जेष्ठ नागरिकांसाठी ब्रिज क्लब चालू करणेबाबत

Submitted by मेधावि on 20 October, 2015 - 11:35

माझ्या ८१ वर्षाच्या वडिलांना विरंगुळा म्हणून मला घरातच ब्रिज-क्लब सुरु करायचा आहे. परंतु आजकाल ब्रिज खेळणार्यांची संख्या फारच कमी असल्यामुळे मेंबर्स मिळणे कठिण झाले आहे. काही जवळ रहात नसलेले जेष्ठ नागरीक उत्सुक आहेत पण ये-जा जमत नसल्याने त्यांना मनात येईल तेव्हा येता येत नाहीये. (त्यांना देखील त्यांच्या परिसरात सभासद मिळवण्यासाठी अशीच अडचण येते आहे.) तस्मात कोथ्रुडात कोणी सभासद होण्यास उत्सुक असल्यास संपर्क करणे. ह्या उपक्रमासाठी काहीही शुल्क नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधाव्ही, कोथरुडातील ज्येना संघांच्या कार्यालयांत वा त्यांच्या नित्य भेटण्याच्या स्थळी एखादे पत्रक बनवून लावलेत तर असे इच्छुक लोक भेटण्याची / मिळण्याची शक्यता अधिक आहे. डहाणूकर, सहवास सोसा, नवसह्याद्री, कर्वेनगर परिसर व पौड रस्त्यावरील ज्येना संघांचे येथे सांगता येईल. सवंगडी ज्ये ना संघ भुसारी कॉलनी, स्नेहवर्धन ज्ये ना संघ शिवतीर्थनगर इत्यादी ठिकाणीही सांगता येईल.

जवळच्या जेष्ठ नागरिक क्लब्स बद्दल फारशी माहीती नाहीये त्यामुळे ती शोधाशोध होईपर्यंत पर्याय म्हणून इथेही शोधाशोध सुरु केली आहे.

हे भारी आहे. नक्कीच सांगेन. परंतु त्या निमित्ताने ह्या सर्वांसाठी एक हक्काची व रोजची करमणुकीची जागा निर्माण करायची आहे. तसेच येत्या नोव्हेंबरात वडिलांना "हीच" भेट द्यायची आहे.

मला इंटरेस्ट आहे. फक्त वेळा जुळल्या पाहिजेत. मी २० डिसेंबर पासून जॉईन होऊ शकतो.

खेळणार्‍यांची संख्या कमी झाली आहे कसे म्हणता? डेक्कन जिमखान्यावर चौकशी केली आहे का? त्यांच्या तर दरमहा स्पर्धा सुरू असतात.कोथरूडमधील लोकांची संख्या कमी असेल.

आमच्या इथे पटवर्धन बागेत श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात ज्ये.ना.सं.आहे. तिथे पत्रक दिले तरी चालेल.

अरे वा. चांगला उपक्रम. ऑनलाइन खेळता येतेच. त्या बद्दल अजून माहिती देते विचारून. पण नथिंग लाइक समोर बसून खेळणे. तयाच्या चर्चा करणे इत्यादि. माझ्या नवृयाचा हा अति फेवरिट खेळ होता. एक रवी खाडिलकर मेमोरिअल स्पर्धा चालू करा. मी स्पॉन्सर करू शकेन. रवीचा एक मित्र ठाण्यात आहे तो कायम ऑनलाइन खेळत असतो. त्याला पण माहिती विचारते.

क्लबला अजूनही काही साहित्य, स्पॉनसर शिप लागली तर मला जरूर संपर्क करा. विपू टाका.

अमा धन्यवाद. चांगले मेंबर्स मिळाले तर नक्की चालू करू खाडिलकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धा. सध्या में बर्स मिळवण्यासाठी खटपट चालू आहे. शरद, अजून २-३ मेंबर्स मिळाले की तुम्हाला कळवते.

ह्या उपक्रमामुळे आम्च्या घरच्याअंगणाचा उपयोगही होईल व जे.नांसाठी आपण काहीतरी केल्याचे मानसिक समाधानही लाभेल असा दुहेरी उद्देश आहे.