मनोरंजन

टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)

Submitted by Rajesh Kulkarni on 20 November, 2015 - 23:18

टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)

कोणाच्या व्यवसायाबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या पोटापाण्याचा मार्ग असू शकतो.

माझ्या मते या रेम्या डोक्याच्या सिरियल्स समाजाला मानसिकद्ृष्ट्या अधु करण्याचे काम करत आहेत; मराठी-हिंदी- बहुतेक सगळ्याच. समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच.

भंसाळींचे रामायण आणि महाभारत

Submitted by वाट्टेल ते on 20 November, 2015 - 13:01

माननीय संजय लीला भन्साळी यांची उतू जाणारी प्रतिभा, सिनेअभिव्यक्त होण्यासाठी, एका दादल्याच्या २ बायकांमध्येच अडकून पडली आहे. हिंदी सिनेसृष्टीचे त्यामुळे अपरिमित नुकसान होत आहे. या लेखाद्वारे त्यातून त्यांना बाहेर काढून, रामायण आणि महाभारत या आमच्या आद्य साहित्याच्या प्रांगणात त्यांच्या प्रतिभेला उधळायला लावण्याचा आमचा मानस आहे. हल्ली ३-४ दिग्दर्शकांनी एकत्र येउन (वि)चित्रपट बनवण्याचे प्रयत्न झाले होते त्याचे पुढचे पाऊल म्हणून भन्साळींनी, बडजात्या, थोडेसे करण जोहर, गोवारीकर बगैरे मंडळीना जोडीला घेऊन ऱामायण, महाभारतासारखा मोठा canvas घेऊन त्यावर काम करायचे मनावर घ्यावेच.

फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 20 November, 2015 - 12:39

फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५
.
१) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींचा लहरीपणा

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

Submitted by Rajesh Kulkarni on 20 November, 2015 - 05:00

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको.

फाटक - २

Submitted by घायल on 19 November, 2015 - 14:40

मागील भागासाठी येथे क्लिक करा

तसं अगदीच रटाळ आयुष्य नाही.

दिवस येतात , जातात. या संथपणाची सवय झालीय. शरीर साथ देत नाही म्हणून आराम कि आरामामुळं शरीर साथ देत नाही हे समजत नाही. आता कुणी येतही नाही. मुलगा नोकरी धंद्यानिमित्त बाहेर गेला ते नंतर आलाच नाही. पत्रं यायचं. फोन आल्यावर फोन आले होते. पण ही गेल्यानंतर फोन सुद्धा यायचे बंद झाले.

शब्दखुणा: 

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:59

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?
स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा .
.
.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

फुसके बार – १९ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:47

फुसके बार – १९ नोव्हेंबर २०१५
.

१) मराठी टीव्ही चॅनल्सवरील चर्चेत कनिष्ठ पत्रकार त्यांच्याच चॅनलच्या वा इतर वरिष्ठ पत्रकारांना सर असे का संबोधतात? इंग्रजी चॅनल्सवर ही पद्धत दिसत नाही. महेश म्हात्रे, राजीव खांडेकर व डॉ. उदय निरगुडकर आपल्या सर्वच सहका-यांना तसे न करण्याबद्दल सूचना देतील काय? नाव वा आडनाव वापरून आदरार्थी बोलायला काय हरकत आहे?

२) ढग तरी कोठे खरोखर स्वच्छंदी असतात? त्यांनाही वारे नियंत्रित करतातच की. चंद्राबद्दलची काही गुपिते कळल्यावर काही कवीकल्पना बाद झाल्या किंवा थोड्याशा गैरलागू झाल्या. हाही प्रकार तसाच म्हणायला हरकत नाही.

३) सविस्तार हा शब्द योग्य की सविस्तर?

फुसके बार – १८ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:43

फुसके बार – १८ नोव्हेंबर २०१५ .

.
१) सईद जाफरी गेले. मिस्किलता आणि त्यांचे अगदी नैसर्गिक नाते होते. डोळे मोठे करून बोलण्याची त्यांची लकब नेहमी लक्षात राहिल. मला वाटते त्यांची सर्वात मोठी व महत्त्वाची भूमिका शतरंज के खिलाडीमध्ये असावी. भारतातील क्रिकेटच्या विश्वचषकाच्यावेळी, म्हणजे मला वाटते १९९६मध्ये कार्यक्रमात विविध संघांच्या कर्णधारांची नावे घेताना झालेल्या मोठ्या चुकीनंतर म्हणजे गेली जवळजवळ २० वर्षे ते फार दिसलेच नाहीत. त्यांनी तो प्रकार मनाला फारच लावून घेतल्याचे ऐकले होते.

फुसके बार – १७ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:37

फुसके बार – १७ नोव्हेंबर २०१५
.
१) चेन्नई व परिसरात मुसळधार पावसामुळे ७०एक बळी गेलेले आहेत. पण देशाचे तिकडे म्हणावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. मागे ओडिशामध्ये येणा-या वादळासाठी जय्यत पूर्वतयारी केल्यामुळे जवळजवळ शून्य प्राणहानी झाली होती. यावेळी तेवढी काळजी का घेण्यात आली नाही की वादळ व त्यामुळे होणा-या पावसाचा अंदाज चुकला?

२) साळीच्या लाह्या खाताना किंवा पोहे खाताना दाताखाली तांदळाचे टरफल येते तेव्हा जे अंगावर काटा आणणारे सेंसेशन येते, त्याला कोणत्या भाषेत काही नाव आहे काय?

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन