Submitted by अनन्त्_यात्री on 4 September, 2025 - 03:40
स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरतो तत्त्वता
वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा #
व्यास बनुनी राहते
(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो
वर्तुळाच्या गारुडाने
भूल कसली टाकली
तत्त्वज्ञानाची कवाडे
(π ) करितो किलकिली
परीघ, त्रिज्या दोन्हीही
परिमेय असती पण तरी
(π ) का मज वेड लावी
अपरिमेयाचे परी
~~~~~~~~~~~~~
# जीवा = chord of a circle
(π) = 3.14.....
अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे मस्त!! भूमितीच्या
अरे मस्त!! भूमितीच्या संकल्पनांची उजळणी झाली.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
π log(U) τ g
π log(U) τ g
ह. पा.
ह. पा.
हाहाहा हपा
हाहाहा हपा
टुक टुक अनंतयात्री आणि
टुक टुक अनंतयात्री आणि माझ्याशिवाय कोणलाच हपांचा जोक कळत नाहीये
कुठे गेले ते नर्डी लोक? हा हन्त हन्त!! 
मस्त आवडली.
मस्त आवडली.
शीर्षक जास्त आवडलं
π log(U) τ g
छंदीफंदी फोडू नको.
छंदीफंदी
फोडू नको.
छंदीफंदी Happy फोडू नको.>>>
छंदीफंदी Happy फोडू नको.>>> AI च्या युगात हे असं गुपित, गुपित रहातयं होय??
छन्दिफन्दि धन्यवाद.
छन्दिफन्दि धन्यवाद.