श्रावणमासी

Submitted by याकुब क्युरेशी on 20 August, 2018 - 23:05

श्रावणमासी, अपेक्षा मनाशी,
येईल कशीबशी, सर पावसाची ||

श्रावणमासी, नजरा अधाशी,
भिडती आकाशाशी, शोधी ढगंं ||

श्रावणमासी, शेतीची जराशी,
थांबवी सात्यानाशी, मेघराजा ||

श्रावणमासी, विनंती भास्काराशी,
सोयाबीन, कपाशी, सुकऊ नको ||

श्रावणमासी, मागणे देवापाशी,
बळीराजा फाशी, न जाओ कुणी ||

श्रावणमासी, स्वप्न उराशी,
धनधान्याच्या राशी, येतील धरा ||

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults