मनोरंजन

विषय क्रमांक १ : हजारो ख्वाईशे ऐसी...

Submitted by अमृतवल्ली on 29 August, 2012 - 01:58

अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर पाचव्या तासाचा टोल अखेर पडला. चौथ्या तासाच्या मास्तरांनी टेबलावरची पुस्तके गोळा केली आणि संथपणे फळा पुसायला सुरुवात केली. आज काहीतरी वेगळच घडतय. सकाळपासून कसलं तरी विचित्र वातावरण आहे.नुकत्याच पडलेल्या टोलचा आवाज कानांना उगाचच जड वाटू लागला. इतर वेळी तासाची घंटा पडल्यापडल्या सगळ्या वर्गातून कसलेकसले आवाज सुरु होतात. आज घंटेचा आवाज विरला तरी फारशी हालचाल नव्हती. व्हरांड्यात यांत्रिकपणे फिरणारे शिक्षक, उगाचच सुन्न वाटणारा वर्ग आणि माझ्या बाकाजवळच्या खिडकीतून खाली दिसणाऱ्या विहिरीच काळं पाणी. आमच्या वरच्या मजल्यावरच्या सातवीच्या वर्गातून शाळेच मैदान दिसत.

विषय क्र. १: निवडक दहा !

Submitted by मंजिरी सोमण on 28 August, 2012 - 01:24

त्याचं काय आहे, की आम्हाला सगळं हटके करायचा उगाचच चस्का होता एका वयात... आम्हाला म्हणजे मी आणि माझी मैत्रिण..... कॉलेजात असताना.

विषय १: एक अतूट नातं - सिनेमाचं

Submitted by सशल on 27 August, 2012 - 18:50

"सिनेमाशी तुझं नातं काय"? असा प्रश्न जर कोणी भारतीय माणसाला विचारला तर मला वाटतंय कमी-अधिक फरकाने "आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:ख वाटून घेणारा एक सच्चा मित्र" असंच उत्तर मिळेल. मीही ह्याला अपवाद नाही. ओळख झाली तेव्हापासून अगदी मनापासून भरभरून प्रेम केलेलं आणि दोन्हीकडच्या अपेक्षांचा ताळमेळ साधण्यात कुठेच कसर न राहिलेलं हे एकमेव नातं. अर्थात सिनेमा म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती नसली तरी एक सच्च्या मित्राचं जे स्थान आपल्या आयुष्यात असतं तेच सिनेमाचंही आहे.

मण्णी मण्णी, चिव् चिव् चिमणी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2012 - 11:35

मण्णी मण्णी
चिव् चिव् चिमणी

टपटप टिपते
तांदूळ मणी
थेंब थेंब पिते
वाकून पाणी

इकडे तिकडे
बघत म्हणते
आहे का कुणी
मी तर चिमणी

पायावर कशी
थुई थुई नाचते
नाचत म्हणते
चिव् चिव् चिमणी

सीरिअल किलर

Submitted by प्रसन्न अ on 27 August, 2012 - 07:19

"एका लग्नाची दुसरी गोष्ट" या मालिकेवर माबोच्या सभासदांनी केलेली समीक्षा पाहून
आज या धाग्याचे उद्घाटन करताना उर भरून आलेला आहे .
ए ल दु गो संपल्याने तसेच तो धागा दुधडी भरून वाहू लागल्याने , हे नवीन धागारुपी धरण बांधण्यात आलेले आहे
माबोचे स्टार समीक्षक स्वप्ना राज , भुंगा, रिया, अश्विनिमामी , मामी , साधना, उदयन,मैना आणि इतर टीम (मी धरून Wink )
या धाग्यावर ,सध्या धुमाकूळ घालणाऱ्या मालिकांची समीक्षा (?) {बाजार उठला रे } तसेच बर्यापैकी बघितल्या जाणार्या मालिकांचे गुणविशेष वर लिहिलेल्या पॅनल द्वारे नोंदवले जातील
माबोचे सभासद उत्स्फूर्त पणे यात भाग घेतील हि अपेक्षा .

इटुकलं मिटुकलं

Submitted by पुरंदरे शशांक on 26 August, 2012 - 23:13

इटुकलं मिटुकलं
बाळ कसं पिटुकलं

मऊ मऊ दुपट्यात
छानसं गुंडाळलं

टुळुटुळु बघतंय
गोडुलं छोटुलं

आईच्या कुशीत
मुठी चोखत विसावलं

शब्दखुणा: 

विषय क्र. १- स्वप्नातला 'राज'कुमार

Submitted by Manaskanya on 26 August, 2012 - 19:10

शाहरुख हा माझा आवडता हिरो. अगदी 'फौजी' ह्या TV सीरिअल पासून. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकाच channel होत. आम्ही त्या अभिमन्युसाठी अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत असायचो. तो केव्हा सिनेमात येतो अस झाल होत ते सीरिअल बघून. 'दिवाना' हा त्याचा पहिला सिनेमा. पण मध्यंतरापर्यंत शाहरुख ची एन्ट्रीच झाली नाही. त्या रोल मध्ये तो फारसा आवडला नाही. मग आला 'बाजीगर'. शाहरुख भावला पण ते कॅरक्टर मात्र आवडल नाही. नंतर १९९५ मध्ये आला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि शाहरुखचा 'राज' खूप खूप आवडला. अजूनही तितकाच आवडतो. एक तर मला यश चोप्रा/ आदित्य चोप्रा चे सिनेमे खूप आवडतात.

शब्दखुणा: 

मन्नी मन्नी आमची माऊ

Submitted by पुरंदरे शशांक on 22 August, 2012 - 01:17

मन्नी मन्नी आमची माऊ
येताय का कडे भुर्र जाऊ

कश्शी खुलली कळी आता
भुर्रचं नुस्तं नाव काढता

हात पसरुन लगेच तयार
मन्नी आमची कस्ली हुशार

थांब जरा बदलुंदे फ्रॉक
लग्गेच नकोय नाकावर राग

वाजता सँडल बघते कश्शी -
'नेणारे मला का निघ्घाली तश्शी '....

विषय क्र. १ - "हरिश्चंद्राची फॅक्टरी" - माझ्या चष्म्यातून....

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2012 - 07:15

विषय क्र. १ - "हरिश्चंद्राची फॅक्टरी" - माझ्या चष्म्यातून........

मराठी सिनेमाचा अगदी धावता आढावा घेतला तर पौराणिक, संतपट, तमाशा, सामाजिक, समाजप्रबोधन, वास्तव, विनोदी अशा वळणावळणाने जात असता अचानक समोर येतो तो या सगळ्यांपासून आपले वेगळेपण दाखवणारा - श्री . परेश मोकाशी दिग्दर्शित "हरिश्चंद्राची फॅक्टरी" हा चित्रपट - एखाद्या जलाशयावर असलेल्या अनेक पक्ष्यांच्या गर्दीत एखादा डौलदार राजहंस सहज अलगद उतरताना आपले लक्ष वेधून घेतो ते कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, आपल्या अंगभूत सौंदर्यानेच.... तसाच हा चित्रपट ......

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन