मनोरंजन

अस्तित्व

Submitted by सामो on 8 December, 2019 - 04:49

शर्वरीने स्वतः: अजून जवळून मृत्यू बघितला नसला, तरी अन्य जनांप्रमाणे, तिने दूरच्या नातलगांचे दूर जाणे जरूर अनुभवलेले होते. लहानपणापासूनच गूढांकडे ओढा असलेले तिचे मन, किती तरी वेळा विचार करत असे, माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? आपण कुठे जातो, परत कसे येतो?

कभी कभी लगता है !.....

Submitted by Cuty on 8 December, 2019 - 02:15

रविवारची सुटी कारणी लागावी या उदात्त हेतूने हा मनोरंजनपर धागा काढत आहे.

सर्वांनी 'कभी कभी लगता है,.....'
हे वाक्य आपल्या मनाला वाटेल तसे पूर्ण करावे.
उदा. कभी कभी लगता है ' आपुनच मिस वर्ल्ड है'.

(माझा आयडी आणि हा धागा दोन्ही अॅडमीनने उडवू नये ही काळजी मात्र सर्वांनी घ्यावी अशी विनंती).

विषय: 
शब्दखुणा: 

कव्वाली: तुला पाहिले की

Submitted by पाषाणभेद on 5 December, 2019 - 09:12

कव्वाली: तुला पाहिले की

किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे
काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे
दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते
पण तुला पाहिले की काळजात धकधक होते

किती तू वार केले माझ्या हृदयावर
खोल जखमा वरून केल्या त्यावर
नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला
तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला
त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक
पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक
नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये
तुला पाहिले की काळजात धकधक होते

NDE (निअर डेथ एक्सपीरीअन्स) बद्दलच्या किरकोळ शंका

Submitted by सामो on 4 December, 2019 - 10:45

Embraced by light, Three minutes in heaven अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास NDE सारख्या साईटवरती घालवून व त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.

सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते. थोडा वेळ लागतो पण शेवटी ते प्रेत आपलेच प्रेत आहे हे या व्यक्तीच्या ध्यानात येते.

विषय: 

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

Submitted by सिद्धेश्वर विला... on 26 November, 2019 - 02:27

ना देवेंद्र देव इथे

ना उद्धव आहे साव

आजही बळीराजा भीक मागतो

पण , त्याला काडीचा नाही भाव

संगीत खुर्ची चालू झाली

पवार वाजवतायत बिगुल

हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे

पण आपलीच बत्ती गुल

किती बघावं , काय बघावं

कळत नाही काहीच

जो तो आम्हाला नाग वाटतो

आपला वाली कुणी नाहीच

का लावला डाग नखाला ?

डोक्याची झालीय भेळ

कोण बसणार खुर्चीवरती

यातच चाललाय वेळ

लाज बाळगा जरा मनाची

पुरे हि शोभायात्रा

लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत

कि वेड्यांची भरलीय जत्रा

कुणीही बसावे , काही करावे

शब्दखुणा: 

बाह्य परिसरातील अतिपरिचित / अपरिचित / अस्पर्शित चित्रीकरण स्थळं

Submitted by नोझिपा मरारे on 24 November, 2019 - 11:20

या धाग्यावर आपण नेहमी दिसणारी चित्रीकरण स्थळं (आउटडोअर शूटींग लोकेशन्स) किंवा खूप कमी आणि ओळखू न येणारी किंवा प्रेक्षणीय स्थळं जिथे अद्याप चित्रीकरण झालेलं नाही पण व्हायला हवे असे वाटते अशा स्थळांबाबत बोलूयात.

अतिपरिचित म्हणजे पाचगणीचा पारसी पॉईण्ट. किंवा शिमला येथील फिल्मी चक्कर (जय जय शिवशंकर या गाण्याचे शूटींग असलेले), मनाली येथील नदीच्या परिसरातील ( सौदागर सिनेमा ) आणि लोणावळ्यातील असंख्य स्थळं.

खूप कमी किंवा ओळखू न येणारी म्हणजे सैराटमधली शूटींग लोकेशन्स. पण या सिनेमाने आता ही स्थळं अगदी अतिपरिचित करून ठेवली आहेत.

विषय: 

प्रतिभावंत कलाकार..... प्रायोगिक नाटके!

Submitted by मी मधुरा on 23 November, 2019 - 13:14

प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात नाट्य स्पर्धा सुरु आहेत.
अत्यल्प दरात प्रायोगिक नाटके बघायला मिळतात आणि सोबतच अनेक उत्तम कलाकृती बघायला मिळण्याचीही संधी असते.

आज 'अखेरची पाककृती' नावाचे नाटक होते.
नाटकाचे लेखन तितकेसे आवडले नाही.
पण त्यातल्या तीन अभिनेत्रींचा अभिनय आणि नाटकाची एकूण संकल्पना ही जमेची बाजू होती.

सानिका आपटे नावाच्या एका अभिनेत्रीने जोरकस, मस्त, अगदी चोख अभिनय केला.

खरं सांगू?

विषय: 

वाक्य अंताक्षरी

Submitted by साद on 20 November, 2019 - 02:17

इथे अनेक प्रकारच्या अंताक्षरी आपण खेळतो. एक नवा खेळ सुचवतो. आवडलेली वाक्ये, सुविचार, वचने, मार्मिक बोल इ. ची अंताक्षरी इथे खेळू. शक्यतो एकच वाक्य लिहू. ते कोणाचे आहे हे लिहिणे ऐच्छिक राहील. सहज माहिती म्हणून व्यक्तीचे नाव कंसात लिहायला हरकत नाही.

एक विनंती : मराठीच वाक्ये लिहा. अन्य भाषेतले असल्यास अनुवाद करावा.
स्वतः तयार केलेले अर्थपूर्ण वाक्य ही चालेल.

मी सुरवात करतो:

प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे झालेला एक हात फार मोठी प्रार्थना करतो. ( विवेकानंद).

......... आता ‘त’ चे वाक्य लिहा..

विषय: 
शब्दखुणा: 

उपद्व्यापी मासोळी

Submitted by सामो on 19 November, 2019 - 09:12

एक होती मासोळी,
सुळसुळ पोहतसे जळी
चमचम मऊ पोट करी,
वर्ख मिरवे सोनेरी ||१||

आई तिची सांगे तिला,
जपून नेहमी रहायाला
जळात असे गळ टाकूनी,
दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२||

मासोळी होती उचापती,
भारी होती करामती
तमा आईच्या बोलांची,
नसे करीतसे कधीच ती ||३||

शिंपल्यातल्या मोत्यांशी,
इतर सुंदर माशांशीही
लव्हाळांशी अन बेडकांशी,
मस्ती करावी मनमुरादशी ||४||

सुळसुळ पळत सुटावे,
आईचे कोणी ऐकावे
आईने धपाटले तर,
मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५||

नार्कोस

Submitted by radhanisha on 19 November, 2019 - 02:30

खऱ्या घटना आणि व्यक्तींवर आधारीत आहे मालिका .. कोलंबिया देशात पाब्लो एस्कोबार हा ड्रग माफिया होता 1980 - 90 दशकात .. त्यावेळच्या जगातल्या पहिल्या 10 श्रीमंत लोकांत त्याचा नंबर होता इतकी अमाप संपत्ती कमावली ... अमेरिकेत कोकेन पहिल्यांदा आणणाऱ्या माफियांपैकी तो होता . कितीतरी बिलियन डॉलर अमेरिकेतुन कमावून नेले ...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन