पुणे - श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी गटग - १३ नोव्हेंबर, २०१०

Submitted by चिनूक्स on 1 November, 2010 - 23:47
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणार्‍या रस्त्यावर, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे

मित्रहो,

श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी शनिवार, दि. १३ नोव्हेंबर, २०१० रोजी गटग आयोजित केलं आहे.
वेळ - सकाळी ११ ते दुपारी २.

मुंबईचे व इतरत्र असलेले मायबोलीकर यांनी या गटगला उपस्थित राहावे, ही खास विनंती.

कृपया या धाग्यावर नावनोंदणी करावी म्हणजे पुढची व्यवस्था करणं सोपं जाईल. Happy

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 13, 2010 - 00:30 to 03:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा पण नीरजासारखाच प्रश्न आहे. नीरजा, जाणार असलीस तर त्याच दिवशी जाऊन परत येणारेस का? तसं असेल तर मुंबईकर्स साथमें जाएंगे.

माझंही ५०-५०. अधी नाव नोंदवलं आणि मग प्रतिसाद वाचले.
>मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणार्‍या रस्त्यावर, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे >> हे नक्की कुठे?

झक्की, Lol
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणार्‍या रस्त्यावर, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे >> हे नक्की कुठे?
>>शैलजा, Lol यातलं काय नक्की कुठे विचारते आहेस? Proud नाबार्डचं काय झालं?

सगळंच गं आशूडी. नाबार्डचं कुठे काय विचारलंय? ते कुठे आहे ते मला नेमकं ठाऊक आहे Proud
अजून काही नाही झालं. Happy

.

ए आशू सांग ना गं तो पत्ता नक्की कुठला ते?
पूर्वी पुण्यात पत्ता सांगताना अमकी पेठ, कँप, हडपसर वगैरे नीट विभागवार सांगत असत.

म्हात्रे पुलापासून गाडीने 2-3 मिनिटांच्या अंतरावर. नळस्टॉपपासून गाडीने 4-5 मिनिटांच्या अंतरावर. म्हात्रे पुल ते राजाराम पुल या रस्त्यावर.

माझंपण जरा ५०-५० आहे. नक्की झालं की नोंदणी करेन Happy
शैलजा, रैना :
मल्टिस्पाईस : कर्वे रस्त्यावरून नळ स्टॉप ला म्हात्रे पुलाकडे जायला वळायचे.,म्हात्रे पुलाच्या जस्ट अलिकडे उजवीकडे मोठा रस्ता लागतो. त्या रस्त्यावरच हे हॉटेल आहे.
फक्त कर्वे रोडने येताना त्तिथे उजवी कडे वळता येत नाही म्हणून म्हात्रे पुलावर जाउन, मग उलटे वळून यावे लागेल Happy

दिवसा आहे? Sad शनिवर्कर बाद की मग. मी नाही येऊ शकणार. मला भेटायला माझ्या ऑफिसला या सगळे Proud

साजिरा, तू तिथे आसपास घर विकत आहेस का? अंतर तसंच सांगतोयेस Proud Light 1

पूनम,
त्या दिवशी संध्याकाळी गटग आयोजित करणं शक्य नाही. तू थोडा वेळ येण्याचा प्रयत्न कर. दुपारी दोनपर्यंत तरी सगळे असतील तिथे.

येस येस चिनूक्स, आय नो.. सगळ्यांची मोट बांधणं अवघडच असतं. मला जमलं तर नक्की चक्कर मारेन Happy

Pages