झिम्मा

अशी मालिका हवी - "झिम्मा" च्या निमित्ताने

Submitted by दिनेश. on 3 July, 2013 - 09:08

विजया मेहता लिखित, "झिम्मा" या पुस्तकाबाबत इथे चर्चा झालीच आहे. गेल्या सहा महिन्यात किमान चार वेळा मी ते वाचले. शिवाय हाताशीच असल्याने कधीही कुठलेही पान वाचायला सुरवात करावी आणि त्यात रमून जावे असे अनेकदा झाले.

काल सहज मनात एक विचार आला.

बाईंनी सुरवातीलाच लिहिलेय कि लेखन हा त्यांचा प्रांत नाही. त्यांना बोलणे जमते. झिम्माच्या मुखपृष्ठावर त्यांचे जे फोटो आहेत ते अत्यंत बोलके आहेतच. मग या पुस्तकाच्या आधाराने एखादी भव्य दूरचित्रवाणी मालिका का बनू नये ? या पुस्तकाचा आवाका, माहितीपटाच्या कक्षेतला नाही.

झिम्मा - आठवणींचा गोफ

Submitted by Adm on 26 December, 2012 - 13:45

मागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्‍या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात.

विषय: 
Subscribe to RSS - झिम्मा