Submitted by अनन्त्_यात्री on 9 September, 2025 - 10:22
कविता रतीचे | विभ्रम अनंत
त्यांचे मी गणित | कैसे करू? || १ ||
तरीही करितो | वेडे हे धाडस
माझ्या अक्षरांस | हासू नये ||२ ||
~~~~~~~~~~~~~~
कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास
कवितेचे गणित कसे हे
उत्तर ना ज्याचे कळते
ओळींच्या मधली जागा
गणिताला डिवचून जाते
गणिताच्या मर्यादांचा
ज्या कुणी(@) लाविला शोध
तो कवी नसावा हृदयी
याचा नच उरतो खेद
~~~~~~~~~~~~
@ Kurt Gödel proved inherent limitations of formal mathematical systems with his Incompleteness Theorems,
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>>>>>@ Kurt Gödel proved
>>>>>>>@ Kurt Gödel proved inherent limitations of formal mathematical systems with his Incompleteness Theorems,
वाचावयास हवे.
सा. मो. हे पुस्तक मिळतंय का
सा. मो. हे पुस्तक मिळतंय का बघा
https://www.amazon.com/dp/0814758371/
बघते. धन्स.
बघते. धन्स.