तर पांडगो, “सांगा आजची गोष्ट”
“ऐका रे पोरांनो.
मी यस्टीच्या थांब्यावर कोल्हापूरच्या यस्टीची वाट बघत होतो.अमावाश्याची रात, मी यकटाच उभा, एव्हढ्यात ती आली,”
“अरे बाप रे. तुम्हाला भ्या नाही वाटले?”
“आपुन घाबरत नाय.आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.”
“आता “तो” कोण?”
“सांगणार सांगणार, तुम्ही लोक मधेच मला आडवू नका बरका. तेन काय व्हत की माझी कंटीन्युटी? ती “ही” होते,”
“बर बुवा सांगा. नाही डिस्टर्ब करत.”
“आता संयोजक म्हणतात असं लिवा म्हणून मी तसं लिवलं. शिवाजी म्हणतो असं लिवा. आपल्याला काय तसं तर तसं. तुमी आमच्या हिच्या माहेरचे म्हणून सांगतोय, खरं म्हणजे तीने विस्मयचकीत नजरेने माझ्यकडेच बघितले.”
“संयोजक कोण? ह्ये मंजे नवीनच आक्रीत हाय.”
“संयोजक म्हणजे लई पावरबाज. कुणाचाही नंबर लावतय, मधूनच सटी सामाशीला प्रकट होणार, बाकीच्या वेळेला मायवेली झाडावर गप गार. इकडे आलं की त्याला सारखी खा खा होते. मला आस खायला पाहिजे, तस पाहीज्याल, आन पिलेट अशी सजवून पाहिजे. फार लाडावून ठेवलय. आन लोक कल्ला कराया लागले की हातोडा आपटून म्हणतो , "अध्याहृत अध्याहृत" म सगळे चडी चूप. कुणाची हिम्मत नाही इचारायाची की बाबा रेअध्याहृत म्हणजे काय. ”
“बर, म फुडे काय झालं?”
“हा तर ती बया म्हणते कशी, “रे चावट पक्या, वाट पाहुनी डोलं थकलं की माजं.” अन पिच्चर मधून गानं गायाला लागली की. मी पण सोटा हापटून वराडलो,
“एक डाव सांगतो, ए बया. मी पक्या नाय.”
“आता हा पक्या कोण?”
“तोच तो झावबाच्या वाडीतला.”
“अहो पण झावबाची वाडी मुंबईत आन आपुन इकडं आडिवर्याला.”
“माझ्या गोष्टीत असच असतंय बघा.”
शतक होऊन गेलय पन ह्या गब्रूची स्टोरी आजूब स्टार्ट व्हायाचे नाव घेत नाय.
“पांडोबा, उद्या सांगा फुढची स्टोरी.”
“कारे बाबानो, आता काय झालं? इथून फुडे तर खरी मज्जा आहे.”
“नको नको. तुमची गोष्ट ऐकून आमाला झोप यायला लागली.”
हेच ते. लोकांना काय हाय ना गोष्टीत झ्याक काही inter रेस्ट नाही, सारखं inter नेट कडे पळतंय. कुणाला सांगणार. शशक बिशकला फाट्यावर मारा आणि लिवा चकवा किंवा कीरकिराट वर. चुकले काय? चकवा नाही? चिकवा काय. बर. तसं होउद्या.”
लिहाया गेलो शशक...
Submitted by केशवकूल on 27 August, 2025 - 16:03
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लई बेक्कार हसाया आल्तं वं
लई बेक्कार हसाया आल्तं वं मास्तर
केकु... मस्तच..
केकु... मस्तच..
बैजवार सम्द्यास्नी हानलंया.. (अर्थात प्रेमाने)
लई झ्याक
लई झ्याक
मस्तच! हहपूवा!
मस्तच! हहपूवा!
सगळ्यांचे आभार,
सगळ्यांचे आभार,
संयोजक कृपया मनावर घेऊ नका, खर तर, त्यांनी हे वाचलेलं नसणार. पण आपले हे रेकॉर्डवर घेबे जरुरी आहे.
वाचलं
वाचलं
मनावर घेतलंय
.
.
.
.
हसायचं
लै झ्याक की मास्तर! आज काय
लै झ्याक की मास्तर! आज काय निस्तं हसत र्हायचं की काय वं
(No subject)
तुमची कंटिन्युइटी 'ही' होउ
तुमची कंटिन्युइटी 'ही' होउ देउ नका वं मास्तर. अजुन यु द्या.
ती आली..... मोडकी लाल एसटी
ती आली..... मोडकी लाल एसटी असणार. तिला कुणी घाबरत न्हाय. इतक्या राती आली हेच खूप झालं. फलाटावरचे डास हाकलण्यापेक्षा बरं नाही का?
एस टी ने विस्मयचकित नजरेने
एस टी ने विस्मयचकित नजरेने डोळ्यात डोळे घालुन पाहीले तर घाबरायला होइल ना पण