भारतरत्न पुरस्कार विजेते प्रा. सीएनआर राव

Submitted by विजय देशमुख on 16 November, 2013 - 21:10

आज डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा सन्मान जाहीर झालाय. डॉ. सि.व्ही. रामन आणि डॉ. कलाम यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते तिसरे शास्त्रज्ञ. ७९ वर्षाचे डॉ. राव यांनी १५०० हुन अधिक शोधनिबंध, ४५ पुस्तके लिहिलि असुन त्यांचा h-index १०० हुन अधिक आहे, जो जगात फारच थोड्या लोकांचा असतो. {बहुतेक नोबेल लॉरेटचा}.
याबद्दल त्यांचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल डॉ. रावांचं नाव जाहीर झाल्यावर मनस्वी आनंद झाला. नॅनो-तंत्रज्ञानाची भारतात त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. सॉलिड-स्टेट फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्री या दोन विषयांत त्यांनी केलेलं संशोधन भारताला विज्ञानक्षेत्रात बरंच पुढे घेऊन गेलं. मात्र त्यांनी या शाखांमधल्या अनेक विषयांमध्ये एकाच वेळी काम करून कुठल्याही एका विषयात खूप काम केलं नाही, असं वाटतं. तसं त्यांनी केलं असतं तर त्यांना नोबेल पारितोषिक नक्की मिळालं असतं. अजूनही भारतात नोबेल पारितोषिकावर हक्क सांगू शकणारे ते एकमेव आहेत.

खरय चिनुक्स, पण बहुदा फंडींग-पॉलिसिचा फरक पडत असावा.
अजूनही भारतात नोबेल पारितोषिकावर हक्क सांगू शकणारे ते एकमेव आहेत.>>>+१

नाही, रावांना फंडिंगचा प्रश्न कधी पडला नसावा. जेएनसीएएसआरला संशोधनाच्या सुविधा जबरी आहेत. अनेक विषयांत रस असणं, आणि नियंत्रण ठेवण्याची वृत्ती, या दोन गोष्टी कदाचित कारणीभूत असाव्यात.

धन्यवाद चिनूक्स ,
त्यांच्याबद्दल माझ्या ओळखीतल्या फारस कुणालाच माहित नव्हत Sad

खरंच कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही असामान्य गुणवत्ता व तीची औचित्यपूर्ण दखल ! या महान शास्त्रज्ञाचं मनःपूर्वक अभिनंदन !!

...

हे चेपूवर मिळाल
यादी बरीच मोठी आहे

Prof C.N.R.Rao Conferred with Bharat Ratna...
the post is too long, just to make you feel the
gravity of what a man he his.... about the
other Award winner whole of India Knows...
but this Man is even a legend..... this is just a
half... and I was lucky to hear this man thrice,
i still remember the standing ovation he
received in his lectures....
Profile:
National Research Professor
Linus Pauling Research Professor & Honorary
President
Jawaharlal Nehru Centre for Advanced
Scientific Research, Bangalore, India
Honorary Doctorates from 60 Universities
Academic positions held
Professor of Chemistry, Indian Institute of
Technology, Kanpur, India (Head of
Department and later Dean of Research of the
Institute) (1963-76).
Visiting Professor, Purdue University, 1967-68;
1982 (in part).
Commonwealth Visiting Professor, University
of Oxford and Fellow, St. Catherine's College,
Oxford (1974-75).
Distinguished Visiting Professor, LaTrobe
University, Melbourne, Australia.
Jawaharlal Nehru Professor, University of
Cambridge and Professorial Fellow, King's
College, Cambridge (1983-84).
Founder Chairman, Solid State and Structural
Chemistry Unit and Materials Research
Laboratory, Indian Institute of Science
(1977-84).
Director, Indian Institute of Science (1984-94).
Visiting Professor, Universite Joseph Fourier,
Grenoble, France (1990).
Honorary Professor, University of Wales,
Cardiff (1993-1997).
President, Jawaharlal Nehru Centre for
Advanced Scientific Research (1989-99).
Albert Einstein Research Professor
(1995-1999).
Honorary Professor, Indian Institute of Science
(1994- ).
Visiting Professor, University of Southampton
(2007-2010).
Adjunct Professor of Chemistry, Purdue
University (2004- ).
Distinguished Visiting Professor of Materials,
University of California, Santa Barbara, CA
(1995- ).
Distinguished Research Fellow, University of
Cambridge (2007 - ).
Distinguished Visiting Professor, University of
California, Berkeley (2008 - ).
Fellowships of Academies:
Fellow, Indian Academy of Sciences.
Fellow, Indian National Science Academy.
Fellow, The Royal Society, London.
Foreign Associate, National Academy of
Sciences, USA.
Honorary Foreign Member, American Academy
of Arts and Sciences.
Member, Pontifical Academy of Sciences.
Foreign Member, American Philosophical
Society.
Founding Fellow, Third World Academy of
Sciences.
Foreign Member, Soviet (now Russian)
Academy of Sciences.
Foreign Member, Polish Academy of Sciences.
Foreign Member, Czechoslovak Academy of
Sciences.
Foreign Member, Slovenian Academy of
Sciences, Ljubljana.
Foreign Member, Serbian Academy of Arts &
Sciences, Yugoslavia.
Honorary Foreign Member, Korean Academy of
Science & Technology.
Foreign Member, Academia Europaea.
Titular Member, European Academy of Arts,
Sciences & Humanities.
Corresponding Member, Brazilian Academy of
Sciences.
Honorary Member, Japan Academy.
Foreign Member, Royal Spanish Academy of
Sciences.
Foreign Member, French Academy of Sciences.
Honorary Member, African Academy of
Sciences.
Honorary Member, Caribbean Academy of
Sciences.
Foreign Fellow, The Royal Society of Canada.
Foreign Member, Argentina Academy of
Sciences
Foreign Member, Mangolian Academy of
Sciences
Important positions in National and
International Bodies:
Chairman, Science Advisory Council to the
Prime Minister (2004 - ).
Chairman, Vision Group on Science &
Technology, Government of Karnataka.
Immediate Past President, The Academy of
Sciences for the developing world (TWAS),
Trieste.
Chairman, National Nano Initiative, Government
of India.
Member, Atomic Energy Commission of India.
Member, Executive Board, Science Institutes
Group, Institute of Advanced Study, Princeton.
Founder President, Chemical Research Society
of India.
Founder President, Materials Research Society
of India.
Chairman, Indo-Brazil Science Council.
Chairman, Indo-Russia Long-term Programme
in Science & Technology.
Member, Council of Tata Institute of
Fundamental Research, Mumbai.
International Adviser of the National Institute
of Materials Science (NIMS) of Japan.
Vice-President, International Organization of
Chemistry for Development.
Important positions in various bodies held in
the past:
Chairman, Scientific Advisory Committee to the
Union Cabinet.
Chairman, Science Advisory Council to the
Prime Minister of India (1985-89).
Chancellor, North-Eastern Hill University,
Shillong.
President, International Union of Pure &
Applied Chemistry (IUPAC).
Chancellor, Assam University.
Member, Executive Board, International Council
of Science (ICSU)
Chairman, Indo-Japan Science Council.
President, Indian National Science Academy.
President, Indian Academy of Sciences.
President, Indian Science Congress.
Chairman, Advisory Board, Council of Scientific
and Industrial Research (India).
Member, University Grants Commission, India.
Member, Planning Commission, Government of
India.
Chairman, IUPAC Commission on
Spectroscopy and Molecular Structure and
also of the IUPAC Committee on Teaching of
Chemistry.
Chairman, Chemical Research Committee,
Council of Scientific and Industrial Research.
Chairman, Chemistry and Metallurgy Research
Committee, Department of Atomic Energy.
Member, Board of Directors, Indian
Petrochemicals Corporation Limited.
Chairman (Honorary), Board of Directors,
Hindustan Insecticides Limited (a Public sector
undertaking).
Member, National Committee on Science &
Technology and later Science Advisory
Committee to the Cabinet.
Member, Science and Engineering Research
Council, Government of India.
Member, Executive Committee, Committee on
Data for Science and Technology (ICSU).
Director, Reserve Bank of India.
Chairman, Standing Committee of the Council
of Indian Institutes of Technology (IIT) and
Indian Institutes of Science Education and
Research (IISER).
Research interests:
Solid State and Materials Chemistry, Structural
Chemistry
Some of the major areas of research are
transition metal oxide systems, (new synthesis
and novel structures, metal-insulator
transitions, CMR materials, superconductivity,
multiferroics etc.), hybrid materials and
nanomaterials including nanotubes and
graphene.
Other major professional interests:
Science education and direct contact
programmes with school children
Publications
Around 1500 research publications and 45
books.
Citation : ~ 52,000 total citations (H-index,
101+).
Editorial Boards
Member of the Editorial Boards of several
major International journals dealing with
Chemical Physics, Spectroscopy and Solid
State and Materials Chemistry, such as Chem.
Phys. Lett., Modern Phys. Lett., J. Solid State
Chem., J. Mol. Struc., Mat. Res. Bull.,
Philosophical Magazine, J. Mater. Chem.,
Chemistry – An European Journal, Solid State
Sciences, ChemPhysChem, J. Nanosci.
Nanotech., Small, Chem. Soc. Rev., Bulletin of
Chem. Soc. of Japan, J. Cluster Science, J.
Experimental Nanoscience, Chemistry – An
Asian Journal, Chem. Commun., Proc. Royal
Soc. (London), Langmuir, Adv. Mater., Mater.
Horizons.
Important Medals, Prizes and Honours
(a) International
MARLOW MEDAL for outstanding contributions
to Physical Chemistry, Faraday Society,
England (1967).
CENTENNIAL FOREIGN FELLOWSHIP of the
American Chemical Society (1976).
THE ROYAL SOCIETY OF CHEMISTRY
(LONDON) MEDAL for outstanding
contributions to Solid State Chemistry (1981).
HEVROVSKY GOLD MEDAL, Czechoslovak
Academy of Sciences (1989).
HONORARY FELLOWSHIP, The Royal Society
of Chemistry, London (1989).
BLACKETT LECTURESHIP, The Royal Society,
London (1991).
ALBERT EINSTEIN GOLD MEDAL, UNESCO,
Paris (1996).
LINNETT VISITING PROFESSORSHIP, University
of Cambridge (1998).
CENTENARY LECTURESHIP AND MEDAL, Royal
Society of Chemistry, London (2000).
HUGHES MEDAL for Physical Sciences, The
Royal Society, London (2000).
OFFICIER DE L’ORDRE DES PALMES
ACADEMIQUES, France (2002).
ORDER OF SCIENTIFIC MERIT, GRAND-CROSS,
President of Brazil (2002).
GAUSS PROFESSORSHIP, The Academy of
Sciences, Gottingen, Germany (2003).
SOMIYA AWARD of the International Union of
Materials Research Society (IUMRS) (2004).
THE DAN DAVID PRIZE for Science in the
Future Dimension in the field of materials
science (2005).
CHEMICAL PIONEER, American Institute of
Chemists, USA (2005).
CHEVALIER DE LA LÉGION D’HONNEUR by the
President of the French Republic (2005).
HONORARY FELLOWSHIP, Institute of Physics,
London (2006).
NIKKEI ASIA PRIZE FOR SCIENCE,
TECHNOLOGY AND INNOVATION from Japan
(2008).
ORDER OF FRIENDSHIP, by the President of
Russia (2009 .
THE ROYAL MEDAL (THE QUEEN’S MEDAL),
by the Royal Society, London, U.K (2009).
THE AUGUST-WILHELM-VON-HOFFMANN
MEDAL for outstanding contributions to
chemistry by the German Chemical Society
(2010).
A.D. LITTLE LECTURER IN CHEMISTRY,
Massachusetts Institute of Technology (2010).
ERNESTO ILLY TRIESTE SCIENCE PRIZE (2011)
for materials research.
ALBERT EINSTEIN PROFESSOR of the Chinese
Academy of Sciences and
2012 AWARD FOR INTERNATIONAL SCIENCE
COOPERATION, Chinese Academy of Sciences
(2012).
(b) National
BHATNAGAR PRIZE in Chemical Sciences,
Council of Scientific and Industrial Research,
India (1968).
PADMA SHRI, National honour bestowed by the
President of India (1974)
S.N. BOSE MEDAL for Physical Sciences,
Indian National Science Academy (1980).
PADMA VIBHUSHAN, National honour
bestowed by the President of India (1985).
MEGHNAD SAHA MEDAL, Indian National
Science Academy (1990).
GOLDEN JUBILEE PRIZE in Physical Sciences,
Council of Scientific & Industrial Research,
India (1991).
KARNATAKA RATNA, Highest honour of the
State of Karnataka (2001).
INDIA SCIENCE AWARD (2004), First recipient
of the highest scientific recognition of the
Government of India.
DHIRUBHAI AMBANI LIFE-TIME ACHIEVEMENT
AWARD FOR INNOVATION (2011).
(c) Other Awards and Recognitions
YEDANAPALLI MEDAL AND PRIZE for
outstanding research contributions in Physical
Chemistry, Indian Chemical Society (1973).
JAWAHARLAL NEHRU FELLOWSHIP,
Jawaharlal Nehru Memorial Fund (1973).
P.C. RAY MEDAL in Chemistry, University of
Calcutta (1975).
SIR C.V. RAMAN AWARD for experimental
research in Physical Sciences by the University
Grants Commission (1975).
FICCI AWARD in Physical and Mathematical
Sciences, Federation of the Indian Chambers of
Commerce and Industry (1977).
ZAHEER LECTURESHIP, Indian Chemical
Society (1980).
KARNATAKA STATE AWARD (1982).
DISTINGUISHED ALUMNUS MEDAL, Indian
Institute of Science (1983).
P.C. RAY MEDAL, Indian Chemical Society
(1984).
NATIONAL FELLOWSHIP, National Institute of
Education (NCERT) (1986).
HONORARY MEMBERSHIP, Society of
Materials Science, India (1987).
JAWAHARLAL NEHRU AWARD for scientific
research (1988).
B. ROY MEDAL of the Indian Physical Society
(1988).
K.G. NAIK GOLD MEDAL for Chemical
Technology (1988).
ZAHEER LECTURESHIP, Zaheer Science
Foundation (1988).
C.V. RAMAN CENTENARY MEDAL (1988).
HONORARY FELLOWSHIP, Institution of
Electronics & Telecommunication Engineers
(1988).
HONORARY FOREIGN FELLOWSHIP, Institute of
Fundamental Studies, Sri Lanka (1988).
SARABHAI LECTURESHIP, Indian Council of
Social Science Research (1989).
G.M. MODI AWARD for innovative scientific
research (1989).
HONORARY MEMBERSHIP, International
Academy of Ceramics (1989).
HONORARY FELLOWSHIP, Electrochemical
Society of India (1989).
HONORARY MEMBERSHIP, Materials Research
Society of Japan (1990).
HONORARY MEMBERSHIP, Materials Research
Society of South Korea (1991).
HONORARY FELLOWSHIP of the Institution of
Engineers (1991).
GOYAL PRIZE IN CHEMISTRY of the Sri Kala
Ram Trust (1992).
SCIENCE & TECHNOLOGY AWARD of the
Kamal Kumari Foundation (1992).
MRSI PRIZE in Superconductivity and Materials
Science (1992).
DISTINGUISHED MATERIALS SCIENTIST
MEDAL, MRSI (1993).
G.P. CHATTERJEE MEMORIAL AWARD of the
Indian Science Congress (1993).
U.S. NATIONAL ACADEMY OF SCIENCES
INTERNATIONAL LECTURER (1993).
P.C. RAY MEMORIAL AWARD of the Indian
Science Congress (1994).
HONORARY FELLOWSHIP of the Indian
Institute of Science (1994).
DR. MAHENDRA LAL SIRCAR Prize of the
Indian Association for the Cultivation of
Science (1994).
SAHABDEEN INTERNATIONAL AWARD FOR
SCIENCE, Sri Lanka (1994).
KELLY LECTURER, Purdue University (1994).
N.R. DHAR AWARD of the National Academy
of Sciences (1994).
ISCA MEDAL of the Asiatic Society (1995).
ASUTOSH MOOKERJEE MEMORIAL MEDAL of
the Indian Science Congress (1996).
HONORARY FELLOWSHIP, Tata Institute of
Fundamental Research (1996).
HONORARY FELLOWSHIP, Korean Association
for the Advancement of Sciences (1997).
HONORARY FELLOWSHIP, Cardiff University of
Wales (1997).
H.K. FIRODIA AWARD for Excellence in Science
& Technology (1997).
VIGYAN RATNA, Indian Society of Analytical
Scientists (1998).
HONORARY FELLOWSHIP, Indian Chemical
Society (1999).
HONORARY FELLOWSHIP, Jawaharlal Nehru
Centre for Advanced Scientific Research (1999)
.
SHATABDI PURASKAR, Indian Science
Congress (1999).
HALLIM DISTINGUISHED LECTURER, Korean
Academy of Science & Technology (1999).
COMMANDER OF THE NATIONAL ORDER OF
LION, Senegal (1999).
HONORARY MEMBERSHIP, The Indian Institute
of Metals (2000).
HARI OM ASHRAM PRERIT SENIOR SCIENTIST
AWARD (2000).
MILLENNIUM PLAQUE OF HONOUR, Indian
Science Congress (2001).
HONORARY FELLOWSHIP, Indian Institute of
Chemical Engineers (2001).
COMMANDER OF THE ORDER OF RIO
BRANCO, President of Brazil (2002).
HOMI BHABHA LECTURE, TIFR, Mumbai
(2002).
AVRA FOUNDATION AWARD, Hyderabad
(2002).
D.S. KOTHARI LECTURESHIP, Indian National
Science Academy (2002).
HONORARY PROFESSOR, Jilin University,
Changchun, China (2002).
CHANCELLOR LECTURER, Lousiana State
University, (2002).
LIFE-TIME ACHIEVEMENT AWARD, Indian
Chemical Society (2003).
MENTOR OF SCIENCE Gold Medal, Indian
Science Congress (2003).
SARVADHIKARI MEDAL, Calcutta University
(2004).
LIFE-TIME ACHIEVEMENT AWARD, Indian
Science Congress (2004).
HONORARY FELLOWSHIP of the Indian
Association for the Cultivation of Science
(2005).
MEDAL OF HONOR, Chemical Research Society
of India (2005).
BARRETT LECTURE, Illinois University (2005).
WATT LECTURE, University of Texas (2005).
BURSTEIN LECTURE, University of
Pennsylvania (2005).
PINNAMANENI AWARD for science (2005).
SRI CHANDRASEKARENDRA SARASWATI
NATIONAL EMINENCE AWARD FOR SCIENCE
(2005).
L. SINGHANIA-IIM LUCKNOW AWARD for
leadership in Science & Technology (2005).
INDIA CITATION LAUREATE 2006 (Thomson/
ISI, USA).
NATIONAL RESEARCH PROFESSORSHIP, by the
Government of India (2006).
INSA MEDAL FOR PROMOTION AND SERVICE
TO SCIENCE, 2006.
MAGNA LECTURE, Brazilian Academy of
Science, 2007.
HONORARY FELLOWSHIP, St. Catherine’s
College, Oxford (2007).
LIFE MEMBER, Christ Church College, Oxford,
2007.
DURHAM LECTURES, 2007.
KNOWLEDGE MILLENNIUM AWARD,
ASSOCHAM, 2007.
BANGALORE NANO NATIONAL AWARD 2007
by Government of Karnataka.
FIRST JC BOSE LECTURE, Kolkata, 2007.
FIRST LAUREATE OF THE 21ST KHWARIZMI
INTERNATIONAL SCIENCE AWARD by the
Iranian Research Organization for Science &
Technology (2008).
THE FIRST INTERNATIONAL PRIZE FOR
MATERIALS SCIENCE by MRSI (India) (2009).
KELLY LECTURE, Cambridge University (2009).
HONORARY FELLOW, Chinese Chemical
Society, China (2010).
DISTINGUISHED LECTURER, Waterloo Institute
of Nanotechnology (2010).
FIRST PC RAY LECTURE, IACS Kolkata (2010).
Speaker at the 350 th anniversary of the Royal
Society (London), June 2010.
EDGE Award for leadership in education (2011)
.
Speaker in the celebrations of the 100th
anniversary of the first Solvay Conference on
Physics in Belgium (October 18, 2011).
FIRODIA LIFE-TIME ACHIEVEMENT AWARD
(2011).
ACADEMY PROFESSOR, Academy of Scientific
& Innovative Research 2013.

विज्ञानातच एकूण कमी रस अस्ल्यामुळे मलापण प्रा. राव हे "नॅनो टेक्नोलॉजीवगैरे मधले शास्त्रज्ञ" एवढंच माहित होतं. भारतरत्न पुरस्कारामुळे त्यांचे विज्ञानामधील भरीव योगदान लक्षात आले.

या महान शास्त्रज्ञाचे मनःपूर्वक अभिनंदन!!

७९ वर्षाचे डॉ. राव यांनी १५०० हुन अधिक शोधनिबंध
------ आनन्दाच्या क्षणी मिठाचा खडा टाकतो आहे त्याबद्दल क्षमस्व.... १५०० शोधनिबन्ध प्रसिद्ध करणे म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे.... पण यान्चा दर्जा काय असतो?

या पैकी किमान तिन शोध निबन्ध तर नक्कीच चोरी केलेले आहेत. Introduction मधे वाक्ये आणि प्रत्येक शब्द (verbatim) उचलेली आहेत. अजुन असतील तर मला माहित नाही.

(अ) सुरजित घोष यान्चा निबन्ध ...
http://scitation.aip.org/docserver/fulltext/aip/journal/apl/96/16/1.3415...

त्या शोधनिबध्नातले राव आणि त्यान्च्या टोळीने ढापलेली वाक्ये येथे प्रसिद्ध केली आहेत...
http://onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/adma.201101414/abstract

प्रकरण उघडकीस आल्यावर सारवासारव केली... आणि माफी मागितली. भारतीय प्रसार माध्यमासाठी सर्व दोष शिध निबन्ध लिहीणार्‍या विद्यार्थ्य्राच्या माथी मारला.

(ब) पि मॅथ्यु यान्चा २००८ मधे Applied Physics Letters मधे प्रसिद्ध झालेला शिधनिबन्ध येथे मिळेल.
http://scitation.aip.org/content/aip/journal/apl/93/11/10.1063/1.2957980

यातुन ढापलेले शब्द आणि रावानी २०१० मधे येथे प्रसिद्ध केले,
http://eprints.iisc.ernet.in/34471/1/APEX-3-115001.pdf

(क) अधिक माहिती
http://www.thehindu.com/news/national/more-instances-of-plagiarism-come-...

आपण मायबोलीवरचे लेख आणि कविता चोरी बद्दल नेहेमीच बोलतो... शोध निबन्ध किती निर्माण केले यापेक्षा त्यान्चा दर्जा काय होता, ते कसे निर्माण केले गेले हे जास्त महत्वाचे आहे. प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा विद्यार्थ्याने लिहीले होते असे म्हणुन हात वर... अरे पण तुम्ही केवळ Author नाही तर निबन्ध प्रसिद्ध करण्यासाठीचे जबाबदार "Corresponding Author" होता ना, मग काहीच जबाबदारी नाही? ते Corresponding Author नसते तर गोष्ट वेगळी होती.

मायबोलीकराना हे निबन्ध सहज्गत्या मिळतील... वाचुन आपले मत बनवावे.

गुगल मधे C N R दिल्यावर पुढे काय येथे हे तपासा...

हे सर्व सागताना त्यान्च्या कार्याला कमी लेखायचा उद्देश नाही... पण जशी विद्यार्थ्यान्ची जबाबदारी आहे तशीच रावासारख्या जेष्ठ वैज्ञानिकान्ची पण आहे...

सचिनच्या उदोउदोमध्ये [जो योग्यही आहेच....] डॉ. सीएनआर राव यांची तितकीच महत्वाची आणि अत्यंत योग्य अशा सन्मानाची बातमी 'सेकंड प्लेस' ला जाईल अशी साधार भीती वाटत असतानाच श्री.विजय देशमुख यानी हा धागा इथे आणला त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

जाईचेही मुद्दाम आभार मानतो की तिने डॉ.राव याना मिळालेल्या सन्मानाची यादी इथे दिली आहे. त्यातले सन्मान वाचतानाही दम लागतो. त्या नावावरूनच डॉ.राव यांच्या ज्ञानाला आणि संशोधनकार्याला नम्रपणे अभिवादन करावे लागेल.

आज "सकाळ" मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात डॉ.राव यानी "आपण महाराष्ट्रीयनच आहोत. आजोबा देशमुख आडनाव लावत, मराठी बोलत. शिवाय कोल्हापूरची अंबाबाई आमचे कुलदैवत आहे..." असे म्हटले आहे.

प्रा. राव यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
उदय जर त्यांनी घोष , मॅथ्यु यांचे शोधनिबंध वाचले नसतील आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी जर ती वाक्य ढापुन लिहिली असतील तर प्रा. राव यांना समजणार तरी कसं ?

उदय जर त्यांनी घोष , मॅथ्यु यांचे शोधनिबंध वाचले नसतील आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी जर ती वाक्य ढापुन लिहिली असतील तर प्रा. राव यांना समजणार तरी कसं ?

---श्री प्रत्येक Author ची जबाबदारी असते आणि तुम्ही स्वत: जे reference देत आहात ते वाचणे तर किमान अपेक्षित आहे ना? रावान्चा Advanced Materials मधे आलेल्या निबन्धात घोष यान्चा पुर्वी प्रसिद्ध झालेल्या निबन्धाचा reference दिलेला आहे (अर्थात क्र २२ वर) पण तो त्यानी वाचला नाही आणि त्याना माहित नव्हता असे म्हणणे म्हणजे corresponding author नी सम्पुर्ण निबन्ध वाचलाच नाही असे म्हणण्यासारखे आहे. सन्शोधनात काय आणि किती contribution आहे हे दिसते.

शास्त्रज्ञ डॉ. राव यांचं अभिनंदन!

भारतरत्न पुरस्कार जाहिर झाल्यावर त्याच बातमी खाली Who is CNR Rao? असा प्रश्ण/स्पष्टीकरण होतं.. यातच बरेच काही आले. वर फेसबूक वरून दिलेली लिस्ट वाचून चक्कर आली. मला पामराला त्यांचं नक्की ठळक योगदान काय हेच अजूनही निटसं कळलेलं नाही. Sad
अशा अनेक लोकांची कामगिरी सातत्याने मिडीया मधून पुढे येत नाही हे आपलं दुर्दैवं म्हणायचं का? असो.

फेसबूक लिस्ट मध्ये सुरुवातीच्या आठदहा ओळी वाचून मग स्क्रॉल करूनच दमलो.

सी.व्ही. रामन आणि अब्दुल कलाम यांच्या पंक्तीत जाऊन बसणार्‍या सीएनआर राव यांना कडक सलाम !

उदय, एका अर्थी तुझंही म्हणणं बरोबर आहे. संशोधन क्षेत्रात अश्या घटना घडतात आणि ते दुर्दैवी आणि अतिशय चुकीचे आहे. पण, इथे एक मेख आहे. भारतात केवळ संशोधन हाच एक पात्रता/ पदोन्नती हा निकष नाही, त्यासोबत बर्‍याच इतर गोष्टीही लागतात. एकीकडे प्रा. राव यांना हा पुरस्कार मिळाला, म्हणुन (अर्थाअर्थी संबंधही नसणारे) आनंदीत होणारे आहेत, तर दु:खी होणारेही. त्यांची एक लॉबी आहे, असाही आरोप करणारे आहेत.
भारतात मुळात संशोधन करणे आणि ते छापणे, अतिशय कठीण बाब आहे, ज्याला अनेक कारणांपैकी एक म्हणजे साधनांची कमतरता, असल्यास क्लरिकल कटकटी, फाईली पास करणे, वगैरे. त्यासाठी बर्‍याच झंझटी असतात.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे hierarchy सिस्टम. मुख्य संशोधक (जसं प्रा. राव) स्वतः प्रत्येक गोष्टीत नसतात. त्यांच्या हाताखाली असलेले इतर प्राध्यापक, रिसर्च प्रोफेसर, पोस्ट डॉक्टर्स, पिएचडी स्टुडंट, अशी चेन असते. त्यात प्रत्येक रिसर्च रिझल्ट, पेपर वाचणे corresponding author ला शक्य होत नाही, किंवा ते अपेक्षितही नसतं. त्यामुळे plagiarism टाळणे ही immediate adviser ची जबाबदारी असते.

असो. एका शास्त्रज्ञाला हा सन्मान मिळतोय, याचा आनंद. Happy

भारतात मुळात संशोधन करणे आणि ते छापणे, अतिशय कठीण बाब आहे, ज्याला अनेक कारणांपैकी एक म्हणजे साधनांची कमतरता, असल्यास क्लरिकल कटकटी, फाईली पास करणे, वगैरे. त्यासाठी बर्‍याच झंझटी असतात.
------ करिअरच्या सुरवातीच्या काळात धडपडणार्‍या सशोधकान्च्या या सर्व अडचणी आहेत... राव अनेक योजने पुढे गेलेली व्यक्ती आहेत.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे hierarchy सिस्टम. मुख्य संशोधक (जसं प्रा. राव) स्वतः प्रत्येक गोष्टीत नसतात. त्यांच्या हाताखाली असलेले इतर प्राध्यापक, रिसर्च प्रोफेसर, पोस्ट डॉक्टर्स, पिएचडी स्टुडंट, अशी चेन असते. त्यात प्रत्येक रिसर्च रिझल्ट, पेपर वाचणे corresponding author ला शक्य होत नाही, किंवा ते अपेक्षितही नसतं. त्यामुळे plagiarism टाळणे ही immediate adviser ची जबाबदारी असते.
------- मोठी गैरसमजुत आहे.... plagiarism टाळण्याची जबाबदारी नाव असणार्‍या प्रत्येक लेखकाची असते.

या शोध निबन्धात नाव येण्याएव्हढे माझे कार्य आहे का ? असा प्रश्न नाव टाकण्याच्या आधी स्वत: ला विचारावा. त्यानी स्वत: दिलेले महत्वाचे references वाचले नाहीत, पेपरही त्यानी स्वत: लिहीला नाही, प्रयोग काय केले आहेत हे त्यान्ना माहित असायची शक्यता जवळपास नाही पण स्वत: मात्र corresponding author आहेत. कुणी सक्ती केली होती का?

माझे कार्य या पेपर मधे नाव टाकण्यासाठी किमान आवश्यक एव्हढेही नाही म्हणुन तुम्ही माझे नाव टाकू नका.... असा पवित्रा रावासारख्या नावाजलेल्या जेष्ठ शास्त्रज्ञाला घेणे काहीच अवघड नव्हते. नव्हे हेच त्यान्च्या कडुन अपेक्षीत आहे. विषय अत्यन्त गन्भिर आहे, आणि त्याबाबत इतरत्र चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल.

उदय,

१.
आपण दिलेल्या एका दुव्यातल्या लेखात शेवटी शेवटी चूक कशी झाली असावी हे दिलं आहे. ते वाचता रावांनी संशोधन ढापलं असा अर्थ निघत नाही. शोधनिबंध ज्या शोधपुस्तिकेत (जर्नल) प्रसिद्ध झाला त्याच्या संपादकांनी हे संशोधन वैध असून ढापू नाही असं मान्य केलं आहे. नजरचुकीने व/वा इंग्रजीच्या भीतीमुळे बसंत चितारा नामक विद्यार्थ्याने जसेच्या तसे उतारे उचलले खरे, पण ते केवळ उपोद्घातातले होते. मूळ संशोधनाशी त्याचा थेट संबंध नव्हता. बाकी अशाच तर्‍हेची दोनतीन प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यावरून हा प्रकार बरेच वर्षे चालू होता. मात्र तसा तो चालू ठेवणं चुकीचं आहे. कारण त्यामुळे निबंधाचा दर्जा घसरतो. योग्य संदर्भ द्यायलाच हवेत. त्यामुळे हा प्रमाद संशोधनाची उचल असा ना धरता संदर्भोल्लेखांत हयगय असा धरावा.

२.
>> या शोध निबन्धात नाव येण्याएव्हढे माझे कार्य आहे का ? असा प्रश्न नाव टाकण्याच्या आधी स्वत: ला विचारावा.

मला वाटतं की हा कळीचा मुद्दा आहे. असंही असू शकेल की प्रा. रावांचं नाव असल्याने शोधनिबंध चटकन स्वीकारला गेला अन्यथा चितार्‍याला कोण विचारतो. थोरामोठ्यांची नावे असल्याखेरीज कागद पुढे सरकत नाही.

या क्षेत्राची माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहीती आहे. मी केवळ एक अंदाज बांधला आहे. Happy यावर स्वतंत्र चर्चा सुरू केल्यास ती वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

'हिंदू'मधल्या या लेखात 'सारखेच ग्राफ्स होते' हा मुद्दा हास्यास्पद आहे. 'कल्पना' चोरल्याचा मुद्दाही तितकाच कुचकामी. एकंदर रसायनशास्त्र आणि नॅनोतंत्रज्ञान यांच्याशी संबंध नसणार्‍या व्यक्तीनं हा लेख लिहिल्याचं कळतं आहे. सीएनआर राव यांनी जर या लेखात उल्लेखलेल्या कल्पना चोरल्या असतील, तर मग जॉर्ज व्हाईटसाइड्स, मल्व्हनी यांचे एकतृतीयांश पेपर बाद.

चिन्मय, मला त्याबाबत पुरेशी माहिती नाही, म्हणून उचलाउचली झाली आहे असे म्हणणे मी टाळले आहे. पण फॉलॉ-अप ग्रेसफूल नव्हता असे मी नक्कीच म्हणेन. त्यांच्या नॅनोटेक्नॉलॉजीतील कामाबद्दल चांगल्याच गोष्टी ऐकल्या आहेत. त्याच क्षेत्रात असलेले तुझ्यासारखेच लोक त्याबद्दल जास्त ऑथॉरेटेटीव्हली सांगू शकतील (आणि तु वर त्याचा उल्लेख केला आहेसच).

aschig,

>> उदयनी म्हंटल्याप्रमाणे सारवासारव जास्त प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती.

अनुमोदन.

आ.न.,
-गा.पै.

>>पण फॉलॉ-अप ग्रेसफूल नव्हता असे मी नक्कीच म्हणेन. त्यांच्या नॅनोटेक्नॉलॉजीतील कामाबद्दल चांगल्याच गोष्टी ऐकल्या आहेत. त्याच क्षेत्रात असलेले तुझ्यासारखेच लोक त्याबद्दल जास्त ऑथॉरेटेटीव्हली सांगू शकतील
+१
कामाबद्दल दूमत नसावच! फक्त पब्लिकेशन, रेफरसींग, टेक्निकॅलिटीज व अल्टिमेट जबाब्दारी कुणाची ई. बाबतीत थोडा गोंधळ दिसतोय. असो.

शास्त्रज्ञ-प्रशासक अनेकदा आपल्या संस्थांमधून बाहेर पडणार्‍या पेपरांमध्ये आपलं नाव लावतात. रावांसारखे शास्त्रज्ञ अशा संशोधनावर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यांचा त्यात सहभागही असतो. जेएनसीएएसआरमधून बाहेर येणार्‍या बहुतेक प्रत्येक पेपरात प्रा. रावांचं नाव असतं. ते त्या संस्थेचे संचालक म्हणून केवळ हे नाव नसतं, तर त्यांचा खरोखर त्यात सहभाग असतो. मात्र असं असलं तरी प्रत्येक पेपर अर्थातच ते लिहीत नाहीत.

दुसरं असं की, फर्स्ट ऑथर आणि करस्पाँडिंग ऑथर हे अनेकदा एकच असू शकतात. जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टरही नावांचा अनुक्रम ठरवतो. त्यामुळे अनेकदा फर्स्ट ऑथर आणि करस्पॉण्डिंग ऑथर ही एकच व्यक्ती असू शकते, आणि तिचा त्या संशोधनात तुलनेनं कमी सहभागही असू शकतो.

पेपरातल्या इण्ट्रडक्शनचा भाग अनेकदा गांभीर्यानं लिहिला जात नाही. पूर्वप्रकाशित पेपरांमधली काही वाक्यं उचलणं यात काहीच नवीन नाही. माझ्या पेपरांमधली वाक्यं जशीच्या तशी मी इतर पेपरांमध्ये वाचली आहेत आणि हे पेपर अमेरिकन शास्त्रज्ञांनी प्रकाशित केले होते. जोवर अशी वाक्यं अगदी थोडकी असतात आणि या वाक्यांचा पेपरातल्या संशोधनाच्या ओरिजिनॅलिटीशी संबंध नसतो, तोवर सहसा आक्षेप घेतले जात नाहीत. जर्नलाच्या संपादकाला मात्र हे कळवलं जातं. अशी उचलेगिरी इतकी सर्रास चालते की संपादकही याकडे दुर्लक्ष करतात कारण संशोधन 'ओरिजिनल' असणं हे महत्त्वाचं आणि चांगल्या जर्नलांमध्ये ते असतं.

भारतीय शास्त्रज्ञ पेपर लिहिण्याच्या बाबतीत अतिशय ढिसाळ असतात. त्यांचं संशोधन उत्तम असलं, तरी ग्राफ्स नीट नसतात. व्याकरणाच्या चुका असतात. मुद्दे व्यवस्थित मांडलेले नसतात. प्रा. रावांचं महत्त्वाचं योगदान हे की त्यांनी अनेक शास्त्रज्ञांना पेपर लिहायला शिकवलं. अतिशय महत्त्वाची बाब आहे ही.

आशीषने दिलेल्या लिंकेत 'ग्राफ्स सारखे' असल्याबद्दल व कल्पनाचौर्याबद्दल लिहिलं आहे. नॅनोतंत्रज्ञानात काही मूलभूत काम करताना बहुतेक सर्वच शास्त्रज्ञ ८-१० कॅरेक्टरायझेशन टेक्निक वापरतात. त्यामुळे त्या विषयातलं ज्ञान नसलेल्यांना ग्राफ्स सारखेच दिसतील. 'नॅनोतंत्रज्ञान' हा शब्द वापरून झालेलं संशोधन फार जुनं नाही. नॅनोकणांचा वापर सुरू करण्याआधी त्यांचे गुणधर्म समजून घ्यायला हवेत. त्यामुळे आजही बहुतेक सर्व शास्त्रज्ञ या कणांचे गुणधर्मच शोधत आहेत. त्यामुळे एकाच कल्पनेवर अनेकजण एकाच वेळी काम करतात, पण ते ज्या नॅनोकणांवर काम करतात, ते वेगळे असतात. उदाहरणार्थ, नॅनोकणांच्या अलॉइजवर माझे दहाएक पेपर आहेत. प्रत्येक अलॉयचे गुणधर्म वेगळे, तयार करण्याची मूळ पद्धत सारखी असली तरी तयार होण्याच्या तापमानात फरक आहे. आता एकाच कल्पनेवर मी दहा पेपर छापले असा आरोप होऊ शकतो, पण तरीही महत्त्वाच्या जर्नलांनी ते पेपर छापले कारण प्रत्येक नॅनोकण वेगळा आहे. मल्व्हनी, व्हाईटसाईड्स, मोस्तफा अल-सईद किंवा राव यांच्यासारख्या मोठ्या शास्त्रज्ञांचे असे अनेक पेपर आहेत. त्यामुळे रावांवर कल्पनाचौर्याचा आरोप करणं अजिबात योग्य नाही. 'अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स', 'नॅनोटेक्नॉलॉजी' ही अतिशय महत्त्वाची आणि जबाबदार जर्नलं आहेत. त्यांनी पेपर परत केला नाही, यातच सगळं आलं.

सगळा दोष कनिष्ठ सहकार्‍यांवर ढकलणं, याबद्दल मी बोलू शकत नाही. एक मात्र नक्की की, रावांनी प्रकाशित केलेल्या पेपरांमुळे भारतातलं नॅनोतंत्रज्ञान गांभीर्यानं घेतलं जाऊ लागलं. नंतर (काही प्रमाणात डॉ. पार्थसारथी गांगुली व) अतिशय धडाक्यानं डॉ. मुरली शास्त्री यांनी जागतिक पातळीवर भारतातलं नॅनोतंत्रज्ञान नेलं. राव व शास्त्री या दोघांबरोबर काम करणार्‍या शास्त्रज्ञांना, विद्यार्थ्यांना केवळ हे दोघं ठामपणे त्यांच्या मागे उभे राहिले म्हणून जागतिक पातळीवर आपलं नाव झळकवता आलं. भारतातून येणार्‍या पेपरांकडे दुर्लक्ष करणारा एक मोठा वर्ग अमेरिकेत व युरोपात होता, आहे. या मंडळींच्या जर्नलांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचे पेपर प्रकाशित होणं कठीण असताना राव आणि शास्त्री यांनी भारतीय नॅनोतंत्रज्ञानाला जागतिक व्यासपीठ मिळवून दिलं.

Pages