभाषा असलेल्या भैराप्पांची पुस्तके मराठी आणणार्‍या, पार्किन्सन्सवरिल इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्‍या आशा रेवणकर.

सवय

Submitted by विजय देशमुख on 19 February, 2014 - 00:06

"काय घाणेरडी असतात ना माणसं?"
"अं"
"तुझं लक्ष कुठे आहे? बघितलस ना कसे केळाचे सालं फेकले त्या बाईने. काहीच कसं वाटत नाही या लोकांना"
"हम्म"
"आणि आपले घरचे तर अजुनच महान. मी म्हटलं की कचरा वेगवेगळा करुन पॉलिथिन बॅगमध्ये फेका, तर मलाच वेड्यात काढलं. आणि वरुन डोस... तुमचे परदेशातले नियम तुमच्याजवळ ठेवा."
"हं"
"हं, काय? तु का नाही सांगत त्यांना? मीही शेवटी कंटाळून कचर्‍याच्या ढिगातच फेकले रॅपर्स"
"हे मात्र तू बरोबर केलं नाहीस."
"अच्छा, मी केलं ते चुकलं अन ते करत आहेत त्याचं काय?"
"तुला लहानपणी आपल्याला एक गोष्ट होती ती आठवते?"
"कोणती गोष्ट?"

सुपर-३० आनंद (Must read)

Submitted by मी मी on 16 February, 2014 - 11:31

तुम्ही कोणी सुपर-३० आनंद बद्दल ऐकलंय ??

नसेल तर हे वाचा नक्की ….

हल्लीच नागपूरच्या स्वयंसेवक संघाने स्वामी विवेकानंदांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्त्याने भारतभर अनेक चांगले कार्यक्रम राबवले. या कार्यक्रमाची सांगता होती त्या दिवशी आनंद कुमार हे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते. मी कार्यक्रम पहिला नाही पण नागपुरात एवढ्या कमी काळात यांची जी प्रचीती पसरली त्यावरून यांची माहिती शोधून काढली तसेच यांना भेटलेल्या अन ऐकलेल्या लोकांकडून ऐकले ते असे होते सारे ….

विषय: 

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.

Submitted by निलेश भाऊ on 14 February, 2014 - 03:21

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
DSCN5454.JPG

Pages

Subscribe to RSS - शिक्षण