मनोरंजन

चला पंख लावूया

Submitted by राजेंद्र देवी on 23 July, 2019 - 10:58

7 ऑगस्ट पासून भागो मोहन प्यारे Z वर सुरु होते आहे. तरी पिसं काढण्यात ऐवजी पंख लावूया, येथे सकारात्मक चर्चा करूया.

विषय: 

चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स

Submitted by हस्तर on 23 July, 2019 - 06:36

खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे

एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा
नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय

पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे

तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी

पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल

विषय: 
शब्दखुणा: 

कबीर सिंग- चित्रपट चर्चा

Submitted by सूर्यगंगा on 18 July, 2019 - 11:32

कबीर सिंग चित्रपटावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

अगाथा ख्रिस्ती यांची अनुवादित पुस्तके

Submitted by Cuty on 17 July, 2019 - 07:12

अगाथा ख्रिस्ती यांची मराठीत अनुवाद झालेली पुस्तके net वरती free वाचायला मिळतील का आणि कुठे?

फेंगशुई,कासव आणि चिरंजीव

Submitted by Cuty on 12 July, 2019 - 05:42

D mart मध्ये खरेदी चालू असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले ,त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या.त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही. मात्र नवरोबांचा आहे.
घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तर काय?चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत होते. मग लक्षात आले, हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत ते खरेदी करून आणले होते.

विषय: 

जाहिरातींची (लागली) "वाट"

Submitted by निमिष_सोनार on 11 July, 2019 - 12:47

(टीव्हीवर नेहमी लागणाऱ्या काही जाहिरातींची मी लावलेली "वाट" मूळ जाहिराती पाहिलेल्या असतील तरच वाचतांना मजा येईल! हा प्रयोग कसा वाटला ते सांगा!)

***

नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे नवऱ्या मुलाचा म्हणजे राहुलचा मित्र अजय भेटायला येतो.

त्याला समोर एक बाळ रांगतांना दिसतं.

अजय म्हणतो, "काय हो वाहिनी, हे कुणाचं बाळ? आणि राहुल कुठेय?"

वाहिनी रडू लागते, "अहो भावजी! काय सांगू तुम्हाला? आम्ही किराण्यात आणलेला संतूर साबण ह्यांनी आताच चुकून ऑरेंज सोन पापडी समजून खाल्ला आणि ते क्षणार्धात बाळ बनले!"

विषय: 

फ्री चा फुगा!

Submitted by निमिष_सोनार on 11 July, 2019 - 08:03

तीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील?

बहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोडून शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार? तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन!

त्वचा से उम्र का पता नही चलता! काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला? मम्मी!! मम्मी??

विषय: 

लव्ह इन ट्रबल भाग - १५

Submitted by स्वरांगी on 5 July, 2019 - 07:52

लव्ह इन ट्रबल भाग – १५
अभिजीतला आलेलं पाहताच अनुने धावतच जाऊन अभिजीतला मिठी मारली..
“ मला वाटलं की आज तुम्ही येणारच नाही!!” अनु म्हणाली..अभिजित शांतपणे उभा होता..
“ आय लाईक यु!! मला तुम्ही आवडता सर!!” अनु तिच्या मनातलं बोलून गेली…अभिजितने सुस्कारा सोडला आणि म्हणाला,
“ डोन्ट लाईक मी!!” हे ऐकून अनुच्या डोळ्यातून अश्रू ओघळला..तिचं हृदय जोरात धडधडत होतं…तिने हळूहळू अभिजितभोवतीचे हात सोडले आणि त्याच्यापासून लांब झाली..तिचे डोळे पाण्याने डबडबले होते..
“ का??” अनुने विचारलं..
“ ह्याचं कारण ती..” अनु बोलणार एवढ्यात, ती स्वतःच थांबली..

गंभीर समस्या - मदत करा अर्जंट

Submitted by थॅनोस आपटे on 30 June, 2019 - 00:44

सध्या माझ्याकडे एक विचित्र प्रॉब्लेम झालेला आहे.

मंडळी इथे लोक स्क्रीनशॉट टाकतात. तर ते माझ्या कठीण तबकडीत आपोआपच साठवले जात आहेत. डिलीट करण्यासाठी म्हणून त्याच्यावर क्लिक केलं तर ते पिक्चर एडीटर मधे उघडतंय . समस्या ही आहे की हे स्क्रीनशॉट्स क्रॉप केलेले असतील तर क्रॉप टूलने त्या पुन्हा ताणून पूर्ववत करता येत आहेत. म्हणजे आपोआप होत आहे. त्यामुळे काय होतंय की क्रॉप करण्याआधी स्क्रीनशॉटमधला इतर मजकूरही वाचता येऊ लागला आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन