थेंबे थेंबे तळे साचे - (काहीच्या)काही कविता

Submitted by मानव पृथ्वीकर on 15 October, 2015 - 03:02

मी एक थेंब,
तू एक थेंब
थेंबे थेंबे तळे साचे
तळ्यामध्ये बेडुक नाचे!

बेडुक म्हणाला डरांव डुक
माशा ऐवजी मला का हूक?
लागलीच असेल एवढी भूक
तर संजीव कपूरला ठेवा कूक!

संजीव कपूरला लागली उचकी
कुरवाळीत आपली दाढी मोजकी
डोक्यात त्याच्या आला विचार
उपासाचा का करु नये प्रचार?

तुझी नि माझी एकादशी
कशी काय आली एकाच दिशी?
उपास तुझा नि उपास माझा
उद्या दोघेही खाउ पिझ्झा!

पिझ्झ्यासोबत गार्लिक ब्रेड
आवडेल काय तुला कॉम्रेड?
आला असेल जर याचा वीट
मावशी बनवेल खमंग थालीपीठ!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फनी.

वा !
कवि दिना निमित्त शुभेच्छा !