शिक्षण

'मैत्री शाळा १०० दिवसांची – आपल्या गावी', मेळघाट - २०१३-१४

Submitted by हर्पेन on 16 July, 2013 - 07:30

मैत्री संस्था, गेली १३-१४ वर्षे मेळघाटात चालू असलेल्या कुपोषण मृत्यू रोखण्यासाठी काढलेल्या धडक मोहिमांबरोबरच गेली दोन वर्षे डिसेंबर ते मार्च या काळात स्वयंसेवकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमही घेत आहे. पहिल्या वर्षी मैत्रीने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य ४० मुलांसाठी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. त्या नंतरच्या म्हणजेच मागच्या वर्षी ३ गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर १०० दिवस काम केले व त्यायोगे सुमारे ७० मुलांपर्यंत आपण पोहोचलो.

अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

Submitted by balsanskar on 15 July, 2013 - 10:28

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लक्षात राहत नाही. तिथे विषयाचा

विषय: 

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास-३

Submitted by स्वाती२ on 12 July, 2013 - 11:39

शिक्षण संस्थांविषयी माहिती : लंडन

Submitted by चंपक on 30 June, 2013 - 12:15

माझ्या एका मित्राला एम बी ए करण्यासाठी लंडन ला यायचे आहे. प्रत्य्क्ष अ‍ॅड्मिशन अगोदर जुलै महिन्यातच तिथे येउन एक महिना राहुन विद्यापीठ नक्की करावे अन तिथे अ‍ॅडमिशन घ्यावी असा विचार आहे. टुरिस्ट व्हिसा वर तेथे येउन मग तिथेच विद्यार्थी म्हणुन प्रवेश मिळु शकेल का? एक महिना राहन्यासाठी पेन्शन्/लॉज/मोटेल ची माहिती कुठे मिळेल? माअहितगारांनी कृपया संपर्क करावा. धन्यवाद.

विषय: 

हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 June, 2013 - 02:57

''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्‍या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्‍यात साठवून घेऊ लागलो.

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १

Submitted by स्वाती२ on 14 June, 2013 - 14:34

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

शिक्षणातील नवीन संधी

Submitted by निर्मल on 10 June, 2013 - 02:56

१२ वी च्या मुलांसाठी - शास्त्र शाखा आणि संशोधनात रस असेल तर IISER - Indian Institute of Science Education and Research मध्ये प्रवेश घेउ शकता. प्रवेश परीक्षा जुलॅ मध्ये आहे. ५ वर्षाचा Integrated M. Sc. in Physics or Chemistry or Biology or Maths.
खूप चांगला पर्याय आहे.

विषय: 

विचार करून कंटाळलो !

Submitted by pareshkale on 1 May, 2013 - 08:41

कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? सुरेश भटांनी लिहिलेल्या

" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी"

सन्स्कार वर्ग

Submitted by स्मिता ब on 27 April, 2013 - 01:07

मला ५ ते १० वयाच्या मुलान्चे सन्स्कार वर्ग सुरु करायचे आहेत.
सुरवातिला श्लोक, काही सोपे खेल, असे काहीसे करायचे मनात आहे.
अजून काही सुचवाल का?

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण