मनोरंजन

शिल्लक

Submitted by पुरंदरे शशांक on 2 August, 2018 - 08:18

शिल्लक

अलंकारूनी शब्द जमविले
लिहिन म्हटले मनातले
मनात होते नीटनेटके
लिहिताना ते भरकटले

जीवनातली सारी फरफट
शब्दी येता डगमगली
सुखदुःखाची गाणी सगळी
कागदावरी ओघळली

उरले हाती काय पहातो
चमकूनिया डोळे दिपले
क्षण प्रेमाचे जे मोलाचे
स्नेहमाखले लखलखले...

शब्दखुणा: 

मन, पाऊस.....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2018 - 23:47

मन, पाऊस....

काळे काळे ढग येता
जाते सारे अंधारून
मन बसे कोपर्‍यात
बावरून सुनसान

येती थेंब टपटप
एक साखळी धरून
लय भिनता पुरती
चिंबतान होते मन

भिने गारवा मनात
पुन्हा पुन्हा थरारुन
मूकपणे गाळी आसू
जाते थिजून थिजून

काळी रात्र सरे जेव्हा
येई पुन्हा उजाडून
ऊन्ह रेशमी बिलगे
मन जाई आसावून

कोंब इवले नाजूक
ऊन्ह झेलती मस्तीत
कंच हिरव्या ओठांत
दहिवर चमकत....

शब्दखुणा: 

नवीन मराठी चॅनेल - सोनी मराठी

Submitted by अस्मिता on 24 July, 2018 - 22:57

मराठी चॅनेल जगतात आणखी एक नवीन चॅनेल येऊ घातलाय तो म्हणजे सोनी मराठी!

ह्याचे 2 ते 3 प्रोमो आलेले आहेत आणि त्यावरून हे विषय छान असतील अशी अपेक्षा आहे!

https://youtu.be/YSt-cqlTK40

https://youtu.be/HqaR7wvj4x0

शब्दखुणा: 

देवीचा भक्त !

Submitted by रेशीम गाठी on 12 July, 2018 - 09:50

मी कॉलेजला असतानाची गोष्ट.
आमच्या इमारतीत एक माणूस यायचा गळ्यात देवीचे फोटो टांगून आणि हातात थाळी घेऊन. बरोबर तो दुपारी यायचा १२ च्या सुमारास. जेंव्हा कोणाच्याही घरात पुरुष माणसे नसायची, कोणाकडे एकट्या बायका तर कुठे शाळकरी लहान मुलेच फक्त घरात. आमचे घर तळमजल्यावर, पहिलेच. १-२ वेळा बघितल्यावर हटकले त्याला. बाबा ऐकेनाच.

तेल गेले , तूप गेले आणि हाती धुपाटणे आले !

Submitted by रेशीम गाठी on 12 July, 2018 - 09:48

२००१ सालातील गोष्ट. माझा नवरोबा आणि त्याचे २ मित्र कॉलेजमध्ये असताना कॉलेज जवळच्याच एका इमारतीत भाड्याने घर घेऊन राहायचे. घरात स्वयंपाक घर पद्धतशीरपणे थाटलेले आणि जेवण बनवायला आणि बाकी कामांना एक मावशीबाई यायच्या.

अर्ध पूर्ण शतक

Submitted by कल्पेशकुमार on 10 July, 2018 - 10:12

हाय लोक्स Happy
काहीतरी लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय, पण थोडं नवीन प्रकार करावा म्हणून मुद्दा मुद्दामच अर्धवट सोडलाय अन् काय ऑप्शन फाइनल करायचे ते वाचकांवर सोडायचे ठरवून सुचलेली ही अर्ध शतशब्द कथा ―
>>>>>>

कोकाटे कौन बनेगा करोडपतीमध्ये

Submitted by प्रथमाद्वितिया on 5 July, 2018 - 13:25

अत्यंत हृदयस्पर्शी घटना.....

एकदा ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांची निवड बच्चनजींच्या "कौन बनेगा करोडपती" या कार्यक्रमामध्ये झाली. कोकाटे हॉटसीटवरती बसलेले होते. लगेच बच्चनजींनी प्रश्न टाकला,

"शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते?"

आणि ऐकल्याबरोबर कोकाटेंच्या चेहऱ्यावरील कळी खुलली. बस्स्स्स्स, ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो आलाय. आता आपण लिहलेला भुरटा इतिहास वैश्विक होणार म्हणून हृदय आनंदाने भरून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पण एवढ्यात लगेच बच्चनजींनी उत्तराचे ऑपशन्स दिलेत ते पुढील प्रमाणे.
A) 2
B) 4
C) 7
D) एकही नाही.

विषय: 

गण्यानं प्यार क्यू किया ?

Submitted by कवठ्या महाकाळ on 5 July, 2018 - 01:50

अश्या प्रकारचा लेख पहिल्यांदा लिहितोय, भाषा थोडीशी शिवराळ आहे तेव्हा खटकल्यास संपादक मंडळ धागा उडवू शकतात. माझी हरकत नाही.

लै दिसापासनं गण्याचं डोकं भंजाळलं हुतं, आज बोलतो उद्या बोलतो म्हनुस्तर गण्याची आगळगावची वड्याकडची साळा संपून आता त्यो अंजनीला कालेजला जाय लागलता. गण्याचं हाप तिकीट आता फुल्ल झालतं.

आज कायबी हू दे, आपल्या दिलाची बात बोलायचीच असं म्हणून त्यो सकाळपासनच तयारीला लागलता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन