महाबँक पुरस्कार वितरण समारंभ २००९

Submitted by चित्तरंजन भट on 7 December, 2009 - 11:28
ठिकाण/पत्ता: 
समारंभाचे स्थळ : एस. एम. जोशी सभागृह (चर्चासत्र सभागृह), नवी पेठ, पुणे-४११०३० दिनांक-वार : १३ डिसेंबर, २००९ - रविवार वेळ : सांयकाळी ५.३०

मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, दरवर्षी, मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी, महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने, महाबँक पुरस्कार देण्यात येतो. ५००० रू. रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष २००८-०९ मध्ये, प्रसिद्ध झालेल्या भाषाविषयक लेखनाचा विचार करून डॉ. कलिका मेहता, डॉ. नीलिमा गुंडी आणि प्रा. रंजना फडके यांच्या समितीने श्री. माधव आचार्य (चौल, अलिबाग) यांनी लिहिलेल्या ध्वनिताचे केणे या पुस्तकाची निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १३ डिसेंबर २००९ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (चर्चासत्र सभागृह) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते होणार आहे.

विषयपत्रिका :

प्रास्ताविक : प्रा. प्र. ना. परांजपे
ग्रंथाविषयी : डॉ. नीलिमा गुंडी
पारितोषिक वितरण : हस्ते डॉ. नागनाथ कोतापल्ले
लेखकाचे मनोगत : श्री. माधव ना. आचार्य
प्रमुख अतिथी मनोगत : डॉ. नागनाथ कोतापल्ले
आभार प्रदर्शन : प्रा. आनंद काटीकर

[ मराठीअभ्यासपरिषद.कॉम / मराठीअभ्यासपरिषद.ओर्ग ला भेट द्या ]

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users