मनोरंजन

पाऊस असाही ...

Submitted by पुरंदरे शशांक on 21 July, 2015 - 00:15

पाऊस असाही ...

माझ्या मनात पाऊस
येतो अधून मधून
खुणावित जातो वेडा
जरा डोळे मिचकून

घोंघावत रोरावत
येतो वाभरा बनून
आवरावे कसे याला
कसे घालावे बांधून

रेशमाच्या झालरींनी
करी नाजूक शिंपण
याचे विभ्रम पहाता
जातो आश्चर्य पावून

ऊन-पावसाचे नाते
उलगडे असासून
शब्दरुप गर्द पान
येई वर तरारून .....
----------------------------------------

शब्दखुणा: 

पहिली फ्लाइट ............ जरा हटके

Submitted by स्वीट टॉकर on 20 July, 2015 - 07:10

माझ्या सौभाग्यवतीला माबोकरीण होण्याची इच्छा होती पण बर्‍याच वेळा मदतपुस्तिकेशी संपर्क साधून देखील Invalid Password चा प्रॉब्लेम सुटू शकला नाही. त्यामुळे तिनी माझ्याच आय डी वर लिहायचं ठरवलं आहे.

पहिली फ्लाइट ............ जरा हटके

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट

Submitted by vishal maske on 18 July, 2015 - 03:47

रसिकांकडून होत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन सदरील कविता ऑडीओसह पुनर्प्रसारित करण्यात येत आहे,...

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...

तुझ्या-माझ्या मधला,दुवा होऊ दे इंटरनेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... |||धृ||
तुझे अबोल बोलके डोळे
अन् लाजरी-लाजरी नजर
डोळे मिटवण्या आधीच
होतेय डोळ्यांपूढे हजर
माझ्या ह्रदयात तुझ्या,प्रेमाचं गं बेट
सखे,तु व्हाट्सअप वरती भेट,...||१||
तुझे सळसळणारे केस
अन् डूलडूलणारे कान
गोल-गोबरे गाल अन्
भिरभिर फिरती मान
सतवताहेत गं मला,अर्धचावले ओठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||२||
या ओसाड माझ्या मनी
तु फुलव प्रेमाचा मळा
मनसोक्त पाहू दे मला

बॉलिवूडची बडबड

Submitted by पल्लवी अकोलकर on 14 July, 2015 - 06:27

बाप रे!
शब्दांना किती महत्व आहे, याची प्रचिती मानव जातीला जन्माला आल्यानंतरच येवू शकते.
आणि, खास करून भारतीय माणूस म्हणून जन्माला आल्यावर तर फारच...
काय काय साध्य करू शकतात हे शब्द...?

नविन नातं निर्माण करू शकतात, प्रेम निर्माण करू शकतात, राग, द्वेष निर्माण करू शकतात, चेहर्‍यावर हास्य आणू शकतात, भावनाविवश करू शकतात, आणि काहीवेळेस डोळ्यांत पाणी देखील आणतात.
तर असा, भावभावनांचा अविष्कार घडविणार्‍या, या शब्दांची जादू आपल्या बॉलिवूडने, खूप पूर्वीपासूनच अगदी लिलया पेलली आहे.
वजनदार शब्द आणि प्रभावी संवाद असतील तर काय काय धमाल होवू शकते, याची कमाल बघावी, तर आपल्या हिंदी फिल्म सॄष्टीतच.

विषय: 

जुनून...आता विस्मरणात गेलेला पण एक उत्तम चित्रपट.

Submitted by पद्मावति on 12 July, 2015 - 18:55

शशी कपूर----एक अभिनेता म्हणून हे नाव कधी मला लक्ष द्यावसं वाटलच नव्हतं. लहानपणी कधीतरी टीवी वर ना ना करते प्यार तुम्हिसे कर बैठे म्हणणारा एक छान चॉकलेट हीरो म्हणून इतकीच यांची ओळख. जास्तीत जास्तं दीवार, त्रिशूल मधे अमिताभचा भाऊ किंवा मित्र म्हणून. बस, त्यापुढे या शशी कपूर या हिरोची ची ओळख असली तरीही शशी कपूर ह्या अभिनेत्याची कधीच ओळख नव्हती.

काही दिवसांपूर्वी एक झालं की एक गोड गाणं ऐकायला मिळालं. हे गाणं कशातलं असेल म्हणून शोधत होते तर एक फार छान चित्रपट हाती लागला. हा चित्रपट होता जुनून. दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि निर्माता शशी कपूर.

विषय: 

इंग्लिश मिडीअम मध्ये शिकणारी मराठमोळी मुलं

Submitted by पल्लवी अकोलकर on 11 July, 2015 - 09:00

नुकतेच मुलांच्या परीक्षेचे टाईम-टेबल मिळालेले आहे.
त्यामुळे सध्या घरात अभ्यासाचे वातावरण आहे.
अभ्यासाचे म्हणण्यापेक्षा, आभासाचे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
असो,
टाईम-टेबलवर नजर टाकल्यावर मी नकळतच निवांत झाले होते.
पहिलाच पेपर मराठी भाषेचा आहे.
म्हणलं, चला मराठीचा पेपर म्हणजे, सुरुवात तरी चांगली आहे.
निदान विषय तरी सोप्पा आहे.
कारण अर्थातच, इंग्लिश मिडीअमच्या विद्यार्थ्यांना, लोअर लेव्हलचे मराठी असते.

पण माझ्या, इयत्ता ५ वीच्या मुलाचा अभ्यास घेतांना लक्षात आले, प्रकरण फारच गंभीर आहे.

विषय: 

इंग्लिश मिडीअम मध्ये शिकणारी मराठमोळी मुलं

Submitted by पल्लवी अकोलकर on 11 July, 2015 - 09:00

नुकतेच मुलांच्या परीक्षेचे टाईम-टेबल मिळालेले आहे.
त्यामुळे सध्या घरात अभ्यासाचे वातावरण आहे.
अभ्यासाचे म्हणण्यापेक्षा, आभासाचे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
असो,
टाईम-टेबलवर नजर टाकल्यावर मी नकळतच निवांत झाले होते.
पहिलाच पेपर मराठी भाषेचा आहे.
म्हणलं, चला मराठीचा पेपर म्हणजे, सुरुवात तरी चांगली आहे.
निदान विषय तरी सोप्पा आहे.
कारण अर्थातच, इंग्लिश मिडीअमच्या विद्यार्थ्यांना, लोअर लेव्हलचे मराठी असते.

पण माझ्या, इयत्ता ५ वीच्या मुलाचा अभ्यास घेतांना लक्षात आले, प्रकरण फारच गंभीर आहे.

विषय: 

विडंबन : मै और मेरी तनहाई

Submitted by आशूडी on 25 June, 2015 - 05:40

(मूळ लेखकाची क्षमा मागून)
*
मै और मेरे सपनोंकी बाई
अक्सर ये बाते करते हैं
तुम होती तो कैसा होता
(उशीरा आल्याबद्दल टोकलं तर)
तुम ये कहती, तुम वो कहती
(भांड्यांचा ढिगारा बघून)
तुम इस बात पे हैरान होती
(कुठेत जास्त मी म्हणताच)
तुम इस बात पे कितनी हसती..
तुम होती तो ऐसा होता..तुम होती तो वैसा होता
मै और मेरे सपनोंकी बाई
अक्सर ये बाते करते हैं

(ये रात है या तेरी जुल्फे खुली हुई है)
ही धुतलेली भांडी आहेत की खरकटी राहिलेली
(है चांदनी
या तुम्हारी नजरों से मेरी राते धुली हुई हैं)
ही फरशी
जशी महिन्यापूर्वी पुसलेली दिसते आहे
(ये चांद है या तुम्हारा कंगन)

विषय: 

ग्रुप अॅडमीन

Submitted by vishal maske on 21 June, 2015 - 09:12

~!!! ग्रुप अॅडमीन !!!~

कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. 9730573783

प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे
कुणीही ग्रुप काढू शकतो
सोशियल मिडीयाने माणसं
प्रत्येकजण जोडू शकतो

ज्याच्या-त्याच्या इच्छेनुसार
ज्याचा-त्याचा वावर असतो
सोशियल मिडीयातील ग्रुप
प्रसारणाची पावर असतो

कुणासाठी कुटूंब असतो
कुणासाठी मात्र गँग असतो
अन् ग्रुपमध्ये वावरतानाही
कुणी भलताच हँग असतो

कुणाला नावडते असतात
कुणाला आवडते असतात
सोशियल मिडीयातील ग्रुप
भलतेच दवडते असतात

नको असलेल्या बाबींचाही
कधी गौप्यस्फोट होऊ शकतो
तर कधी-कधी आपलाच ग्रुप
आपल्या अंगलट येऊ शकतो

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन