भय

एक अनोळखी कॉल

Submitted by प्रथमेश काटे on 29 July, 2025 - 12:39

एक अनोळखी कॉल

मीनल आज उशिरापर्यंत लॅपटॉपवर, ऑफिसचं काम करत बसली होती. रात्रीचे साधारण अकरा वाजले होते. आसपास पूर्ण शांतता होती. मधेच बाहेर रस्त्यावरून, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. तिने उत्सुकतेने फोन उचलला.

"हॅलो?" ती म्हणाली.

पलीकडून काही उत्तर आलं नाही. फक्त मंद श्वासोच्छ्वास ऐकू येत होता. मीनल पुन्हा "हॅलो?" म्हणाली, पण पुन्हा तेच. रॉंग नंबर समजून, तिने फोन कट केला.

पण काही क्षणातच पुन्हा कॉल आला. त्याच नंबरवरून. पुन्हा तिने कॉल रिसीव्ह केला‌ ; पण समोरून काहीच उत्तर आलं नाही.

शब्दखुणा: 

अंधाऱ्या विहीरीचे गूढ

Submitted by प्रथमेश काटे on 21 July, 2025 - 07:23

गावाच्या वेशीवर, जिथे जुन्या वडाच्या झाडाची लांबच लांब मुळं जमिनीतून वर आली होती, तिथे एक विहीर होती. 'विहीर' म्हणण्यापेक्षा ती एक काळीशार, अथांग गर्ताच होती. गावातली जुनी जाणती माणसं म्हणायची, "या विहिरीला तळ नाही." तिच्या खोली मुळे, या विहिरीचं नाव पडलं होतं 'पाताळ विहीर'. सूर्यप्रकाशातही तिचा तळ दिसत नसे, इतकी ती खोल होती. आणि गेल्या कित्येक वर्षांत, एकही माणूस तिच्या पाण्यात उतरला नव्हता, की कोणी तिच्या जवळ थांबलं नव्हतं. रात्री तर तिचा उल्लेखही कोणी करत नसे.

शब्दखुणा: 

"सूड" अंतिम भाग

Submitted by प्रथमेश काटे on 10 June, 2025 - 12:37

म्हातारीनं दचकून पाहिलं. भिंतीला लागून असलेल्या जुनाट, लाकडी कपाटातून तो आवाज येत होता. म्हातारीची नजर पडताच, पुन्हा त्या कपाटात खडखडाट झाला. बंद दारं जोरजोरात हलू लागली. म्हातारीनं भयभीत होऊन सिध्दांतकडे पाहिलं. तोही स्तब्ध नजरेनं तिकडेच पाहत होता. कपाट खडखडत राहिलं. त्याची नीट न बसलेली कडी उघडली गेली‌. म्हातारी डोळे वासून एकटक पाहत होती. आणि.. एकदम कपाट उघडलं गेलं. तो प्रकार अनपेक्षित होताच ; पण.. सिद्धांतने हातातील टॉर्चचा उजेड आत टाकताच दिसलेलं दृश्य भयानक होतं. कपाटात एक प्रेत होतं. एका लहान मुलीचं. फिकुटलेलं.

"सूड" भाग ३

Submitted by प्रथमेश काटे on 5 June, 2025 - 12:33

"सूड"
भाग ३

"आजी, त्या रिकाम्या घरात खूप कंटाळा येतो हो. अन् बाहेर तरी कितीवेळ काढणार ?" सिद्धांत म्हणाला. त्यावर, म्हातारी किंचित हसली.

"त्या दिवशी रमेश आलेला ; पण घरात आला नाही. उलट मलाच सांगू लागला, की परत जा. इथं काहीतरी आहे, म्हणे."

"अस्सं."

"हो. तुम्हीच सांगा.. मी स्वतः एकटा त्या घरात राहतोय. मला काहीतरी दिसलं असतंच की."

"तेच तर. या रमेश सारख्या शिकल्या सवरलेल्या पोरानं अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा !" म्हातारी आश्चर्याने म्हणाली."

"तेच तर. बरं.. आजी, तुम्ही याल संध्याकाळी घरी ?"

शब्दखुणा: 

रक्तपिपासू भाग १०

Submitted by प्रथमेश काटे on 13 January, 2025 - 11:07

तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. ती बावरली, गोंधळली. मात्र त्याच्या नजरेच्या प्रभावी पाशातून स्वतःला सोडवून घेणं तिला शक्य नव्हतं. त्यानं तिला वरून खालपर्यंत नखशिखांत न्याहाळलं. त्याच्या नजरेच्या अदृश्य स्पर्शाने तिच्या शरीरावर हलकेसे रोमांच उठले.

"किती सुंदर दिसतेस तू..." खालच्या, खर्जातल्या सुरात तो म्हणाला.

शब्दखुणा: 

रक्तपिपासू भाग ६

Submitted by प्रथमेश काटे on 14 December, 2024 - 09:44

अचानक बसलेला धक्का ओसरल्यावर रोहितनं स्वतःला सावरलं. तोंड जरा पुढे नेऊन तो हलक्या आवाजात म्हणाला.

" अगं रूपाली तू ? एवढ्या रात्री, इथं ?"

"अरे दरवाजा तर उघड. थंडी वाजतेय." तीही खालच्या आवाजात म्हणाली.

तो चटकन मागे वळाला. मधल्या खोलीत येऊन त्याने दरवाजा उघडला. रूपाली दरवाजात उभी होती. हसऱ्या चेहऱ्याने.

"काय गं रूपाली ?"

"ये की बाहेर ?" हाताने इशारा करत ती म्हणाली.

"बाहेर ? आणि आता ?"

"चल‌ रे..."

"अगं चल् काय, रात्र किती झाली आहे ! घरचे सगळे झोपलेत. आता कुठे बाहेर ?"

"माझ्यासोबत चल.."

"पण कुठे ?"

"चल तर खरा."

शब्दखुणा: 

रक्तपिपासू भाग ५

Submitted by प्रथमेश काटे on 9 December, 2024 - 09:13

"माझ्या मनातली शंका खरी ठरली राजाभाऊ." श्री म्हणाला.

"कोणती शंका ? काय झालं श्री ?" चटकन राजाभाऊंनी विचारलं.

वॉकला गेलेला श्री लवकरच घरी परतला होता. शांतपणे आणि स्वतःच्याच तंद्रीत. जरासा चिंतितही दिसत होता तो. ही सहजी घडणारी गोष्टच नव्हती. तेव्हा सहाजिकच राजाभाऊंना आश्चर्य वाटलं. आणि आता हे त्याचे शब्द. काहीतरी गंभीर बाब असणार हे त्यांच्या लक्षात आलं.

"वाटेत रूपाली भेटली होती." एवढं सांगून श्री थांबला.

"हं...मग ?"

"तिचे डोळे, तिचं बोलणं, हसणं यावरून माझी खात्री झाली आहे..."

"कसली ? व्यवस्थित सांगा ना ?" राजाभाऊ अधीरतेने म्हणाले.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भय