नभाचे शब्द स्वच्छंदी : गझल सहयोगचा मुशायरा

Submitted by मिल्या on 19 February, 2010 - 02:44
ठिकाण/पत्ता: 
दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ०० स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे संयोजन - अजय जोशी व बेफिकीर

'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. त्यानिमित्ताने एक गझल मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आलेले आहे

तपशीलः

मुशायर्‍याचे शीर्षक - 'नभाचे शब्द स्वच्छंदी'

दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार

समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ००

स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे

संयोजन - अजय जोशी व बेफिकीर

सहभागी गझलकारः

डॉ. अनंत ढवळे

श्री. मिलिंद छत्रे

श्री. केदार पाटणकर

डॉ. ज्ञानेश पाटील

श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस

श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ मधुघट

श्री. अजय जोशी

भूषण कटककर उर्फ बेफिकीर

प्रमुख आकर्षण - उर्दूचे बुजुर्ग व जानेमाने शायर - श्री. बशर नवाझ साहेब

कार्यक्रमाची रूपरेषा:

गझल सहयोग परिचय - २ मिनिटे

सर्व शायरांचा परिचय व व्यासपीठावर आगमन - एकंदर २ मिनिटे

बशर नवाझ साहेबांचे परिचय व आगमन - १ मिनिट

भटसाहेबांच्या २ गझलांचे वाचन - अजय जोशी व केदार पाटणकर यांच्याकडून

चक्री मुशायरा - प्रत्येकी सहा स्वरचित व मराठी गझला (प्रकाशित वा अप्रकाशित)

इच्छुक रसिकांनी जरूर उपस्थित रहावे.

प्रवेश विनामुल्य

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिल्या,

हार्दीक शुभेच्छा!!

इन्शाअल्ला! मी जरूर येईन. Happy

शरद

मिल्या अभिनंदन आणि शुभेच्छा!
वृतांत जरूर लिही. तसेच तुझ्या छान छान गझला येऊ देत.

मिल्या,

आम्ही सर्व येवू. मात्र मुशायरा संपल्यावर पार्टी पाहिजे सगळ्या मा.बो. करांना. ज्यांना ही आयडिया पसंद आहे त्यांनी हात वर करावेत. Wink

शरद

प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद...

शरद का नाही पार्टी? माझाही हात वर Happy

चक्क दस्तुरखुद्द पेशव्यांचे शुभाशिर्वाद मिळाले म्हणजे आमचे तिथे 'पानिपत' व्हायचे नाही असे वाटतेय Happy

आल ईझ वेल >> वरही गझल केल्येस की काय? छातीवर हात ठेवून Proud एनीवे बेस्टलक मी नाही येऊ शकणार रे. मुंबईतकर पुढच्यावेळेस Happy

अरे सही रे मिल्या.. कार्यक्रमासाठी शुभेच्छा!! पूनमला रेकॉर्ड करायला सांग.. तुनळी वर टाक रे नंतर म्हणजे आम्हाला तुझ डबल कौतुक करता येइल. Happy

मिल्या,

'सकाळ'ला कुठेच उल्लेख नाही. फक्त प्रदीप निफाडकरांचा कार्यक्रम आहे दुपारी १२ वाजता. नोकरीवाले कसे जाणार १२ वाजता देव जाणे!

आणि सह्याद्री सदन म्हणजे हॉटेल विश्व च्च्या गल्लीत आतल्या बाजूला आहे तेच ना?

शरद

शरद, परवा (म्हणजे २५ फेब)ला आलीये एका कोपर्‍यात छोटी माहिती.

सह्याद्री सदन तेच तुम्ही म्हणताय ते.

कार्यक्रम चांगला झाला.. दर दोन महिन्यांनी असा गझल मुशायर्‍याचा कार्यक्रम करायचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे..

कार्यक्रम सही झाला. असा गझल मुशायरा पहिल्यांदाच बघितला / ऐकला. मिल्यासह सर्वांचेच गझलवाचन सुरेख झाले, आवडले. Happy

पुढल्या वेळेस पण येणार, नक्की.

येणे झाले नाही. पुढल्या वेळेस नक्की येईल.

एक उभारी उडण्याची तर पवन हात ना देते
धडपडते मन अधांतरी अन पंख साथ ना देते ..!!

नमस्कार मंडळी...

तुमच्या सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद...

तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे कार्यक्रम चांगला झाला... विशेषतः डॉ अनंत ढवळे सोडले तर एकही नावाजलेला शायर नसूनसुद्धा आणि मी धरून अजून दोन जणांचा हा सादरीकरणाचा पहिलाच अनुभव होता असे असून सुद्धा बरेच जणांना आवडला...

आम्हाला सादरीकरण करायलाही खूप मजा आली... प्रत्येकाने आपल्या चार गझला सादर केल्या.. त्यात एक फेरी हजलेची (विनोदी अंगाने जाणारी गझल) होती... त्यानंतर बशर साहेबांनी आपले मराठी गझल विषयी विचार मांडले आणि स्वतःच्या तीन गझल सादर केल्या. त्याला अर्थातच रसिकांची खूप दाद मिळाली...

दुर्दैवाने रेकॉर्डींगची व्यवस्था करता आली नाही Sad

पण पुढच्यावेळी नक्की रेकॉर्डींग करू. गझल्-सहयोग चा पुढचा मुशायरा एप्रिल मध्ये आयोजित करायचा आयोजकांचा मानस आहे...

तळटिप :
कार्यक्रम झाल्यावर आम्ही सर्व सादरीकरण केलेले शायर जेवायला बाहेर गेलो होतो... तिथेही एक छोटीसी मैफल रंगलेली.. बशर साहेबांनी तिथे त्यांच्या एकसे एक गझल सादर केल्या... त्यांच्या प्रतिभेने आम्हा सर्वांना खरोखर मंत्रमुग्ध केले...

Pages