कमर्शियल/रेसिडेंशियल जागेसाठीचा भाडेतत्वाचा करार

Submitted by राहुल on 18 December, 2009 - 10:50

पुण्यात एक जागा कमर्शियल वापरासाठी आणि एक जागा रेसिडेन्शियल वापरासाठी भाड्याने द्यायची आहे. भाडेतत्वावर जागा देताना त्यात कायदेशीर बाबींची तरतूद कशी करावी, ह्यावर मार्गदर्शन हवे आहे.

इस्टेट एजंट rental agreement तयार करून देणार आहेच.
पण त्याच बरोबर कोणा वकीलाची अथवा कायदा सल्लागाराची मदत घ्यावी असेही वाटत आहे.
पुण्यामधे अशी मदत कुठे मिळु शकेल? (मायबोलीकरांमधे असे कोणी सल्लागार असतील तर त्यांची मदत घेण्याची इच्छा आहे.)

अश्या agreement चा सर्वसाधारण मसुदा काय असतो? आणि कुठले मुद्दे त्यामधे असणे गरजेचे आहे?
मायबोलीवर कोणाला असा करारनामा करण्याचा अनुभव असेल तर त्या बाबत इथे चर्चा करता येईल.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीड्स अ‍ॅन्ड डोक्युमेन्ट्स म्हणून एक पुस्तक मिळते बहुधा लेखक दिवेकर आहेत.७००-८०० किम्मत असावी. त्यात निरनिराळ्या अ‍ॅग्रीमेन्ट्सचे नमुने दिलेले आहेत. त्यावरून अशा अ‍ॅग्रीमेन्ट्स मध्ये कोणते क्लॉजेस टाकायचे असतात त्याची आयडिया येते. शिवाय स्वतःच्या काही अटी टाकता येतात....

खिळे ठोकायचे नाहीत. भिंती पाडायच्या नाहीत. मोठी झाडे परवानगीशिवाय तोडायची नाहीत. इतर काही ठाकाठोकी, एसी लावायला भगदाडे, नवीन नळ, इलेक्ट्रिक कामे (नवीन सॉकेट) वगैरे परवानगीशिवाय करायचे नाहीत. सामान आत-बाहेर करताना झालेल्या मोडतोडीची नुकसान भरपाई करायची. जाण्याच्या आधी स्वच्छतागृहांसहीत सर्व घराची साफ सफाई न केल्यास त्याचा खर्च डिपॉझिटमधुन वजा करण्यात येइल. मोहोल्ल्यातील इतर रहिवाशांना त्रास होइल असे वर्तन केल्यास एक महिन्याच्या नोटिशीवर करार रद्द करण्यात येइल. रेसिडेन्शिअल जागेत कुठलेही घरगुती (पापड, शिवणकाम इ) अथवा इतर अर्थाजनाचे उद्योग सुरु करु नयेत. घराची एक चावी कायम आमच्या ताब्यात राहिल. आम्ही आमच्या सोयीने (भारतात) येऊ आणि आल्यावर पुर्वसूचना न देता घराची तपासणी करु.
--------------------
अशा अर्थाचे काही मी मुलुंडला घर भाड्याने घेतले होते त्या करारपत्रात घरमालकांनी टाकले होते Happy

रॉबीनहूड धन्यवाद !
पुस्तक शोधायला सांगतो. (आमचा हा असाच उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार Happy ).
ह्या वर ऑनलाईन काही माहिती मिळू शकेल का?

राहुल,
तुम्ही खालील लिंक्स very basic draft agreement साठी रेफर करु शकता. हे draft फक्त एक कल्पना येण्यासाठी आहेत. तुमच्या गरजे प्रमाणे तुम्ही त्याच्यात फेरफार करुन घेउ शकाता.

AGREEMENT FOR LETTING FURNISHED DWELLING HOUSE OR FLAT
ON SHORT PERIOD TENANCY

http://www.vakilno1.com/forms/leaselicense/Leaselicence-300.htm

LEAVE AND LICENSE AGREEMENT
http://www.vakilno1.com/forms/leaselicense/Leaselicence-494.htm

ही agreement करताना एक बेसीक गोष्ट , लीज करण्याची व संपण्याची तारीख नीट बघुन घेणे. योग्य प्रकारच्या स्टँप duty व registration (जर लागु होत असतील तर) केले आहे याची काळजी घेणे. आपला इंटरेस्ट व्यवस्थीत जपला जातोय हे पहाणे. ( जरी वकिलाचा सल्ला घेतला तरी)

कायदेशीर गोष्टीत खूप interest असेल तर खालील अ‍ॅक्ट मधील Chapter V वाचणे.

http://dolr.nic.in/Acts&Rules%5CTransferOfPropertyAct(1882).htm

नुकतेच वाचले..डिसेंबर पासुन पुण्यात भाडेतत्वावर जागा दिल्यास भाडेकरुची माहिती पोलीस स्थानकात देणे आवश्यक आहे. (रेसिडेन्शिअल साठी तरी आहे कमर्शियल साठी माहित नाही).