ब्रिज

जेष्ठ नागरिकांसाठी ब्रिज क्लब चालू करणेबाबत

Submitted by मेधावि on 20 October, 2015 - 11:35

माझ्या ८१ वर्षाच्या वडिलांना विरंगुळा म्हणून मला घरातच ब्रिज-क्लब सुरु करायचा आहे. परंतु आजकाल ब्रिज खेळणार्यांची संख्या फारच कमी असल्यामुळे मेंबर्स मिळणे कठिण झाले आहे. काही जवळ रहात नसलेले जेष्ठ नागरीक उत्सुक आहेत पण ये-जा जमत नसल्याने त्यांना मनात येईल तेव्हा येता येत नाहीये. (त्यांना देखील त्यांच्या परिसरात सभासद मिळवण्यासाठी अशीच अडचण येते आहे.) तस्मात कोथ्रुडात कोणी सभासद होण्यास उत्सुक असल्यास संपर्क करणे. ह्या उपक्रमासाठी काहीही शुल्क नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

ब्रिजमधील अशीच एक गम्मत

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आई-वडील आल्यामुळे आणि जयपण ईंटरेस्ट घेत असल्याने आजकाल रोज ब्रिजचा 'अड्डा' बसतो/जमतो. कालची अशीच एक गम्मत.

आमचा तीन बिनहुकुमीचा कॉल होता. बदामात माझ्याकडे गुलाम आणि एक पत्ता, जयकडे राणी आणि दोन पत्ते, आईकडे एक्का आणि ३ पत्ते आणि दादांकडे राजा आणि तीन पत्ते. चाली आलटून-पालटून दोन्हीकडे जात होती आणि तरीही माझ्या गुलामाचा हात झाला आणि शेवटचा हात आमचा आवश्यक असा नववा झाला तो चवकट सत्तीचा ज्यावर बदामचे राणी, राजा आणी एक्का असे तिघेही सर झाले.

(कुठेतरी लिहून ठेवायचे म्हणून इथे लिहीले आहे).

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ब्रिज