मनोरंजन

बाफों की रानी, धागों का राजा

Submitted by एक प्रतिसादक on 30 January, 2013 - 02:50

( डिसक्लेमर : या लेखातील सर्व पात्रं काल्पनिक आहेत. वास्तवाशी त्याचा कुठलाही संबंध नाही. यातल्या नावाची व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असल्यास तो योगायोग समजावा. मात्र कुणी स्वतःवर ओढून घ्यायचंच ठरवल्यास लेखक त्याला जबाबदार नाही)

द्विमात्रिक गझल...

Submitted by अ. अ. जोशी on 30 January, 2013 - 00:04

गझलेसाठी सर्वात लहान बहर काय असू शकतो याचा विचार करीत असताना सुचलेली गझल...

धड
पड

फळ
वड

सर
गड

नर
नड

पर
जड

हस
रड

कुल
कड

फुल
झड

चुक
दड

मुक्या अप्सरेचा मुका गार होता...

Submitted by विडंबनराव on 28 January, 2013 - 12:22

सतीश साहेब धन्यवाद... आमची भूक तुम्ही बरोब्बर जाणता...

मुक्या अप्सरेचा मुका गार होता
मिठीच्या तिचा फक्त आधार होता

तिचा भाव घाऊक होता जगाशी
खुळ्या, तूच झाला निराधार होता

तिचे वजन भारी, कसे मी वदावे
तनावर कशाचा, किती भार होता

मुके का कडू, गोड वाट्यास आले
कळेना, तिथे फार अंधार होता

बरे जाहले तूच शरमून गेला....
तुझ्या मागुती चाप बसणार होता

जरी गाठ धरलीस, सुटलीच पण ती....
तसा पाहुनी तुज नमस्कार होता

मुले झोपती टाकुनी नित्य माना
अशा मास्तराचाच सत्कार होता

खुळ्याने तयाला नमस्कार केला
तया वाटले तोच झुंझार होता

कुले चोळता भ्यायले लोक याला

शब्दखुणा: 

गझलियत वाटुनी बोट खाशी...

Submitted by विडंबनराव on 28 January, 2013 - 11:28

विनायक उजळंबे यांच्या गझलेवरून सुचलेले...

गझलियत वाटुनी बोट खाशी
पेग जाईल जेंव्हा तळाशी

झेप मी घेतली उंच गगनी
काढता जाळ कोणी कुल्याशी

वास सोडीत जातो गझलचा
अत्तराची अपेक्षा जनाशी

झिंगणे हेच आयुष्य बाळा
तेच घडवे सभा अंतराशी

थंड रक्तास पाजून व्हिस्की
जोड नाते तुझे झिंगण्याशी

घोर माझ्या खिशाला कशाला?
आज गुत्त्यातला तू खलाशी

**** हे विडंबन या गझल करणार्‍यावर नाही. मी फक्त कवितांचा आधार घेतो. विडंबन मूळ कवीवर असते असे नाही. गैरसमज करून घेऊ नये. करमणुक म्हणून पहावे.

शब्दखुणा: 

हॅरी पॉटर: नीलम खेळ

Submitted by YOU KNOW WHO on 28 January, 2013 - 01:34

नमस्कार मंडळी!

प्रतिसृष्टीच आहे तर इथं का नको हा खेळ? Proud

तर नीलम गेम तुम्हाला माहीतच असेल. एकाने एक शब्द लिहायचा आणि पुढच्याने त्यासंबंधीत दुसरा शब्द लिहायचा.

शब्द लिहिताना हे लक्षात ठेवा:

  • तसं (मगल्सच्या दृष्टीनं) बघितलं तर हॅरी पॉटरमधले कोणतेही दोन शब्द हे या खेळात ग्राह्य धरायला पाहिजेत.
    म्हणजे, 'हॅरी --> वॉण्ड' हे ग्राह्य धरायला पाहिजे. पण इथं हे ग्राह्य धरता येणार नाही कारण हे फारच जनरलाईझ्ड होईल.
    म्हणजे कसं तर 'अजय गल्लेवाले --> की-बोर्ड' हे किती जनरलाईझ्ड होईल तसं.
    त्या शब्दांचा फार निकट संबंध असायला पाहिजे.
    I hope I made my point clear.
विषय: 

पद्म पुरस्कार २०१३ : सध्या निकष काय आहेत ?

