मनोरंजन

उंदीरमामांची फजिती.......

Submitted by पुरंदरे शशांक on 5 November, 2012 - 05:35

उंदीरमामांची फजिती.......

उंदीरमामा चालले होते इकडेतिकडे पहात
धपकन पडले एकदम, नि चरफडले मनात

बघतात खाली चमकून ते आले काय पायात
टिकलीची डबी लाल निरखत घेऊन हातात

टिकल्या पाहून तोंडाला पाणी सुटले जोरात
खाऊ लाल वाटला त्यांना, घेऊन आले बिळात

दाताने उकरताना गेल्या एक्-दोन तोंडात
चावून चावून तुटत नाहीत काय करावे अशात

आतला खाऊ मिळेल कसा विचार केला मनात
घेतला एक दगड आणि फोडली पुढली जोशात

धाडधूम आवाज झाला छोट्याशा बिळात
मामा बिचारे घाबरुन आईकडे बघतात

हत्तीदादा....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 November, 2012 - 01:40

हत्तीदादा....

हत्तीदादा हत्तीदादा झुलता कित्ती छान
हालतात कसे मोठ्ठे मोठ्ठे सुपाएवढे कान

सोंड वळवळ करते ती कित्ती ती सापासारखी
कुठं बरं ठेऊ हिला शोध्ता का जागा सारखी ?

दात तर तोंडाबाहेर असले बिनकामाचे ?
ब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे ?

पाय ते केवढे मोठ्ठे आहेत नुस्ते खांबासारखे
दिस्ता कसे तुम्ही अगदी काळ्याशार डोंगरासारखे

शेपूट मात्र तुमची ही कित्ती बारीक एवढुशी
भल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी छोटीशी.....

शब्दखुणा: 

बडबडगीत...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 02:12

बडबडगीत...

एक छान चिऊताई
उड्या मारत दाणे खाई
चिवचिवाट उगा करत
अंगणभर नाचत जाई

एक कावळा काळा काळा
हाक मारी माझ्या बाळा
काव काव उठा उठा
खाऊ लौकर आणा मला

एक पिल्लू गोजिरवाणं
भू भूचं वेडं सोनं
शेपूट हल्वून करी ऊं ऊं
किती थांबू आणा खाऊ

म्याँव म्याँव मनीमाऊ
जर्रा झोप मोडा पाहू
वास येता खासम् खास
उड्या मारी मासेखाऊ

शब्दखुणा: 

LED आणि LFD मध्ये काय फरक आहे?

Submitted by मी अमि on 1 November, 2012 - 01:33

LED आणि LFD मध्ये काय फरक असतो? LFD ला सेट टोप बॉक्स जोडून टिव्ही दिसू शकतो का?

रान...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 00:16

रान...

रान मनात वसलं
पान पान तरारलं
रंग हिरवा लेऊन
सारं काळीज दाटलं

काळी भुई होती साधी
जरा बरड बरड
थेंब येता अवकाळी
कोंब उगवलं ग्वाड

निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून

उन्हा वार्‍याचा तो जोर
देतो जोम जगण्यास
हिरवाई जपताना
उगा मानावा का त्रास....

शब्दखुणा: 

चांदोबाही हसतो....

Submitted by पुरंदरे शशांक on 29 October, 2012 - 07:20

चांदोबाही हसतो....

काळा काळा पिंजलेला कापूस गेला
गोरा गोरा चांदोबा आकाशात आला

गोरा गोरा चांदोबा बघ्तो डोकावून
जागतंय कोण कोण चांदण्यात बसून

आटीव दुधाची आज आहे मज्जा
खेळ गाणी खूप खूप जोडीला गप्पा

दूध पिऊन सोनूच्या ओठावर मिशी
चांदोबाही हसतो वर फिशीफिशी....

बावन्नपानी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 October, 2012 - 23:24

"एऽ, त्यांच्यात ना बदामसातला सत्तीलावणी म्हणतात."
"हो! आणि गुलामचोरला गुल्लीदंडा, साताठला हातओढणी आणि बेरीज झब्बूला जपानी झब्बू म्हणतात."
"मग काय झालं? नावं वेगळी असली तरी खेळ तोच ना? चला! आपणही जाऊ त्यांच्यात खेळायला."
"एऽ, पण मला ते तीनपत्ती का काय ते येत नाही खेळायला."
"एऽ, तो मोठ्यांचा खेळ असतो. आपण हिम्याकाका नाहीतर परागकाकाला सांगू हळूचकिनी आपल्याला शिकवायला, काय?"

असे संवाद ऐकू आले म्हणजे जवळपास कोठेतरी पत्त्यांचा डाव रंगात आला आहे असे समजावे!

विषय: 

चांदोमामा चांदोमामा....

Submitted by पुरंदरे शशांक on 28 October, 2012 - 23:14

चांदोमामा चांदोमामा....

लपाछपी गमतीची
खेळतो कसा
चांदोबा ढगाआडून
बघतो कसा

गोल गोल पुरीसारखा
दिस्तो कसा
हळुहळु करंजी
होतो तू कसा

कोरीतून पुन्हा तू
हस्तो कसा
चांदोबा आमचा हा
मामा न्हेमीचा

ससा हरिण मांडीवर
घेतो कसा
आवडतो मला हा
मामा गोरासा .....

'महफिल-ए-गझल' - पंकज उधास

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 October, 2012 - 03:55

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्‍याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.

pankaj.jpg

एक पिल्लू माऊचं

Submitted by पुरंदरे शशांक on 22 October, 2012 - 00:32

Image1085.jpg

एक पिल्लू माऊचं
काळ्या-पांढर्‍या ठिपक्याचं

बसलं बागेत केव्हाचं
उन खात सकाळचं

फुलपाखरु भिर्भिरताना
कित्ती माना वळवायचं

आळसानं भरभरून
तिथेच पडून रहायचं

वास येताच दुधाचा
घरात पळत जायचं

दूध लप्लप पिताना
डोळे मिटून घ्यायचं

मग मात्र अंग सारे
चाटून साफ करायचं

अस्सं पिल्लू माऊचं
आमच्याच घरी असायचं...

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन