मनोरंजन

आठशब्दकथा- ऊगीच आपलं कायपण!

Submitted by Cuty on 6 June, 2020 - 05:18

नवर्याचा मोबाईल आपटून फोडला!
जीवाला लय गारवा मिळाला !!!

तळटीपः- लाॅकडाऊनमधे वैतागलेल्या सर्व गृहिणींना समर्पित.

विषय: 
शब्दखुणा: 

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व.. (यूट्युब आणि इंन्स्टा)

Submitted by निरु on 19 May, 2020 - 23:43

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व..
(यूट्युब आणि इंन्स्टा)

करो ना!! - २

Submitted by सामो on 19 May, 2020 - 21:17

तर दर आठवड्याला, लाइव्ह योगा क्लास व १५ दिवसातुन एकदा डाएट सल्ला सेशन सुरु झाले. जर १५ दिवसात कोण्या मेंबरचे वजन कमी झाले नाही तर ब्लेमगेम खेळला जाउ लागला. दिनूच्या डाएट प्लॅनमध्ये कमतरता राहीली की सरोजने नीट व्यायाम करवुन नाही घेतला याबद्दल व्हॉट्सॲपवरती , ग्रुप-डिस्कशन होउ लागले. कल्प्रिट अर्थात चूकी होती - संचारबंदीची. घरी बसून कंटाळलेले मेंबर नवेनवे , मेदयुक्त, कर्बोदकयुक्त मस्त रुचकर पदार्थ करत होते आणि त्यांच्या वजनाची लागत होती वाट. ठपका मात्र बिच्चाऱ्या दिनू-सरोजवरती.

विषय: 

करो ना!! - १

Submitted by सामो on 19 May, 2020 - 21:16

कुरंगनयना, सरोज कारखानिस ने व्यायामशाळा म्हणजे उच्चभ्रु भाषेत, जिम जॉइन करुन उणापुरा एक महीना झालाही नव्हता की जिममध्ये मेंबरांची संख्या एक्स्पोनेन्शिअली वाढू लागली. बाय द वे, सरोजनेदेखील जिम काही मेंबर म्हणुन जॉइन केलेले नव्हते. ती तिथे लागली होती जिम इन्स्ट्रक्टर म्हणुन. तसे तिथे आधीपासूनच ३ इन्स्ट्रक्टर्स होते. पण त्यांना फार मेंबर खेचता आलेले नव्हते. पैकी पहील्याला रेडा म्हणु यात, दुसऱ्याला गेंडा तर तीसरीला कैदाशीण म्हणु यात ना.रेड्याने प्रोटीन शेक्स पीउन पिउन शरीर कमावलेले होते. गेंडा बोलण्यात अघळपघळ व चतुर असला तरी त्याने फारसे दिवे लावलेले नव्हते.

विषय: 

पद्मा आजींच्या गोष्टी १८ : १ नंबरचा टांगा

Submitted by पद्मा आजी on 16 May, 2020 - 17:08

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

प्रवीणने टांग्याच्या गोष्टीची आठवण करून दिली म्हणून मी आज माझ्या लहानपणीची गोष्ट सांगणार आहे.

त्या वेळेस गावातल्या गावात एका ठिकाणाहून दुसरीकड़े जाण्यासाठी टांगे असायचे. सायकल रिक्षाही होत्या पण आम्हां सर्व मुलांना टांग्यामध्ये बसायला आवडायचे. आमच्या घरापासून जवळच चौकामधे झाडाच्या सावलीमध्ये टांगा स्टॅन्ड होता. तेव्हा टांग्यांना नंबर द्यायचे. पण नंबर द्यायची पद्धत फार नवलाची.

मिसेस अमेरिका - स्त्रीवादी चळवळीची ग्लॅमरस कहाणी

Submitted by सनव on 15 May, 2020 - 12:05

सध्या मिसेस अमेरिका ही मिनिसिरीज बघत आहे. 9 पैकी 7 भाग प्रदर्शित झाले आहेत.

लाॅकडाऊन ( 'एका बाईची' रडकथा)

Submitted by वेलांटी on 14 May, 2020 - 09:24

तिचं नेहमीचं रूटीन नेहमीप्रमाणे सुरू होतं. मुलं, शाळा, नवर्याचा डबा , सकाळची घाईगडबड आणि संध्याकाळची पळापळ वगैरे. एक दिवस लाॅकडाऊन लागलं. तिला वाटलं बरं झालं. आता काही दिवस निवांत जातील. निदान फार गडबड उडणार नाही रोजच्यासारखी. करताकरता दोनचार दिवस गेले, अन लक्षात आलं, अरेच्चा ! एरव्ही सुटीच्या दिवशी जशी आपली धांदल उडायची तशी आता रोजच उडतेय. कामाला हाताशी कुणी नाही आणि त्यात सगळेच घरी. मग काय चहा ,नाष्टा, जेवण मग संध्याकाळी पुन्हा चहा-नाष्टा,रात्रीचे जेवण, झाडलोट वगैरे मधे आख्खा दिवस सरायला लागला. कसलीच उसंत मिळेना. पण सगळेच घरी एकत्र आहेत, अजून काय हवंय अशी तिने मनाची समजूत घातली.

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन