स्ट्रिंग थिअरीचा पाया

Submitted by अनन्त्_यात्री on 25 August, 2025 - 08:07

FunUवादी लेखनाची
FunAतनी कोलांट्यांची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का सो मि वर?

बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)

"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?

ओव्या, अभंग, सूक्तांची
लेखा जोडू का शेपटी?
डिस्क्लेमर टाकावा का
स्वांत:सुखाचा शेवटी?

असिधारा व्रत माझे
FunUवादी लेखनाचे
भर्कटणे क्रमप्राप्त
लोड नका घेऊ त्याचे !

एक शिक्रेट सांगतो
कोणालाही सांगू नका
फनूवादी लेखनाचा
फनातनी कोलांट्यांचा
माझा पर्मनंट ठेका !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults