मनोरंजन

तैमुरची मम्मी ते आरवची आई

Submitted by Tushar Damgude on 3 May, 2020 - 01:31

" अरे आराध्याच्या आई ? काय आश्चर्य , आज चक्क इकडे कुठे ?

"इकडे कुठे म्हणजे ? अहो भाजी आणायला आणि काय कारण असणार इकडे येण्याचे ? "

"हो तेदेखिल खरे आहे म्हणा....."

"...आणि तुम्ही आज इकडे कशा तैमुरच्या मम्मी ? म्हणजे फक्त भाजी घ्यायला इतक्या लांब ?"

" अहो त्या मल्होत्राच्या मनीषकडे दोन साड्या फॉल पिकोला टाकायच्या होत्या तसंच म्हटलं आठवड्याची भाजी घेऊन जावं"

" तरी इतक्या लांब ?"

शब्दखुणा: 

ऋषी कपूर

Submitted by बिपिनसांगळे on 30 April, 2020 - 00:59

ऋषी कपूर यांचे दुःखद निधन झाले .

तो नेहमीच उंचे खानदानका छोरा वाटायचा . राजबिंडा ! ग्रेसफुली नाचणारा .
शेवटी- वेगळ्या भूमिकांमध्येही त्यांनी रंग भरले .

आणि एक अभिनेता गेला ! ...

विषय: 

डिप्लोमे From युट्यूब युनिव्हर्सिटी

Submitted by विद्या भुतकर on 29 April, 2020 - 22:36

मागच्याच आठवड्यात आमचं पावपुराण ऐकवलं. पण निरनिराळे पदार्थ बनवण्यात फेल होणे सोडून बाकीचीही कामं होतीच की. त्यात सुडोकु शिकणे आणि ते सोडवताना झोप लागल्यावर दोन तासापेक्षा जास्त न झोपणे, कॅरम खेळताना पोरांसमोर शायनींग मारणे, टिव्हीवर एकेका सिरियलीचा फडशा पाडणे अशी महत्वाची कामेही होतीच. पण या सगळ्या गोष्टीही किती करणार ना? त्यातल्या त्यात शनिवार, रविवारी अजूनच बोअर व्हायला होतं.

थोड्या दिवसांपूर्वी एक दिवस स्वनिक म्हणाला,"मला सारखं काहीतरी कानात आहे असं वाटतंय. आणि प्रत्येक वेळी हात लावला की कळतं की माझे केसच आहेत ते."

फसलेल्या पावाची कहाणी

Submitted by विद्या भुतकर on 24 April, 2020 - 07:33

गेल्या काही दिवसांत निरनिराळ्या फूड ग्रुप्स वर लोकांच्या पाककलेचं दर्शन चालू आहे. त्यात ब्रेड, पाव वगैरे घरी बनवून ते किती छान बनलेत असे एकेक फोटो पोस्ट करायचं पेवच फुटलेलं आहे. पूर्वी मी अनेकदा घरी पाव (वडापावचे पाव) बनवण्याचे प्रयत्न केले आहेत. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक रेसिपी तंतोतंत कृतीत उतरवणारे आणि दुसरे माझ्यासारखे स्वतःच्या आयडिया त्यात घुसवणारे. तर पूर्वी जेव्हा मी पाव बनवण्याचे प्रयत्न केले त्यात बटर कमी टाकणे, मैद्याच्या ऐवजी थोडी कणिक वापरणे, पाण्याचे माप खूप जास्त आहे असं वाटून कमीच पाणी घालणे असे अनेक प्रकार केले आहेत.

भाळणे तुझ्यावरी का चूक आता

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 15 April, 2020 - 14:42

भावना डोळ्यातली का मूक आता
भाळणे तुझ्यावरी का चूक आता

जाणता हे घाव सारे तूच केले
टाळतो मी व्हायचे भाऊक आता

लावली जोरात बोली भावनांची
मांडला बाजार मी घाऊक आता

मानले मी आपले होते जयांना
राहिले ना लोक ते साजूक आता

काळ आहे वेगळा हा पांडुरंगा
दर्शनाने भागते ना भूक आता

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त : मंजुघोषा (गालगागा गालगागा गालगागा )

फिशिंग इन ट्रबलड वॉटर

Submitted by सुबोध खरे on 14 April, 2020 - 11:28

फिशिंग इन ट्रबलड वॉटर

हि एका निधड्या छातीच्या आणि शूर अशा निवृत्त नौदल अधिकाऱ्याची सत्य कथा आहे.

लॉक डाऊन च्या कालावधीत योगायोगाने हि कथा माझ्यापर्यंत एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोचवली होती. हि मूळ इंग्रजीमध्ये असलेल्या दीर्घ कहाणीचे मराठी भाषांतर मी केले आहे. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत त्या आपण गोड मानून घ्या.

कमांडर विनायक आगाशे हे निवृत्त होऊन आता नाशिक येथे स्थायीक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून या कहाणीच्या सत्यतेबद्दल आणि त्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा याबद्दल चर्चा करूनच हि कहाणी येथे लिहीत आहे.

विषय: 

मठ

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 April, 2020 - 05:45

ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी ।
गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥

अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्‍याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो.

शब्दखुणा: 

लांबड कथा..

Submitted by मन्या ऽ on 8 April, 2020 - 13:17

लांबड कथा..

कोणतीही कथा वाचताना "यार! शेवट वेगळा हवा होता" किंवा "फारच ताणलीये राव कथा." असं वाटल असेल तर हा धागा तुमच्यासाठीच आहे.

तर लोक हो, महत्वाचं म्हणजे
या कथेला शेवट नसेल.

तेव्हा तुम्हाला हवे तसे ट्विस्ट कथेत टाका!
मग तो नवरसांचा विचार न करता टाकलात. तरीही चालेल.

नियम फक्त एकच ट्विस्ट टाकताना कथेची कंटीन्युटी ठेवा..
चला तर मग करुया लांबड कथेला सुरवात आपल्या पारंपारिक कथांच्या वर्ल्डफेमस ओळीने..

एक होत आटपाट नगर..

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन