शशक=३- वरणभाताचा फंडा.- केशव्कूल

Submitted by केशवकूल on 29 August, 2025 - 10:26

माबोवाडीतील पांडू नावाचा आयडी. गणपतीचे दिवस.
तो घरी येत असता जंगलात त्याला संयोजकदेवाने दर्शन दिले.
पांडूची भीतीने बोबडी वळली. हात जोडून तो म्हणाला,“जय देवामहाराजा,चाहे तो जिया मेरा लेलो पण आयडी नका घेऊ.”
“पांडोबा, आयडी घेत नाही पण माझा जठराग्नी भडकला आहे. काहीतरी खायला दे.”
हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?
“हे कोण बोलले?”
“मी नाही, मी नाही. वाचक बोलले असणार. पण देवा. माझ्याकडे फक्त दोन अंडी आहेत. नॉनवेज चालेल?“
“चालतील.” संयोजकांनी अंडी पोटाशी धरली. जठराग्नीने अंडी उकडली.
पांडूने अंडी सोलली, चाकूने कापली आणि संयोजकदेवाच्या समोर धरली.
आणि महदाश्चर्य घडले.
Egg saw the Master and turned into Varanbhat!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

भारी Proud
या विषयावर सुद्धा काय काय कथा सुचत आहेत लोकांना..