Submitted by असो on 25 January, 2013 - 22:39

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची ही संपूर्ण यादी.
http://zeenews.india.com/news/nation/padma-awards-full-list-of-winners_8...

सर्वांचे अभिनंदन !

पुरस्कारांचे निकष काय असतात / असावेत यावर इथे चर्चा करू.

काचेचा लोलक

Submitted by सुज्ञ माणुस on 23 January, 2013 - 00:31

काचेचा लोलक

कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा....
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा, राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा .....
कंटाळ्याचा.. देखील आता कंटाळा येतो...........
अरे... वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला????? अरे.... त्याला सुद्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक....

विषय: 

पुणे-५२ - एक आगळी वेगळी गुप्तहेरकथा

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 09:32

कुठल्याही चित्रपटाचे प्रोमोज पाहून त्याच्या कथानकाविषयी आपण काही आडाखे बांधून मनात तशी रुपरेषा कल्पून सिनेमा पहायला जातो. गुप्तहेराची कथा म्हटली की सर्वसामान्यपणे एखादा खून, दरोडा, ब्लॅकमेलिंग, काळा धंदा, स्मगलिंग इत्यादींचा छडा इतकेच कंगोरे आपल्याला सुचू शकतात. आणि मग अश्या कथानाट्यामध्ये गुप्तहेर म्हणजे एकदम हँडसम, ऊंच, प्रसंगी गुंडांशी दोन हात करून त्यांना यमसदनी धाडणारा, मदनिकांना घायाळ करणारा, उंची गाड्या चालवणारा, सर्व प्रकारची हस्तकौशल्ये अवगत असणारा, बोलण्यात चतुर वगैरे वगैरेच असावा लागतो.

शब्दखुणा: 

इतकंच लागतं जेवायला (विडंबन)

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 05:13

इतकंच लागतं जेवायला - प्रेरणास्थान हे आहे.

तू म्हणालास,"जपून खा गं!
पोटाची वाट, त्यात भूक दाट"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
मऊ खिचडी आहे ना?
मग कसली भूक आणि कसली वाट
सोबतीने खाऊ की खिचडी आणि चाट *"

तू म्हणालास,
"जपून ग!
जेवण म्हणजे नुसती,
खा-खा आणि उपासमारीची शर्यत आहे"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
लंघन करण्याचं महत्व
म्हणून ना कळत आहे?"

तू म्हणालास,
"आणि मी ओकलो तर?"

मी म्हंटलं,
"मी आहे की"

उपास-तापास, ढेकर, लंघन
कळत नाहीत रे मला

अवघड असूनही
खिचडी आणि चाट खाण्याचं वाण
मनापासून निभावतोय

शब्दखुणा: 

कमल हासन आणि मराठी सिनेमा

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

कमल हासन हा कलाकार सर्वांच्याच परिचयाचा. हिंदी आणि तमिळ दोन्ही सिनेसृष्टीमधे त्याचे योगदान अपूर्व आहे. एकाच चित्रपटामधे अनेक व्यक्तीरेखा सादर करणे, मेकप आणि कॉस्च्युम तंत्राचा यथायोग्य वापर करणे याखेरीज इतर अनेक तांत्रिक अंगांचा वापर करून सिनेमा अधिकाधिक खुलवणे ही त्याची वैशिष्ट्ये. एक अभिनेता म्हणून तर त्याच्याबद्दल बोलायलाच नको. तब्बल चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेला हा अभिनेता सध्या एका वेगळ्याच वादळासाठी चर्चेमधे आहे.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन