गप्पागोष्टी

Submitted by मंदार-जोशी on 19 January, 2010 - 06:42

नमस्कार मंडळी,

हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.

मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत Happy अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.

gago.jpg

कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!

मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा
सौजन्यः कलाकार - पद्मजा_जो (संगणकीय कलाकारी), udayone (मूळ रेखाचित्र).

गगो स्नेहभेट उर्फ डब्बा गटग

दिवाळी २०११ निमित्ताने एक लेख........ मी गगो बोलतोय
- लेखक स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर).

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कसल ऊन, उकडायला लागल असेल लगेच तुमच्या गावात Happy
आमच्या गावात बघा, कधीच उकाडा नसतो (अगदी मुंबईसारखी हवा १२ महिने)

आपला कट्टा गप्पागोष्टी हा नवीन धागा काय भानगड आहे ? तिकडे सगळे दुस-या दुनियेतून आलेले लोक वाटताहेत.

जवा बघ्तीस तु माझ्याकड

बघितलं शोधून आत्ता, अरारा रे! काय गाणं आहे Lol
सुरुवातीचं म्युझिक ऐकूनच गणपतीला वाजवायसाठी मुद्दाम बनवलेलं वाटतंय Lol

कमाल गाणी आहेत !!
झिंगाट मागे पडलं का आता, का अजुन चालुच आहे !

हे पण नाही ऐकल !!
काळाच्या प्रचंड मागे पडलो आहे मी !!! Sad

दोन वर्षापुर्वी श ताईने शांताबाई गाण्याबद्दल सांगितले होते!! काय अशक्य डोक्याला ताप गाण होत ते !!!
बाप्पा पण नक्की कावले असतील ते गाण ऐकुन !!

आमच्या लहानपणा पासूनच नवीन पोपट हा वगैरे गाणी धुडघुस घालायची गणपतीला. ट्रेंड अजून बदलला नाहीय.

सुप्रभात
नोव्हेंबरात कोणा पुणेस्थीर गगोकरास वेळ असेल काय?