कोण असे गुणवंत ओळखा हरी

Submitted by हेमाशेपो. on 6 November, 2015 - 09:38

आज कोण खाणीमधे तांबे खेळितो
धारपांच्या भयकथेत पत्रे लिहीतो

चौर्य इये साहीत्यिया नगरी घडवितो
वरुनि गोड दवणीय अश्रू ढाळितो

खुंटीला पंच्यासवे स्वाभिमान गं
आयडी वधता क्षणी झणी टांगितो

आमंत्रणे धाडूनिही निग्रही असे
रोज रोज चार चार क्लोन बनवितो

कोण असे गुणवंत ओळखा हरी
भस्मासूर कोण तुम्हा हात लावितो

हेमा शेखर पोतदार

Group content visibility: 
Public - accessible to all site users